अपात्र लाडक्या बहिणीबद्दल
जेव्हा पासून लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात लागू झाली तेव्हा पासून ही योजना चर्चेचा विषय बनली आहे. कारण या योजनेत भष्ट्राचार झाल्याची चर्चा चांगलीच रंगली विरोधांकडून आरोपही करण्यात आले.
त्यानंतर योजनेत बदल करून संजय निराधार योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर सरकार आता पुन्हा नवीन निकष लावण्याच्या तयारीत आहे. त्या विषयी चर्चा ही रंगल्या होत्या. त्यात बोलले जात होते.
ज्या महिला अपात्र ठरतील त्यांच्याकडून योजनेच्या सर्व हफ्त्यांची वसुली केली जाईल. त्यानंतर सांगण्यात येत होते. ज्या महिला स्वतःहून समोर येणार नाही, त्यांच्या वर गुन्हा दाखल करून पैसे वसूल करण्यात येतील.
आणि काही महिला या स्वतःहून समोरसुद्धा आल्या आणि त्यांनी योजनेत घेतलेल्या लाभाचा पैसा परत करत आहेत. अशा प्रकारे खूप साऱ्या चर्चा चालू होत्या. पण मंत्री आदिती तटकरे पत्रकारांसोबत काय बोलले ते पाहू.
आदिती तटकरे अपात्र बहिणीबद्दल काय म्हणाल्या?
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती सुनील तटकरे आज मीडिया माध्यमांसोबत बोलल्या. मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र लाडक्या बहिणींविषयी भविष्यातील होणाऱ्या दुरुस्तीविषयी चर्चा केली.
त्या बोलल्या की या योजनेत अपात्र महिलांकडून कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही आणि पण त्यांना या पुढे लाभ दिला जाणार नाही. प्रत्येक सरकारी योजनेत निकषांमध्ये फेरबदल होत असतात.
मूल्यमापन करणे हे काही नवीन नाही. योजनांमध्ये अशा प्रकारे मूल्यमापन करण्यात येते. प्रत्येक योजनेत 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी या प्रकारे मूल्यमापन फेरफार चालत असतात.
त्यांना प्रश्न विचारण्यात आला की ज्या महिला स्वतःहून समोर येऊन सांगत आहेत की आम्ही योजनेत पात्र नाही अशा महिलांकडून पैशांची वसुली केली गेली का? या प्रश्नावर बोलताना बोलल्या की अजून अशा कोणत्याही महिलेकडून वसुली केली नाही आणि सरकारने वसुली करण्याविषयी कोणताही विचार केला नाही आणि वसुली करण्यात येणार नाही.
जो लाभ महिलांना आधी दिला गेला आहे, त्या विषयी प्रश्न येत नाही, पण अपात्र महिलांना या पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही.
जानेवारी महिन्यात जमा होणाऱ्या हफ्त्या विषयी
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की आतापर्यंत महिलांना 1500 रुपये प्रमाणे डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हफ्ते DBT च्या माध्यमातून बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
आणि पुढील म्हणजे जानेवारी महिन्यांचा 1500 रुपयांचा हफ्ता हा 26 जानेवारी 2025 पर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या हफ्त्याविषयी सविस्तर माहिती वाचण्यासाठी – इथे क्लिक करा.
पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज आणि मंजूर झालेले अर्ज
सरकाने या योजनेत रेजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात ही मोबाईल अँपवरून केली, पण महिलांना फॉर्म भरण्यात अडचण येत असल्याने सरकारने लाडक्या बहिणींसाठी वेबपोर्टल विकसित केले. या वेबपोर्टलवर आता पर्यंत किती महिलांनी अर्ज केले आहेत आणि किती महिलांना मंजुरी मिळालेली आहे, ते खालील तक्त्यात पाहू शकता.
प्राप्त अर्जांची संख्या (Number of applications received) | मंजूर अर्जांची संख्या (Number of applications approved) |
---|---|
11270261 | 10669139 |
हेल्पलाइन क्रमांक
योजनेविषयी काही प्रश्न आणि तक्रार असेल तर समोर दिलेल्या टोल फ्री संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता: 181
निष्कर्ष (Conclusion)
आपण या लेखात पाहिले की अपात्र महिलांविषयी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी पत्रकारांसोबत चर्चा करून लाडक्या बहिणींविषयी घेण्यात येणाऱ्या निर्णयांविषयी सविस्तर माहिती दिली. अपात्र महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
त्या सोबत पुढील कोणताही हफ्ता हा महिलांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा होणार नाही. ज्या महिलांनी स्वतःहून सांगितले, त्यांच्या कडून अजून कोणत्याही प्रकारची वसुली केली गेली नाही, असे त्या बोलल्या. आपण पहिले पुढचा हफ्ता कधी जमा होणार आहे आणि वेबपोर्टलवर रजिस्टर झालेले अर्ज आणि मंजूर झालेल्या अर्जांबद्दल माहिती पाहिली.
FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1. जानेवारी महिन्यात मिळणाऱ्या हफ्त्यात किती रुपयांचा निधी मजूर करण्यात आला आहे?
उत्तर: महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने 3690 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिण योजनेसाठी मंजूर करून दिला आहे.
प्रश्न 2. कोणत्या तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार आहे?
उत्तर: 26 जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 7व्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत.