शेणाचा वापर करून जैविक खत बनवून पैसा कमवू शकतो
जैविक खत बनवण्यासाठी शेणाचा खूप मोलाचा वाटा आहे. आजची मार्केट परिस्थिती पाहता रासायनिक खतांपेक्षा जैविक खताला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जैविक खत विकून सुद्धा शेतकरी लाखो रुपये कमावू शकतो. जैविक खत हे शेतीसोबतच शहरातील बगीचे आणि घरातील झाडांसाठी उपयोगात येते.
म्हणून देशात आणि विदेशात जैविक खताची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. शेणापासून तयार केलेले कंपोस्ट आणि वर्मीकंपोस्ट खत मातीसाठी खूप फायदेमंद असते, कशा प्रकारे ते पाहू. जैविक खत मातीतील सुपीकता वाढवण्याचे काम करते.
त्यामुळे पीक उत्पादनात वाढ दिसते, त्यासोबत जैविक खतांचा वापर करून भाजीपाला पिकवण्यास आता जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. म्हणून शेतकरी योग्य प्रकारे जैविक खत बनवून ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन विकू शकतो. या मधून शेतकरी लाखो रुपये कमावू शकतो.
बायोगॅस निर्मिती करून पैसा कमवू शकतो
गाईंचे, म्हशींचे किंवा इतर जनावरांचे शेण योग्य पद्धतीने आणि नियोजन करून कुजवून त्यापासून बायोगॅस तयार केला जातो. बायोगॅस इंधनालासुद्धा मार्केटमध्ये खूप मागणी आहे. यामधून सुद्धा शेतकरी लाखो रुपये कमावू शकतो. बायोगॅस तयार करण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे.
शेण एका जागेवर गोळा करून त्यात पाणी मिसळणे, तयार केलेले मिश्रण एका टाकीत ठेवणे, त्याला आपण बायोगॅस प्लांट म्हणू किंवा हवा न पोहोचणाऱ्या टाकीत (Anaerobic Digester) या मिश्रणाला ठेवू. साधारण १५-२० दिवसांनी शेणामधील जिवाणूंच्या मदतीने शेण कुजते आणि त्यापासून त्या हवा न पोहोचणाऱ्या टाकीत बायोगॅस तयार होतो.
त्याला मीथेन वायू (CH₄) सुद्धा म्हंटले जाते. आणि या बायोगॅसचा वापर देशात आणि विदेशात स्वयंपाक बनवण्यासाठी, वीज निर्मिती करण्यासाठी किंवा ट्रॅक्टर किंवा वाहनांच्या इंधनासाठी वापर केला जातो. त्यासोबत बायोगॅस निर्मिती नंतर उरलेले शेण हे सेंद्रिय खत म्हणून सुद्धा शेतात वापरले जाते. अशा पद्धतीने शेतकरी बायोगॅस आणि सेंद्रिय खत अशा दोन्ही पद्धतीने लाखो रुपये कमवू शकतो.
शेणापासून पेंट (रंग) किंवा वार्निश (चमकदार आवरण) बनवूनसुद्धा पैसा कमवू शकतो
शेतकरी शेणापासून रंग आणि वार्निश बनवून त्याला मार्केटमध्ये विकून सुद्धा पैसे कमवू शकतात. शेतकरी रंग आणि वार्निश बनवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालवू शकतात. देशात शेणापासून बनलेल्या रंग आणि वार्निशची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या मधून शेतकरी लाखो रुपये कमावू शकतात.
शेणापासून बनणाऱ्या वस्तूंची विक्री करूनसुद्धा पैसा कमवू शकतो
शेतकरी मित्रांनो, शेणापासून खूप साऱ्या वस्तू तुम्ही बनवू शकता. आणि त्यांना विकून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. आता आपण पाहू त्या कोणत्या वस्तू आहेत की त्यांची मागणी देशातील आणि विदेशातील मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
शेणाच्या गोवऱ्या बनवून
शेणापासून बनणाऱ्या वस्तूंमध्ये गोवऱ्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गोवऱ्या ह्या गाई-म्हशींच्या शेणापासून बनवल्या जातात आणि गोवऱ्यांना बनवण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी आहे. गोवरी ही मुख्यतः पारंपरिक इंधन म्हणून जाळण्यासाठी वापरली जाते.
पाहायला गेलो तर गोवऱ्या ह्या स्वयंपाकघरात इंधनाच्या रूपात वापरल्या जातात, घरी किंवा मंदिरात हवन, पूजाविधीमध्ये यांचा वापर हा केला जातो. पारंपरिक खात म्हणून शेतात सेंद्रिय खत म्हणून गोवऱ्यांचा वापर हा केला जातो. याचा उपयोग बायोगॅस तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. हे झाले गोवऱ्यांचे उपयोग.
आता आपण पाहू याची मार्केटमध्ये मागणी आणि मिळणारा भाव. शेतकरी बांधवानो, गोवऱ्यांचे भाव हे वेगळे असू शकतात. ऑनलाईन आणि स्थानिक बाजारात सध्या ३ रुपये ते १० रुपये प्रति गोरीचा भाव चालू आहे. या मधून शेतकरी लाखो रुपये कमावू शकतो.
शेणापासून कागद बनवून
शेणापासून कागद बनवून सुद्धा लाखो रुपये कमवू शकतो. याला पर्यावरणपूरक कागद निर्मिती म्हणू शकतो. या कागदाची मागणी खाजगी कंपन्यांमध्ये आणि पर्यावरणपूरक असल्याने विदेशात सुद्धा शेणापासून बनलेल्या कागदाची मागणी आहे.
शेणापासून दागिने आणि शोभेच्या वस्तू बनवून
शेणापासून दागिने आणि शोभेच्या वस्तू बनवू शकतो. ऐकण्यासाठी नवीन वाटतेय शेणापासून दागिने आणि शोभेच्या वस्तू कोण वापरणार बरं, पण शेतकरी मित्रांनो शेणापासून तयार केलेले दागिने आणि घरातील शोभेच्या वस्तू यांची विदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
तुम्ही या वस्तू ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइट म्हणजे Amazon आणि Flipkart च्या माध्यमातून विकू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता.
शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी: शेण विकून लखपती बना
शेतकरी मित्रांनो, देशात विविध राज्यांमध्ये राज्य सरकारकडून शेण खरेदी केली जाते आणि यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. तसेच, भारतातील काही कंपन्या शेतकऱ्यांकडून चांगल्या भावात शेण खरेदी करतात.
कारण शेणापासून बनणाऱ्या उत्पादनांची मागणी ही परदेशात खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून शेणखत विकून खरंच शेतकरी लखपती बनू शकतो.
✅ भारतातील छत्तीसगडमधील सरकार शेण खरेदी करण्यासाठी राज्यात योजना राबवत आहे. जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना शेणामधून आर्थिक नियोजन करण्यास मदत मिळेल.
✅ देशात खूप मोठ्या प्रमाणात जैविक उत्पादन केले जात आहे. यासाठी लागणारे शेण हे कंपन्या ग्रामीण आणि शहरी भागातील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून विकत घेत आहेत.
✅ भारतासोबतच परदेशात सुद्धा शेण खताची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण बाहेर देशातील बाजारपेठेत सेंद्रिय खत, बायोगॅस आणि पर्यावरणपूरक वस्तूंची म्हणजे दागिने आणि शोभेच्या वस्तूंची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे.