महाडीबीटी तुषार/ठिबक अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे
1️⃣ ७/१२ उतारा ऑनलाईन पद्धतीने काढलेला किंवा गावातील तलाठीने स्वाक्षरी केलेला (उतारा हा जास्त जुना नसावा, मागील ६ महिन्यांचा असेल तरी तो चालेल, पण त्यापेक्षा जुना उतारा नको).
2️⃣ ८ अ गाव नमुना असेलेला डिजिटल स्वाक्षरी केलेला असला पाहिजे किंवा तलाठी स्वाक्षरीत केलेला हवा. उतारा हा ६ महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. नवीन उतारा काढून अपलोड करावा.
3️⃣ तुम्ही सामाईक क्षेत्रासाठी लाभ घेत असाल तर तुम्हाला इतर खातेदारांचे संमतीपत्र बनवावे लागेल आणि ते अपलोड करावे लागेल.
4️⃣ काही वेळेस ७/१२ उताऱ्यावर सिंचन स्त्रोत नोंद नसते, पण पाण्यावर आपला हक्क असल्याने आपण शेतात ठिबक सिंचन करतो. अशा वेळेस तुम्हाला स्वयंघोषणा पत्र अपलोड करावे लागेल.
5️⃣ घरातील अज्ञान म्हणजे 18 वर्षाखालील मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने अर्ज केला असेल तर अपा क स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागेल.
6️⃣ तुम्ही SC/ST मधून योजनेचा लाभ घेत असाल किंवा इतर लाभार्थी असाल आणि तुम्हाला वैध जात प्रमाणपत्र आवश्यक असेल तर ते सुद्धा अपलोड करावे.
7️⃣ लाभार्थ्यांचे अपडेटेड आधार कार्ड (संपूर्ण जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांकाशी अपडेट पाहिजे)
8️⃣ बँक खाते पासबुक (ई-केवायसी केलेले, आधार कार्ड बँक खात्यासोबत अपडेटेड आणि मोबाईल क्रमांक अपडेटेड)
9️⃣ ठिबक आणि तुषार सिंचनासाठी आलेल्या खर्चाच्या सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करणे
वरील प्रमाणे तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड केले असता, तुमचा अर्ज त्रुटीमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळेल. पण न विसरता, ही सर्व कागदपत्रे आणि अजून कोणतीही इतर कागदपत्रे मागितले असतील, तर ती सुद्धा अपलोड करणे जेणेकरून तुमचा अर्ज त्रुटीमध्ये जाणार नाही.