मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत लाभार्थी महिलांची आकडेवारी
राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे २.५ कोटी महिला लाभ घेत आहेत. त्या कोणत्या महिला सविस्तर पाहू.
१) लाडकी बहीण योजनेत राज्यातील ८३% विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
२) राज्यातील ११.८% अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
३) राज्यातील ४.७% विधवा महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
४) राज्यातील १% पेक्षा कमी घटस्फोटित, निराधार आणि नवऱ्याने सोडून दिलेल्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत लाभार्थी महिलांची वयानुसार आकडेवारी
१) राज्यातील २१ ते २९ वयोगटातील २५.५% महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
२) लाडकी बहीण योजनेत राज्यातील ३० ते ३९ वयोगटातील २९% महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
३) ४० ते ४९ वयोगटातील २३.६% महिला योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे त्या पात्र आहेत.
४) ५० ते ५९ वयोगटातील २०% राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत.
५) ६० ते ६५ वयोगटातील ५% महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
मार्च महिन्याच्या हफ्त्या बद्दल अपडेट
जगात ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. त्याच दिवशी राज्यातील करोडो महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा ८ व्या हफ्त्याचे १५०० रुपये जमा करण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांनी घेतला आहे.
अदिती तटकरे बोलल्या की ८ मार्च रोजी शनिवार असल्याने हफ्त्याचे पैसे ६ ते ७ मार्चपासून महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. त्यासोबतच त्यांना मार्च महिन्याबद्दल विचारले गेले असता, मार्च महिन्याचा हफ्ता हा १० मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याचा पूर्ण अर्थसंकल्पानंतर देण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी कोणत्या तारखेला वाटला जाईल या विषयी कोणतीही माहिती दिली नाही.
लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत झालेले बदल
१) या योजनेत नवीन निकषानुसार आता पर्यंत ९ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहेत.
२) ज्या महिलांच्या घरात ४ चाकी वाहन असेल अशा सर्व महिलांना या योजनेपासून अपात्र ठरवण्यात आले आहे.
३) महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या वर असेल अशा सर्व लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे, आणि यांना मिळणार योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
४) महिलांच्या परिवाराचे उत्पन्न तपासण्यासाठी राज्यातील आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
५) लाडकी बहीण योजनेमधून स्वतः महिला माघारी घेत आहेत. त्यांची सुद्धा संख्या खूप मोठी आहे.
६) राज्यातील अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करत आहेत.
अर्थसंकल्पनेत लाडकी बहीण योजनेविषयी कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या घोषणा पत्रात एक घोषणा केली होती. राज्यात पुन्हा महायुती सरकार आले तर राज्यात जुने २०२४ मध्ये चालू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दिल्या जाणाऱ्या १५०० रुपये हफ्त्या ऐवजी त्यांच्या बँक खात्यात २१०० रुपये जमा करण्यात येतील.
पण राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाली आणि सरकारला २१०० बद्दल विचारले गेले असता, सरकारने स्पष्ट केले की येणाऱ्या अर्थसंकल्पात या विषयी तरतूद केली जाईल. तोपर्यंत राज्यातील महिलांना १५०० रुपये दिले जातील. आणि आता तो दिवस लवकरच उगवणार आहे.
१० मार्च २०२५ रोजी महायुती सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्यात लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांविषयी निर्णय घेतला जाईल. आणि राज्यातील करोडो महिलांना १५०० रुपये ऐवजी लवकरच २१०० रुपये देण्यात येतील.