Indian Army Agniveer Bharti Details | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती तपशील
विभागाचे नाव | भारतीय सैन्य (Indian Army) |
पदांचे नावे | जनरल ड्यूटी, टेक्निकल, लिपिक/स्टोर कीपर टेक्निकल, ट्रेड्समैन (१०वी उत्तीर्ण उमेदवार), ट्रेड्समैन (८वी उत्तीर्ण उमेदवार) |
रिक्त पद | २५,०००+ |
श्रेणी | केंद्र सरकार पद |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोंदणी तारीख | १२ मार्च २०२५ ते १० एप्रिल २०२५ |
शैक्षणिक पात्रता | ८वी उत्तीर्ण ते १२वी उत्तीर्ण |
वयाची अट | १७.५ ते २१ वर्षे |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा (CBT), कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम निवड |
अधिकृत संकेतस्थळ | www.joinindianarmy.nic.in |
Indian Army Agniveer Bharti important dates | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती महत्त्वाच्या तारखा
✅ भारतीय सेनेच्या अधिकृत वेब पोर्टलवरून अर्ज करण्याची तारीख: १२ मार्च २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.
✅ इच्छुक उमेदवार तरुण तरुणी १० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात, १० एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
✅ परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख १० एप्रिल आहे.
✅ भरतीचा पेपर आणि पुढील प्रक्रिया जून २०२५ पासून सुरू होण्याचे संकेत आहेत.
Indian Army Agniveer Bharti Vacancy | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती रिक्त जागा
खालील सर्व पदांसाठी देशात भारतीय सेनेमार्फत अग्निवीरसाठी एकूण २५,००० पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत. यात कोणती पदे असणार आहेत, त्यांची यादी खाली दिलेली आहे.
पदांची नावे खालीलप्रमाणे:
✅ अग्निवीर जनरल ड्यूटी - (Agniveer General Duty - GD)
✅ अग्निवीर टेक्निकल - (Agniveer Technical)
✅ अग्निवीर लिपिक/स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Office Assistant/ Store Keeper Technical)
✅ अग्निवीर ट्रेड्समैन १०वी उत्तीर्ण (Agniveer Tradesman 10th Pass)
✅ अग्निवीर ट्रेड्समैन ०८वी उत्तीर्ण - Agniveer Tradesman 8th Pass
Indian Army Agniveer Bharti Salary Details | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती पगाराची माहिती
अग्निवीरमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना ४ वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पगार वाढत जातो. खालीलप्रमाणे त्यांना पगार दिला जातो.
✅ पहिल्या वर्षी मूळ वेतन ३०,००० रुपये प्रति महिना दिला जातो. त्यात ९,००० रुपयांची कटौती केली जाते. आणि त्यांच्या बँक खात्यात २१,००० रुपये जमा केले जातात.
✅ दुसऱ्या वर्षी मूळ वेतन ३३,००० रुपये प्रति महिना दिला जातो. त्यात ९,९०० रुपयांची कटौती केली जाते. आणि त्यांच्या बँक खात्यात २३,१०० रुपये जमा केले जातात.
✅ तिसऱ्या वर्षी मूळ वेतन ३६,५०० रुपये प्रति महिना दिला जातो. त्यात १०,९५० रुपयांची कटौती केली जाते. आणि त्यांच्या बँक खात्यात २५,५८० रुपये जमा केले जातात.
✅ चौथ्या वर्षी मूळ वेतन ४०,००० रुपये प्रति महिना दिला जातो. त्यात १२,००० रुपयांची कटौती केली जाते. आणि त्यांच्या बँक खात्यात २८,००० रुपये जमा केले जातात.
Indian Army Agniveer Bharti Age Limit | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी किमान वयाची अट ही १७.५ वर्ष ठेवण्यात आली आहे. तर कमाल वयमर्यादा ही २१ वर्ष ठेवली आहे. या पदांच्या भरतीसाठी सरकारच्या वयाच्या नियमावलीनुसार सूट दिली जाणार आहे. या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय सैन्य अग्निवीरची जरी करण्यात आलेली अधिसूचना वाचा.
Indian Army Agniveer Bharti Educational Qualification | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती शैक्षणिक पात्रता
✅
अग्निवीर जनरल ड्यूटीसाठी
१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत १० मध्ये ४५% गुण मिळालेले असावे. आणि प्रत्येक विषयात अर्जदाराला ३३% गुण हवे. उमेदवाराने भारतातील कोणत्याही सरकार मान्यता प्राप्त बोर्ड, विद्यापीठ, संस्थेतून, समतुल्य मधून परीक्षा उत्तीर्ण केलेली हवी.
✅
अग्निवीर टेक्निकल
साठी उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण केलेली हवी. १२वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी हे सर्व विषय उत्तीर्ण केलेली असावेत. उमेदवाराला किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रत्येक विषयात ४० टक्के गुण हवे.
किंवा
उमेदवाराने १० वी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराला १० मध्ये इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. १०वी + ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
किंवा
उमेदवाराकडे २ ते ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला हवा. डिप्लोमा कोणत्या शाखेमधून असावा त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
(Mechanic Motor Vehicle/Instrumentation Technology/Mechanic Diesel/Computer Engineering/Electronic Mechanic/Computer Science/Technician Power Electronic Systems/Auto Mobile Engineering/Electrician/Electronics Engineering/Fitter/Electrical Engineering/Instrument Mechanic/Mechanical Engineering/Draughtsman (All types)/Information and Communication Technology System Maintenance/Vessel Navigator/Surveyor/Mechanic Cum Operator Electric Communication System/Geo Informatics Assistant/Information Technology)
किंवा
भारतातील कोणत्याही सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेमधून समकक्ष प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
✅
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
साठी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२वी मध्ये किमान ६० टक्के असणे आवश्यक आहे.
✅
अग्निवीर ट्रेड्समन १०वी पास
साठी उमेदवाराला किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✅
अग्निवीर ट्रेड्समन ८वी पास
साठी उमेदवाराला किमान ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Indian Army Agniveer Bharti Selection Process | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती निवड प्रक्रिया
✅ पहिल्या चरणात अग्निवीर भरतीसाठी लेखी परीक्षा (CBT) घेतली जाणार आहे.
✅ दुसऱ्या चरणात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल म्हणजे ग्राउंड PET, PST. पीईटी म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test) होईल आणि पीएसटी म्हणजे शारीरिक मानक चाचणी (Physical Standards Test) घेतली जाईल.
✅ तिसऱ्या चरणात तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. जास्त माहिती साठी भरतीची नोटिफिकेशन वाचा.
✅ चौथ्या चरणात उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
✅ पाचव्या चरणात अंतिम निवड घोषित करण्यात येईल.
Indian Army Agniveer Bharti Physical Qualifications | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती शारीरिक पात्रता
अग्निवीरसाठी उमेदवारांना आपली शारीरिक पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पदासाठी उंचीचे आणि छातीचे प्रमाण असणार आहे. वजन हे आर्मी मेडिकलने ठरवलेल्या स्टँडर्डनुसार असणार आहे. चला शारीरिक पात्रता विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
✅ अग्निवीर जनरल ड्यूटीसाठी उमेदवाराची उंची १६८ सेमी (cm) असणे आवश्यक आहे. छाती नफुगवता ७७ सेमी (cm) भरली पाहिजे आणि फुगवून ८२ सेमी (cm) इतकी भरली पाहिजे.
✅ अग्निवीर टेक्निकल साठी उमेदवाराची उंची १६७ सेमी (cm) असणे आवश्यक आहे. छाती नफुगवता ७६ सेमी (cm) भरली पाहिजे, आणि फुगवून ८१ सेमी (cm) इतकी भरली पाहिजे.
✅ अग्निवीर लिपिक/स्टोर कीपर टेक्निकल साठी उमेदवाराची उंची १६२ सेमी (cm) असणे आवश्यक आहे. छाती न फुगवता ७७ सेमी (cm) भरली पाहिजे, आणि फुगवून ८२ सेमी (cm) इतकी भरली पाहिजे.
✅ अग्निवीर ट्रेड्समैन १०वी उत्तीर्ण साठी उमेदवाराची उंची १६८ सेमी (cm) असणे आवश्यक आहे. छाती न फुगवता ७७ सेमी (cm) भरली पाहिजे. आणि फुगवून ८१ सेमी (cm) इतकी भरली पाहिजे.
✅ अग्निवीर ट्रेड्समैन ०८वी उत्तीर्ण साठी उमेदवाराची उंची १६८ सेमी (cm) असणे आवश्यक आहे. छाती न फुगवता ७७ सेमी (cm) भरली पाहिजे, आणि फुगवून ८१ सेमी (cm) इतकी भरली पाहिजे.
Indian Army Agniveer Bharti Application Fee | भारतीय सेना अग्निवीर भर्ती अर्ज शुल्क
भरतीसाठी २५० रुपये शुल्क असणार आहे. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS) आणि अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) सर्व उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क असणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा वापर करून शुल्क भरू शकता. त्यासाठी Debit Card, Credit Card, Net Banking, UPI Mode वापर करून शुल्क भरू शकता.
Indian Army Agniveer Recruitment Form Filling Process | भारतीय सैन्य अग्निवीर भर्ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया
भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी भारतीय सेनेमार्फत प्रकाशित केलेली सूचना पीडीएफ (PDF) वाचा आणि त्याविषयी सविस्तर माहिती समजून घ्या. त्यानंतर फॉर्म भरा. फॉर्म भरताना सर्व माहिती तुमच्या जवळ ठेवा. म्हणजे फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही.
१. फॉर्म भरण्यासाठी भारतीय सेन्याची अधिकृत वेबपोर्टल "joinindianarmy.nic.in" ला भेट द्या.
२. भारतीय सैन्य अग्निवीरसाठी नवीन नोटिफिकेशन असेल "ऑनलाइन नोंदणी अर्ज" तिथे क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना काळजी घ्या, तुमची माहिती ही खरी असावी आणि ती बरोबर असावी.
३. भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
४. नंतर दिलेल्या पेमेंट पर्यायांद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
५. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमच्या सोयीसाठी आणि पुढील कामांसाठी अर्जाची एक प्रत डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.