पीएम किसान योजनेत नाव दुरुस्ती करणे का महत्वाचे आहे?
काही वेळेस आधारकार्डवरील नाव, बँक पासबुकवरील नाव आणि शेतीच्या उताऱ्यावरील नावात तफावत असू शकते. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव हे आधारकार्डवरील नावासोबत जोडले गेले पाहिजे. तुमच्या नावात फरक असेल तर तुमचा अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
तुम्हाला मिळणारा लाभही थांबवला जाऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान पोर्टलवर तुमच्या आधारकार्डप्रमाणे नाव नसेल किंवा नाव चुकीचे असेल, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवरील नाव हे आधारकार्डच्या नावानुसार दुरुस्त करावे लागेल. ही सुविधा फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांची UIDAI डेमो ऑथेंटिकेशन दरम्यान पडताळणी अयशस्वी झाली.
UIDAI डेमो ऑथेंटिकेशन पडताळणी अयशस्वी झालेले शेतकरी या सुविधेचा वापर करून आपल्या नावात बदल करू शकता. आणि बंद झालेला पीएम किसान योजनेचा हफ्ता पुन्हा चालू करू शकता.
पीएम किसान योजनेत नाव दुरुस्ती करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत
१. नावात बदल करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यासाठी तुम्ही समोरच्या लिंकवर क्लिक करा. 👉 https://pmkisan.gov.in/
२. मुख्यपृष्ठावर आल्यानंतर उजव्या बाजूला खाली "Farmer Corner" मध्ये "आधारानुसार नाव दुरुस्ती" (Name Correction as per Aadhaar) हा पर्याय देण्यात आला आहे. आता या पर्यायावर क्लिक करून घ्या.
३. तुमच्या समोर वेबपोर्टलमध्ये एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यात तुम्हाला तुमच्या जवळ असलेला तुमचा शेतकरी नोंदणी क्रमांक (Registration Number), आधार क्रमांक (Aadhaar Number) किंवा मोबाईल क्रमांक (Mobile Number) टाकून तुमची माहिती शोधण्यासाठी "सबमिट" (Submit) बटणावर क्लिक करा.
४. UIDAI म्हणजे आधार कार्डच्या डेटाबेसमध्ये असलेल्या तुमच्या माहितीच्या अनुसार तुमचे नाव तपासा आणि नावात बदल करण्याची गरज असल्यास योग्य बदल करा.
५. नावात योग्य ती दुरुस्ती केल्यानंतर सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा. तुम्ही दिलेली माहिती पीएम किसान योजनेच्या माहितीमध्ये अपडेट केली जाईल.
नावात दुरुस्ती करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
तुम्हाला तुमच्या नावात बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळ खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे. त्यात आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, जमिनीची कागदपत्रे, आधार कार्डच्या मदतीने तुम्ही तुमचे नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक आणि तुमचा पत्ता बदलू शकता.
पासबुकच्या मदतीने तुम्ही नाव आणि बँकेचा तपशील बदलू शकता, आणि जमिनीचे कागदपत्रे वापरून तुम्ही तुमच्या जमिनीविषयीची माहिती बदलू शकता.
नावात दुरुस्ती करताना काही गोष्टी लक्षात ठेवा
✅ माहिती प्रविष्ट करताना एकदा अवश्य तपासा. चुकीची माहिती भरली गेली तर तुमचा हफ्ता बंद होऊ शकतो. म्हणून माहिती भरताना एकदा अवश्य पडताळणी करा.
✅ अर्जात चुका झाल्या असतील तर वेळेवर दुरुस्त करा, नाहीतर तुम्हाला मिळणाऱ्या हफ्त्याला विलंब होऊ शकतो आणि तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
मोठ्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध नाही. त्यासाठी काय करावे?
शेतकरी बांधवांनो, सरकारने अर्जातील सर्व चुका दुरुस्त करण्याचे स्वतंत्र अर्जदाराला दिलेले नाहीत. त्यासाठी मोठ्या चुका ह्या तुम्हाला तुमच्या नजीकच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत बोलून दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर तुमच्या जवळच्या "कॉमन सर्व्हिस सेंटर" (CSC) शी संपर्क साधून तुमच्या अर्जातील दुरुस्ती करू शकता.
पीएम किसान योजनेत चुकलेले नाव दुरुस्ती केल्याने तुम्हाला कोणते फायदे होतील?
👉 चुकीचे नाव वेळेवर दुरुस्त केल्याने तुमचे थांबलेले हफ्ते मिळण्यास मदत होईल. आणि तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
👉 पीएम किसानच्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती योग्य असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला योजनेचे आणि सरकारी अनुदाने पॅसीए वेळेवर मिळत राहतील.