कडूनिंबाचे फायदे
◼️ भारतात आणि महाराष्ट्रात कडूनिंबाचे झाड सर्वत्र पाहायला मिळतात. कृषी क्षेत्रात कडूनिंबाच्या झाडाचे खूप महत्त्व आहे. त्यापासून येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा वापर आपण करू शकतो. कडूनिंबाचे पाने, निंबोळी, झाडाची साल, आणि त्याचे लाकूड हे सर्व उपयोगी येते.
◼️ शेतात आपण रासायनिक किटकनाशकांचा वापर करतो. त्यामुळे आपल्या जमिनीचे नुकसान करून घेतो. त्यासोबत पर्यावरणाची सुद्धा हानी करून घेतो. कधी कधी फवारणीचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा पाहायला मिळतो. निंबोळी अर्कासारख्या जैविक किटकनाशकांचा वापर केल्याने होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
◼️ रासायनिक फवारणी केल्याने शेतासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांचा सुद्धा नाश होतो, जे आपल्या पिकांचे संरक्षण करत असतात. पण त्याच जागी निंबोळी अर्काची फवारणी केली असता, उपयुक्त कीटकनाशके सुरक्षित राहतात.
निंबोळ्या गोळा करण्याची सोपी आणि योग्य पद्धत
◼️ कडूनिंबाच्या झाडाला वर्षातून एकदा निंबोळ्या लागतात. त्यामुळे आवश्यक असतील तितक्या निंबोळ्या गोळा करून घेणे आवश्यक आहे.
◼️ तुम्ही कडूनिंबाच्या फांद्या झटकून पिकलेल्या निंबोळ्या खाली पडून त्या वेचू शकता. किंवा झाडाच्या खाली पडलेल्या सर्व पिवळ्या निंबोळ्या तुम्ही वेचू शकता.
◼️ एकदा सर्व निंबोळ्या गोळा झाल्यानंतर त्यामधील काडी, कचरा काढून फक्त निंबोळ्या जमा कराव्यात.
निंबोळ्या वाळविण्याची योग्य पद्धत
◼️ मोकळ्या जागेत जिथे उन्ह जास्त वेळ असेल आणि जागा कायम कोरडी राहील अशा ठिकाणी निंबोळ्या पसरवून वाळवत ठेवाव्यात.
◼️ शक्य असेल तितका निंबोळ्यांचा थर हा बारीक आणि पातळ ठेवावा, जेणेकरून उन्हात टाकलेल्या सर्व निंबोळ्यां एकत्र सुकवतील.
◼️ निंबोळ्यां वाळवण्याची प्रक्रिया नीट करावी. जर काही निंबोळ्यां पूर्ण वाळल्या नाहीत, तर त्यांना बुरशी लागू शकते.
◼️ निंबोळ्यां वाळवताना जागा ही कोरडी ठेवा, जेणेकरून बुरशी लागणार नाही. पावसाचे वातावरण असेल किंवा पाऊस पडणार असेल, तर निंबोळीना गोळाकरून सुरक्षित जागी ठेवाव्यात.
निंबोळ्या साठवण्याची योग्य पद्धत
◼️ कमी जास्त वाळलेल्या निंबोळ्यांना जमा करून ठेवले तर त्यांना बुरशी लागू शकते. त्यामुळे त्यांना भरताना सुकलेल्या निंबोळ्या काळजीपूर्वक भरा, जेणेकरून त्यांना बुरशी लागणार नाही व बुरशीपासून त्यांचे संरक्षण होईल.
◼️ निंबोळ्या हवेशीर पोत्यात किंवा टोपल्यामध्ये भरून ठेवा, जेणेकरून त्यांच्यात हवा पास होईल आणि त्यांना बुरशी लागणार नाही.
◼️ तुम्ही निंबोळ्या प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवल्या. तर त्यांना त्याठिकाणी हवा लागणार नाही. आणि त्यांना बुरशी लागण्याची दाट शक्यता असेल. म्हणून निंबोळ्याची साठवण योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे.
निष्कर्ष
निंबोळी अर्क हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. तुम्ही योग्य पद्धतीने निंबोळ्या गोळा करण्यापासून ते साठवणूक, वाळवून आणि घाण साफ करून जमा केले तर तुम्ही त्यांचा वापर वर्षभर करू शकता. ज्यामुळे रासायनिक फवारणीचा खर्च कमी होतो आणि शेताला हानीसुद्धा होत नाही. कडूनिंबाच्या या नैसर्गिक गुणांचा वापर करून आपण भविष्यात शेतीला खूप चांगल्या पद्धतीने चालना देऊ शकतो.