नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तपशील | Namo Shetkari Mahasamman Nidhi Scheme Details
योजनेचे नाव | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
अर्थसंकल्प | २०२३ |
विभागाचे नाव | कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासन (Ministry of Agriculture Government of Maharashtra) |
उद्देश | राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
अर्थसहाय्य रक्कम | प्रति वर्ष ६००० रुपये |
अर्ज प्रक्रिया | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत पात्र शेतकरी (अर्ज करण्याची गरज नाही) |
अधिकृत वेबसाइट | https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login |
पीएम-किसान सन्मान निधी योजना तपशील | PM-Kisan Samman Nidhi Scheme Details
योजनेचे नाव | पीएम-किसान सन्मान निधी योजना |
योजनेची सुरुवात | भारत सरकार |
अर्थसंकल्प | २४ फेब्रुवारी २०१९ |
विभागाचे नाव | कृषी मंत्रालय भारत शासन (Ministry of Agriculture Government of India) |
उद्देश | देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत |
लाभार्थी | भारतातील शेतकरी |
अर्थसहाय्य रक्कम | प्रति वर्ष ६००० रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | https://pmkisan.gov.in/ |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी नवीन अपडेट | New update about Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana
काल देशातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २००० रुपये जमा करण्यात आले. हा कार्यक्रम बिहार येथील भागलपूर येथे होता. देशातील शेतकरी आणि नेते या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील नागपूर येथून वनामती सभागृहामधून कार्यक्रमाला हजेरी लावली.
त्यासोबतच तिथे बोलताना मुख्यमंत्री बोलले की विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये ३००० रुपये वाढवून या योजनेची निधी ६००० रुपयांवरून ९ हजार रुपये करू.
या अनुषंगाने वनामती सभागृहामधून मुख्यमंत्री यांनी नमो शेतकरी निधीमध्ये ३००० रुपये वाढवून आता ९००० रुपये करण्यात आले आहेत आणि केंद्र सरकारचे पीएम किसान निधी योजनेचे ६००० रुपये असे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
आता पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेमधून १९ हफ्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. तर नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेमधून राज्यातील शेतकरी बांधवांना ५ हफ्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. नमो शेतकरीचा पाचवा हफ्ता आणि किसान सम्मान निधीचा १८वा हफ्ता हा महाराष्ट्रातील वर्धा येथून हस्तक्षेप करण्यात आला होता.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेविषयी नवीन अपडेट | New update about PM kisan samman Nidhi Yojana
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली पीएम किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजनेला या वर्षी ६ वर्षे पूर्ण झाली. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी देशात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत चालू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे.
पीएम किसान योजनेत ६ वर्षांत साध्य केलेली उद्दिष्टे | Goals achieved in 6 years under PM Kisan Yojana
✅ देशातील २२ कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेमार्फत लाभ प्रदान करण्यात आला आहे.
✅ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ३ लाख कोटींपेक्षा अधिक आर्थिक मदत DBT द्वारे वितरित करण्यात आली आहे.
✅ योजनेत पारदर्शिता आणण्यासाठी DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात येते.
✅ या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थिरता व शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी वाटचाल.
देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार
पीएम किसान योजनेमुळे देशातील करोडो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात लागवडीसाठी बियाणे, पिकांसाठी खते, जमीन मशागत आणि शेतीसंबंधित इतर कामांच्या खर्चासाठी थोडा आधार मिळत आहे. तसेच, योजनेच्या अर्थसहायामुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेतही सुधारणा पाहण्यासाठी दिसत आहे.