ग्रामीण डाक सेवक भर्ती 2024 तपशील | Gramin Dak Sevak Recruitment 2024 Details
विभागाचे नाव | India Post Gramin Dak Sevaks |
पदांचे नावे | BPM, ABPM, Dak Sevak |
रिक्त पद | 44,228 |
श्रेणी | केंद्र सरकार पद |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | 10वी उत्तीर्ण |
वयाची अट | 18 ते 40 वर्षे |
निवड प्रक्रिया | गुणवत्तेवर आधारित |
GDS पगार | ABPM/ GDS- Rs. 10,000/- BPM- Rs. 12,000/- |
अधिकृत संकेतस्थळ | https://indiapostgdsonline.gov.in/ |
ग्रामीण डाक सेवक भर्ती 2024 विषयी | About Gramin Dak Sevak Recruitment 2024
GDS Recruitment 2024: ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks) मार्फत २०२४ मध्ये संपूर्ण देशात विविध पदांसाठी भर्ती जाहीर करण्यात आली होती. १५ जुलै ते ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती.
ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांसाठी आणि त्याचे निकाल सुद्धा लागले, पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लावण्यात आली, त्यामुळे ग्रामीण डाक भरतीचे बाकी याद्या लावण्यास विलंब झाला. आज GDS मार्फत सहावी मेरिट लिस्ट लावण्यात आली आहे.
अर्जदारांनी ती कशी तपासावी आणि त्यासोबत GDS २०२४ विषयी सविस्तर माहिती पाहू.
ग्रामीण डाक सेवक भर्ती यादी कशी तपासावी | How to check Gramin Dak Sevak Recruitment List
✅ अर्जदाराने सर्वात आधी ग्रामीण डाक सेवकच्या अधिकृत वेबपोर्टलवर जा. तुम्ही समोरील लिंकचा वापर करू शकता. "https://indiapostgdsonline.gov.in/".
✅ नंतर "GDS Online Engagement Schedule, July-2024 Shortlisted Candidates" या मेनूवर Mouse घेऊन जा.
✅ आता तुम्हाला भारतातील राज्ये दिसतील. आता महाराष्ट्रावर Mouse घेऊन जा.
✅ आता Supplementary List ६ वर क्लिक करा, निवड यादी डाउनलोड करा.
✅ मेरिट लिस्ट ही PDF मध्ये असेल, आता तिला उघडून घ्या. आणि त्यात तुमचा जिल्हा, circle name, Reg Number नुसार तुम्ही तुमचा नंबर तपासू शकता.
ग्रामीण डाक सेवक मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यावर काय करावे
यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर सर्वात आधी तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन. पुढे काय करावे त्याविषयी जाणून घेऊ. तुम्हाला सर्व दस्तऐवज पडताळणीसाठी मुख्य कार्यालयात जावे लागेल.
त्यासाठी तुम्हाला सोबत मूळ कागदपत्रे आणि २ झेरॉक्स कागदपत्रांचा संच सोबत न्यायचा आहे. त्यासर्वांची पडताळणी करून घ्यायची आहे.
ग्रामीण डाक सेवक भर्तीमध्ये पडताळणीसाठी लागणारे कागदपत्रे | Documents required for document verification
✅ गुणपत्रक (Marks Sheet) - अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणजे १०वी, १२वी पासचे बोर्ड गुणपत्रक असणे आवश्यक आहे.
✅ ओळखपत्र (Identity Proof) - अर्जदाराची ओळख सिद्ध करण्यासाठी तुमच्या जवळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. यामधून तुमची ओळख निश्चित होईल.
✅ जात प्रमाणपत्र (Caste Certificate) - अर्जदाराने अर्ज करताना निवडलेल्या प्रवर्गानुसार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, म्हणजे अर्जदार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्ग (OBC) यापैकी ज्या प्रवर्गातील असेल त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
✅ दिव्यांग प्रमाणपत्र (PWD Certificate) - अर्जदार दिव्यांग असेल तर त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र द्यावे लागते. अपंगत्व प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रमाणित केलेले हवे.
✅ EWS प्रमाणपत्र (EWS Certificate) - EWS प्रवर्गामधून अर्ज केला असेल तर EWS प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागेल. प्रमाणपत्र हे सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार हवे.
✅ ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र (Transgender Certificate) - ट्रान्सजेंडर प्रवर्गातील अर्जदारांसाठी सरकारने दिलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
✅ जन्मतारखेचा पुरावा (Date of Birth Proof) - अर्जदाराची जन्मतारीख प्रमाणित करण्यासाठी अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र, १०वी बोर्ड गुणपत्रक किंवा शाळेचा दाखला तपासण्यासाठी आवश्यक आहे.
✅ वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate) - अर्जदार हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालय, शासकीय दवाखाना किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने अर्जदाराची पूर्णपणे तपासणी करून त्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ग्रामीण डाक सेवक सर्व मेरिट लिस्ट
1st मेरिट लिस्ट | पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी क्लिक करा |
2nd मेरिट लिस्ट | दुसरी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी क्लिक करा |
3rd मेरिट लिस्ट | तिसरी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी क्लिक करा |
4th मेरिट लिस्ट | चौथी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी क्लिक करा |
5th मेरिट लिस्ट | पाचवी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी क्लिक करा |
6st मेरिट लिस्ट | सहावी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी क्लिक करा |