Monday, 5 May 2025
English   हिंदी
Home  |  Farmer id: फार्मर आयडी काढणे झाले अजून सोपे, आता घरबसल्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी

Farmer id: फार्मर आयडी काढणे झाले अजून सोपे, आता घरबसल्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोबाईलवरून फार्मर आयडी काढण्याची संपूर्ण प्रक्रिया

"Farmer Self Registration" साठी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या दिलेल्या लिंकवर क्लिक करून घ्या. आणि खाली दिलेल्या सर्व स्टेप्स वापरून फार्मर आयडी तयार करा.

१) वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Farmer Registry पेज उघडेल. उजव्या बाजूला दोन पर्याय दिसतील: Official आणि Farmer. या मधून Farmer यावर क्लिक करा.

२) नंतर खाली "Create new user account" बटण दिसेल; त्या बटणावर क्लिक करा.

३) Aadhar E-kyc पेज उघडेल. त्यात आधार क्रमांक (Adhar Number) प्रविष्ट करून "Submit" बटणावर क्लिक करा.

४) पुढे तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल; तो टाकायचा आहे.

५) नंतर "Verify" बटणावर क्लिक करून घ्या.

६) पुढे शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण माहिती दिसेल. आता तुम्हाला "Agristack Portal" ला जो मोबाईल क्रमांक लिंक करायचा आहे, तो क्रमांक प्रविष्ट करून घ्या.

७) त्या क्रमांकावर OTP पाठवला जाईल. OTP टाकून मोबाईल क्रमांक "Verification" करून घ्या.

८) पुढे Agristack Portal वर लॉगिन कार्यासाठी Password सेट करून घ्या. त्यासाठी Set Password and Confirm Password टाकून "Create My Account" वर क्लिक करा आणि तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

९) रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर Agristack Portal वर तुमची प्रोफाईल तयार होईल.

१०) नंतर Ok वर क्लिक करा. तुम्ही आता परत लॉगिन पेजवर याल.

११) आता Username ज्या जागी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून Login करून घ्या.

१२) नंतर रजिस्टर As Farmer पर्यायावर क्लिक करा.

१३) पुढे तुम्हाला "Mobile Confirmation" साठी विचारले जाईल.

१४) मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर "Yes" वर क्लिक करा.

१५) मोबाईल क्रमांक बदलायचा नसेल तर "No" वर क्लिक करा.

१६) नंतर स्क्रीनवर Farmer ID Registration Form ओपन होईल.

१७) नंतर Farmer Details, जमिनीविषयी Details जसे खाते क्रमांक, जमिनीचे क्षेत्र, खातेदार याविषयी माहिती आणि इतर उर्वरित विचारलेली माहिती भरून घेणे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet