Home  |  रेशन कार्ड e-KYC करण्याची शेवटची मुदत! ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रेशन मिळणार नाही

रेशन कार्ड e-KYC करण्याची शेवटची मुदत! ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रेशन मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

का महत्त्वाची आहे रेशन कार्ड ई-केवायसी?

आता पर्यंत तीनदा मुदत वाढ देण्यात आली होती. आणि आता ही चौथी मुदतवाढ असून या पुढे ई-केवायसी करण्याची संधी दिली जाणार नाही. असे स्पष्ट संकेत विभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे मिळालेल्या या चौथ्या मुदतवाढीचा लाभ घ्या आणि ३० एप्रिल २०२५ च्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास अशा सर्व लाभार्थीना ३० एप्रिल नंतर रेशनचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अशा लोकांना मोफत किंवा अनुदानित धान्य मिळणे बंद होईल. म्हणून पुन्हा एकदा सांगू इच्छितो, वेळीच रेशन कार्ड ई-केवायसीचे काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची मुदत

२०२४ पासून देशातील असंख्य रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे. ई-केवायसी प्रक्रियेचे मुख्य वैशिष्ट्य यात पारदर्शकता आणणे, फसव्या आणि मृत व्यक्तींची नावे ओळखून कमी करणेआहे. सध्या राज्यात अनेक रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. अशा सर्व नागरिकांसाठी ३० एप्रिल ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाइन ई-केवायसी कशी करावी?

1️⃣ ऑनलाइन ई-केवायसी करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर ‘मेरा KYC’ आणि ‘Aadhaar Face RD’ हे ॲप्स डाउनलोड करा.
2️⃣ ॲप उघडून विचारलेले सर्व परवानग्या द्या. नंतर तुमचे राज्य निवडून घ्या. (उदा. महाराष्ट्र)
3️⃣ आधार क्रमांक टाकल्यानंतर, तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) पाठवला जाईल.
4️⃣ ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या समोर लाभार्थ्यांची माहिती आणि ई-केवायसीचे स्टेटस दिसेल.
5️⃣ माहितीच्या खाली चेहऱ्याची ओळख (Face Verification) करण्याचे बटन दिले आहे. त्यावर क्लिक करा.
6️⃣ Face Verification प्रक्रिया कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. ती वाचून पुढे जा.
7️⃣ Face Verification झाल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
8️⃣ तुम्ही पुन्हा लाभार्थ्यांची माहिती पाहिली असता खाली e-KYC Status "Y" दिसेल. याचा अर्थ तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

ऑफलाइन ई-केवायसी कशी करावी?

1️⃣ तुमच्या गावातील किंवा जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
2️⃣ रेशन कार्डाची प्रत (Ration Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) सोबत ठेवा.
3️⃣ रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या बायोमेट्रिक मशीनवर (Biometric Machine) तुमच्या बोटांचे ठसे उमटवून पडताळणी (Verification) पूर्ण करा.

काय करावे?

1️⃣ ज्या कार्डधारकांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, अशा सर्व कार्डधारकांनी ३० एप्रिलपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.
2️⃣ यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड तयार ठेवा.
3️⃣ जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि या पुढे असाच तुमचा लाभ सुरू ठेवा.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW