Home  |  लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता एकाच दिवशी मिळणार

लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता एकाच दिवशी मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक्सवर मंत्री अदिती तटकरे यांनी काय पोस्ट केली

दोन दिवसांपूर्वी माध्यमांसोबत बोलताना अदिती तटकरे यांनी फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता महिलांच्या बँक खात्यात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसाच्या दिवशी जमा करण्यात येईल आणि मार्च महिन्याचा हफ्ता हा १० मार्च २०२४ होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

असे त्या बोलल्या होत्या, पण आज थोड्या वेळेपूर्वी त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून घोषणा केली आहे. त्यात त्या काय बोलल्या आणि महिलांना कशा पद्धतीने आनंदाची बातमी दिली ते पाहू. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जाणार आहे.

त्यामुळे अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनते पात्र करोडो महिलांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ३००० रुपयांचे मोठे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लागणार निधी हा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी महिला व बालविकास विभागाकडे दिला आहे. जेणेकरून राज्यातील करोडो महिलांना योजनेचा हफ्ता मिळावा आणि राज्यातील कोणतीही लाभार्थी पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये.

एक्स अकाउंटवर बोलताना अदिती तटकरे यांनी लिहिले आहे की ७ मार्च २०२५ पर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा सम्मान निधी ३ हजार रुपये जमा करण्यात येईल. यामुळे राज्यातील गरीब, मोलमजुरी करणाऱ्या अशा भरपूर साऱ्या पात्र महिलांना ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता कोणाला मिळेल?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता हा फक्त योजनेत पात्र महिलांना देण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून अर्जाची छाननी प्रक्रिया चालू होती आणि यात प्रत्येक जिल्ह्यातून हजारो महिला अपात्र ठरत आहेत. अशा अपात्र महिलांना या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही आणि या पुढे "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" चा लाभ मिळणार नाही.

आता पर्यंत किती हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै २०२४ मध्ये करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येत आहेत.

या योजनेत आतापर्यंत जुलै (July), ऑगस्ट (August), सप्टेंबर (September), ऑक्टोबर (October), नोव्हेंबर (November) आणि डिसेंबर (December), जानेवारी (January) असे सर्व महिने मिळून ७ महिन्यांचे १० हजार ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. आणि येत्या १ ते २ दिवसात राज्यातील पात्र करोडो महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी (February) आणि मार्च (March) महिन्याचे ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

८ मार्च २०२५ विशेष

८ मार्च २०२५ रोजी "आंतरराष्ट्रीय महिला दिन" म्हणून जगात साजरा केला जातो. हा दिवस जगातील सर्व महिलांसाठी त्यांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुरु करण्यात आला होता. सर्वात आधी १९०८ मध्ये न्यूयॉर्कमधून महिला आणि त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले.

त्या आंदोलनात समान वेतन, कामाचे तास आणि मतदानाचा अधिकार हे प्रमुख मुद्दे होते. त्यानंतर १९१० जर्मन येथील समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी जगात महिला दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली. आणि अखेर १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) घोषणा करत जगात ८ मार्च हा महिला दिवस म्हणून घोषित केला. जगात ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी जगात महिला शक्तीला सन्मान देणारे कार्यक्रम केले जातात. त्या अनुषंगाने राज्यात ८ मार्च दिवस साजरा केला जाणार आहे आणि महिलांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत. आणि हाच मोठा सन्मान महिलांचा असणार आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरकारकडून राज्यातील महिलांच्या अपेक्षा

राज्यातील महिलांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. राज्यात कुठे रेप तर कुठे विनयभंग तर कुठे छेडखानी केली जाते. हे सर्व थांबवण्यात सरकार ज्या दिवशी यशस्वी ठरेल, तोच दिवस राज्यातील करोडो महिलांसाठी महिला दिवस असेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW