Home  |  अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज.

अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना तपशील

योजनेचे नाव अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (Annasaheb Patil Karj Yojana)
विभाग कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी तरुण-तरुणी
उद्देश महाराष्ट्र राज्यातील तरुण तरुणींना स्वतःच्या व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज
अर्ज पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://udyog.mahaswayam.gov.in/

का चालू केली अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना (Annasaheb Patil Karj Yojana)

राज्यात प्रत्येक वर्षी खूप सारे तरुण शिक्षण पूर्ण करतात. त्यातले काही तरुण त्यांच्या घरच्या व्यवसायाकडे वळतात, तर काही तरुण नोकरीला लागतात. बाकी तरुण घरच्या आर्थिक परिस्थिती पाहून त्यांच्या मनातील व्यवसाय करण्याच्या कल्पना ह्या कल्पनाच ठेवून घरासाठी धावपड करू लागतात.

पण इच्छा नसून हे फक्त घरासाठी त्यांना नोकरी करावी लागते. नाहीतर राज्याच्या बहुतांश तरुणांकडे व्यवसायाचे नवनवीन कल्पना असतात, पण आर्थिक परिस्थिती आणि भांडवलामुळे त्यांना परिस्थितीच्या पुढे जाता येत नाही. आणि जे तरुण त्यांच्या पूर्वजांच्या व्यवसायाकडे जातात, त्यांनाही त्यात बदल हवा असतो.

मग बदल आणि नवा व्यवसाय आला म्हणजे त्यासाठी लागणारे भांडवल, मग तरुण त्याच्या कल्पना घेऊन बँकांकडे जातो आणि त्यांची नियम आणि अटी शर्ती पाहून तरुण निराश होतो. कारण त्याच्याकडे कौशल्य असूनसुद्धा फक्त भांडवलामुळे त्याला स्वतःला सिद्ध करता येत नाही.

पण आता असं होणार नाही, महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ साली अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची (Annasaheb Patil Karj Yojana) स्थापना केली. स्वतःचा व्यवसाय चालू करणाऱ्या आणि जे तरुण आधीपासून व्यवसाय करत असतील अशा तरुणांसाठी योजनेतून भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. या योजनेत तरुणांना बिनव्याजी १५ लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.

जेणेकरून राज्यातील गरीब तरुणही त्याच्या व्यवसायासाठी एक उंच भरारी घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ या कर्जाचं व्याज भरणार आहे. म्हणून तरुणानं व्यवसाय करताना फक्त मुद्दल फेडण्याची चिंता असणार आहे.

पण साहजिकच तुम्हाला प्रश्न पडले असतील. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील, त्याची नेमकी प्रक्रिया कशी आहे, योजनेमधून कर्ज मिळत कसे, हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल. तर चिंता करू नका, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही सुद्धा या कर्जासाठी अर्ज करू शकता.

योजनेसाठी पात्रता आणि अटी

1. योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

2. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे किमान वय १८ वर्ष पूर्ण पाहिजे. अर्जदार पुरुष असेल तर कमाल वय ५० वर्ष, आणि अर्जदार महिला असेल तर त्या साठी कमाल वय ५५ वर्ष असावं.

3. अर्जदाराने अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नको.

4. अर्जदाराने हा आधीपासून व्यवसाय करत असेल तर त्याच्याजवळ त्याच्या व्यवसायाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे (उद्योग आधार आणि शॉप ॲक्ट लायसन्स).

5. एका कुटुंबातून एकच अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

6. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांवर नको.

7. अर्जदाराने दुसऱ्या कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं असेल तर तुम्ही अर्ज नाही करू शकत. तुमचं कर्ज व्यवस्थित रित्या भरले असेल म्हणजे पूर्ण केलं असेल, तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.

8. व्यावसायिक नागरिक जे गटागटाच्या माध्यमातून अर्ज करत असतील, तर अशा अर्जदारांचे किमान शिक्षण हे १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

9. दिव्यांगांसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी अपंग प्रमाणपत्र लागेल.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

1. अर्जदाराकडे अपडेटेड आधार कार्ड (Aadhar Card) असणे आवश्यक आहे.

2. अर्जदाराकडे पॅन कार्ड (Pan Card) असणे आवश्यक आहे.

3. अर्जदाराकडे रेशन कार्ड (Ration Card) असणे आवश्यक आहे.

4. अर्जदार जिथे वास्तव्यासाठी आहे, तिथला रहिवाशी दाखल. (Residence Proof)

5. वार्षिक उत्पन्न दाखल. (Annual Income Certificate)

6. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. (2 Passport Size Photos)

7. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या तुमच्या बँक खात्याची सर्व माहिती. (Bank passbook)

8. मोबाईल नंबर (Mobile Number), ई-मेल आयडी (Email ID).

9. तुमच्या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती असणारा अहवाल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा | Annasaheb Patil Loan Apply Online

1: महाराष्ट्र सरकारने अधिकृत केलेल्या वेबसाईटवर जावे. वेबपोर्टलवर जाण्यासाठी समोरच्या लिंकवर क्लिक करा. - येथे क्लिक करा

2:  तुमचं वेबपोर्टलवर अकाउंट नसेल तर आधी अकाउंट बनवून घ्या.

3:  युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरून डॅशबोर्ड उघडून घेणे.

4:  आता डॅशबॉर्डवर तुम्हाला “View Profile” नावाचं बटण दिसेल. त्या बटनावर क्लिक करून तुमची प्रोफाइल उघडून घ्या.

5:  तुम्हाला आता विचारलेली संपूर्ण माहिती खात्री करून आणि नचुकता भरून घ्यायची आहे आणि सांगितलेले कागदपत्र अपलोड करायचे आहे.

6:  माहिती भरली गेल्यानंतर खाली तुम्हाला उपलब्ध योजनांविषयी माहिती दिली जाईल.

7:  संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला घ्यावयाच्या योजनेसमोरील लागू करा स्तंभातील “पहा” बटनावर क्लिक करा.

8: पुढच्या स्टेपमध्ये योजनेविषयी सर्व माहिती, पात्रता आणि अटी दिसतील.

9: नंतर शेवटच्या "अर्ज करण्यासाठी" टॅबवर क्लिक करायचे आहे.

10: आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि "लागू करा" बटनावर क्लिक करायचे आहे.

11: आता तुम्हाला तुमच्या 8 लाखांच्या उत्पन्नाबद्दल विचारले जाईल. "Yes" बटनावर क्लिक करून पुढे जा.

12: तुम्ही या कर्जासाठी नवीन असाल तर "Yes" बटनावर क्लिक करायचे आहे.

13: आता तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, त्यात वैयक्तिक माहिती, निवासी तपशील, कर्ज तपशील, अपलोड हे 4 टॅब दिसतील. आता ते एक एक करून भरून घ्या.

14: वैयक्तिक माहिती ही आधीपासून भरून येईल. त्यात आवश्यक असेल तर बदल करा, नाहीतर पुढे "नीवासी तपशिलावर" क्लिक करा.

15: निवासी पत्ता भरून घ्यायचा आहे. कायम आणि सध्याचा पत्ता सारखा असेल तर खाली दिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा.

अनुक्रमांक निवासी पत्ता
1 गाव, शहर, तालुका, जिल्हा निवडून घ्या.
2 शैक्षणिक माहिती निवडून घ्या.
3 तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? असेल तर "Yes" निवडा, नाहीतर "No" निवडा.
4 तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर नंबर भरून घ्या.
5 तुम्ही दिव्यांग असाल तर "Yes" निवडा, नाहीतर "No" निवडा.

16: माहिती भरल्यानंतर "अर्ज जतन करा" वर क्लिक करा.

17: आता पुढच्या कर्ज तपशीलामध्ये विचारलेली माहिती अचूक भरून घ्यायची आहे.

अनुक्रमांक कर्जाबद्दल तपशील
1 तुमच्या व्यवसायाचे नाव भरा.
2 व्यवसायाची श्रेणी निवडून घ्या.
3 व्यवसायाची उपश्रेणी निवडून घ्या.
4 दिलेल्या श्रेणीमध्ये तुमचा व्यवसाय नसेल तर "Other" निवडा आणि पुढे तुमच्या व्यवसायाची श्रेणी भरून द्या.
5 व्यवसायापासून निर्माण होणारी वस्तू काय आहे, भरून द्या.
6 ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तिथला पत्ता भरा.
7 तुम्हाला व्यवसायासाठी लागणारी कर्जरक्कम भरा.

18: माहिती भरल्यानंतर "अर्ज जतन करा" वर क्लिक करा.

19: आता तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर तुम्ही भरलेल्या अर्जाचा क्रमांक दिसेल. त्याचा फोटो काढून घ्या. तो पुढे लागणार आहे.

20: आता अर्ज क्रमांकावर क्लिक करून पुन्हा कागदपत्र अपलोड करण्यासाठी "अपलोड" या टॅबवर क्लिक करून घेणे.

21: आता तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी तुमच्याकडे असलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. 10 MB खालील आकार असलेले फोटो अपलोड करायचे आहेत. आणि फोटो हे .png, .jpg, .jpeg, .bmp असणे आवश्यक आहे.

लागणारी कागदपत्रे दिलेली कागदपत्र अपलोड करू शकता
महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा पुरावा भाडेकरार, वीज बिल, गॅस सिलेंडर जोडणी, दूरध्वनी बिल, बँकेची पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट.
आधार कार्ड आधार कार्डची पुढील आणि मागील असलेली छायाप्रत.
उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचा उत्पन्न दाखला, कुटुंबाचा आयकर भरणा (पती आणि पत्नी दोघांपैकी एक).
जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला Caste Certificate, Leaving Certificate.
प्रकल्प अहवाल तुमच्या प्रकल्पाविषयी सविस्तर असे Document (Preference PDF format).
स्व-घोषणा दस्तावेज प्रिंट काढून त्यात विचारलेली माहिती भरून आणि सही व तारीख टाकून अपलोड करणे.

22: शेवटी "अर्ज जतन करा" वर एकदा क्लिक करायचे आहे. म्हणजे तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे सेव्ह होतील.

23: सबमिट बटनावर क्लिक करा आणि तुमच्या समोर एक मॉडेल उघडेल, त्यात तुमची माहिती तपासून घ्या.

24: दिसत असलेली माहिती बरोबर असेल तर "I Agree" बटनावर क्लिक करा. आता तुमच्या समोर फॉर्म भरल्याचा क्रमांक दिसेल. नंतर "OK" बटनावर क्लिक करा.

25: तुमच्या फॉर्मचा स्टेटस "Pending" दिसेल. आयोग तुम्ही भरलेली माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे तपासून तुम्हाला मान्यता मिळेल.

अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना

क्रमांक योजना
1 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
2 गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
3 गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)

अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

अण्णासाहेब पाटील महामंडळच्या वेब पोर्टलवर उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

क्रमांक उपलब्ध सुविधा यादी
1 विविध विभागांतील उमेदवारांसाठी महामंडळाची योजना.
2 उमेदवाराच्या पात्रतेनुसार योग्य स्वयं रोजगार योजना शोधणे.
3 उमेदवारांना स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
4 कर्जाची पात्रता, अटी व शर्ती, कर्ज मंजुरी, कर्ज कागदपत्रे इ. माहिती
5 ऑनलाइन जमा केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्याची स्थिती पहा.
6 वेब पोर्टलवर 250 पेक्षा जास्त नमुना प्रकल्पाची उपलब्धता.
7 व्याज देयके मोजण्यासाठी(EMI calculator).
8 उमेदवारांच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाइन.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनाचे फायदे | Benefits of Annasaheb Patil Corporation Loan Scheme

बिनव्याजी कर्ज

तरुणांना अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते, त्यामुळे त्यांना व्याजाची चिंता न करता व्यवसाय सुरू करता येतो.

व्यवसायास आर्थिक मदत

महाराष्ट्रातील तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तरुणांचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आर्थिक मदत करते.

तरुणांच्या कौशल्याला पाठबळ

व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा पण भांडवलामुळे अडचणीत असलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील योजनांतर्गत मोठी संधी मिळणार आहे. तरुणांच्या व्यवसायाला नवीन चालना मिळवून देण्याचे काम ही योजना करते.

रोजगार निर्मिती

राज्यातील तरुण अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरू करतील आणि इतर बेरोजगार तरुणांना रोजगार देऊन मदत करतील. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मनुष्यबळ मिळेल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा कमी होईल.

अर्ज प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक आहे.

अण्णासाहेब पाटील योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे सत्यापित करण्याची प्रक्रिया सोपी आहे. लाभ घेताना कोणत्याही दलालांची गरज नसून योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया खूप सोपी व पारदर्शक आहे.

महिला व दिव्यांगांसाठी सवलत

राज्यातील व्यवसाय करू इच्छित महिलांसाठी व अपंग व्यक्तींसाठी अतिरिक्त सूट आणि पात्रता अटी सोप्या आहेत. जेणेकरून राज्यातील महिला आणि अपंग व्यक्ती सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरु करून रोजगार निर्मिती करून राज्याच्या आणि देशाच्या कामात मोठा हातभार लावू शकतील.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनाचे तोटे | Disadvantages of Annasaheb Patil Corporation Loan Scheme

कर्जाची परतफेड

अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ घेऊ इच्छित तरुण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही हे कर्ज घेतले तर याची परतफेड करणे अनिवार्य आहे. बिनव्याजी कर्ज असलं तरी मुद्दल खूप मोठं आहे.

तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी न झालात तर तुम्हाला हे कर्ज परतफेड करणे कठीण होईल. कारण तुम्ही पूर्ण पैसे हे तुमच्या व्यवसायात लावले असणार आणि तुमच्या हातात पैसे नसणार, म्हणून तुम्हाला कर्ज फेडणे जड जाऊ शकते.

कर्ज मंजुरीचा कालावधी

तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. बिनव्याजी कर्ज असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज केले जातात. त्या अर्जाची पडताळणी, त्यासोबत तुमच्या व्यवसायाची पूर्ण माहिती तपासणे अशा वेगवेगळ्या निकषांना तपासण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे कर्ज मंजूर होण्यास विलंब होऊ शकतो.

पात्रता निकष

तरुण मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुम्ही अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या प्रकल्पाविषयीचा संपूर्ण अहवाल बनवावा लागेल. आणि तरुणांना अहवाल बनवणे कठीण ठरू शकते.

तुमच्याकडे प्रकल्प अहवाल असणे बंधनकारक आहे

ही योजना महाराष्ट्रातील रहिवासी तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यासोबतच योजनेत पात्र ठरण्यासाठी ठरवून दिलेल्या अटी पूर्ण कराव्या लागतील.

केवळ एक व्यक्ती लाभास पात्र

अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबातून कोणी कर्ज घेतले असेल तर तुम्हाला हे कर्ज मिळणार नाही. कारण योजनेचा नियम असं सांगतो की एक कुटुंबातून फक्त एकच लाभार्थी लाभ घेऊ शकतो.

निष्कर्ष (Conclusion)

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना आल्यापासून महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल. अण्णासाहेब पाटील महामंडळ तरुणांसाठी खूप साऱ्या योजना राबवते, त्यातील ही एक. या लेखात योजनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

तरी तुम्ही योजनेस पात्र असाल तर नक्की योजनेचा लाभ घ्या आणि तुमचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करा. योजनेसाठी पात्रता, कागदपत्रे, लाभ कसा मिळेल, योजनेत किती रुपयांची राशी दिली जाते, योजनेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकता, या विषयी माहिती तुम्ही वरील लेखामध्ये वाचू शकता.

FAQ's: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?
उत्तर:  मराठा समाजातील होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू असलेल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी बिनव्याजी कर्ज प्राप्त करून दिले जाते. तरुणांना बँकेतून कर्ज लवकर मिळावे म्हणून योजनेमार्फत LOI दिला जातो.

कर्ज मंजूर झाल्यानंतर या कर्जावरील व्याज हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फेडते, तर मुद्दल ही तरुणाला फेडावी लागते. कर्ज घेण्यासाठी तरुणाकडे व्यवसायाची पूर्ण माहिती हवी. या योजनेचा लाभ हा ऑनलाइन पद्धतीने घेता येतो.

प्रश्न 2: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी किती वयोमर्यादा आहे?
उत्तर:  योजनेत महिलां आणि पुरुषांसाठी वयोमर्यादा ठरवली आहे. या योजनेत 50 वयोवर्षांपर्यंतचे पुरुष लाभ घेऊ शकतात, तर 55 वयोवर्षांपर्यंतच्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न 3: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कधी सुरू झाले?
उत्तर:  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 27 नोव्हेंबर 1998 मध्ये सुरू करण्यात आली.

प्रश्न 4: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी जास्तीत जास्त किती रक्कम दिली जाते?
उत्तर:  या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे व्यवसाय उद्योगधंदा चालू करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी दिले जाते.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Mukhyamantri ladki bahin yojana

सरकार देणार लाडक्या बहि‍णींची भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरमध्येच

Mukhyamantri ladki bahin yojana 2024

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होन सुरु

Mukhyamantri annapurna yojanet badal

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत बदल हे काम करा तरच मिळणार पैसे

E shram card yojana 3000 rupees pension scheme

ई-श्रम कार्ड वर कामगार आणि मजूरांना 3,000 रुपये मिळणार आहेत का?

Mukhyamantri mazi ladki bahin yojana mazi fake news

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने विषयी अफवा

Mukhyamantri mazi ladki bahin yojana 6th installment update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता महिलांना कधी मिळणार

Bsnl ne update kiya logo aur slogan

BSNL अपडेट: लोगो आणि स्लोगनमध्ये बदल, नवीन सात सेवा देखील सुरू केल्या

Maharashtrat mahilana swalambi banvnyasathi rabavlya janarya yojana

महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या योजना

Ration card e kyc new date release

रेशन कार्ड विषयी सविस्तर माहिती आणि रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची तारीख बदलली

Ladki bahin yojanet don mothe badal

लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल महिलांना पैसे मिळणार की नाही?

Identity cards will be accepted for voting

मतदान ओळखपत्र नाही? मतदान करण्यासाठी 'हे' 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

Jaykumar bhau rawal yancha vijay 2024

महाराष्ट्र विधानसभा 2024: जयकुमार भाऊ रावल यांचा ऐतिहासिक विजय