Tuesday, 17 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  PVC Pipe Subsidy: सरकार देत आहे महाडीबीटीच्या मार्फत पीव्हीसी/एचडीपीइ पाइपसाठी १५ हजार रुपयांचे अनुदान | अर्ज करण्याची संपूर्ण माहिती?

PVC Pipe Subsidy: सरकार देत आहे महाडीबीटीच्या मार्फत पीव्हीसी/एचडीपीइ पाइपसाठी १५ हजार रुपयांचे अनुदान | अर्ज करण्याची संपूर्ण माहिती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीव्हीसी/एचडीपीइ पाइपसाठी देण्यात येणारे अनुदान (PVC Pipe Subsidy)

कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना पीव्हीसी/एचडीपीइ पाइपसाठी अनुदान देण्यात येते. ते अनुदान किती असते आणि कशा प्रकारे त्याचा हिशोब केला जातो , त्याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

1️⃣ शेतकऱ्यांना पूर्ण किंमतीच्या ५०% अनुदान देण्यात येते.
2️⃣ ३५ रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त १५,००० रुपये अनुदान देण्यात येते.
3️⃣ वरील दोघांपैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देण्यात येते.
4️⃣ एचडीपीइ पाइपसाठी ५० रुपये प्रति मीटर प्रमाणे अनुदान देण्यात येते किंवा जास्तीत जास्त १५,००० रुपये देण्यात येतात.

पीव्हीसी/एचडीपीई पाइप अनुदानासाठी निवड प्रक्रिया

1️⃣ शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे.
2️⃣ शेतकऱ्याने महाडीबीटीमार्फत ऑनलाईन अर्ज केलेला हवा.
3️⃣ लाखो शेतकऱ्यांमधून लॉटरी पद्धतीने शेतकऱ्याची निवड करण्यात येते.
4️⃣ पीव्हीसी/एचडीपीइ पाइप विकत घेताना त्यांना CML नंबर असणे अनिवार्य आहे.
5️⃣ तुम्ही ज्या विक्रेत्याकडून पाईप खरेदी करणार आहात, त्याच्या जवळ पाइप विकण्यासाठी लागणारे डीलरशिप प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पीव्हीसी/एचडीपीइ पाइप ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (PVC Pipe online application)

आता पीव्हीसी/एचडीपीइ पाइप (PVC Pipe/HDPE Pipe) योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारे महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, त्याविषयी सविस्तर स्टेपनुसार माहिती पाहू.

स्टेप 1: शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर "लॉगिन" करून घेणे (mahadbt login)

स्टेप 2: आता वरती देण्यात आलेल्या पर्यायांमधून "अर्ज करा" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: पुढे "सिंचन साधने व सुविधा" ही बाब निवडून घ्यायची आहे.

स्टेप 4: आता तपशीलामध्ये खूप पर्याय दिलेले असतील, तुम्ही "पीव्हीसी किंवा एचडीपीइ पाइप" हा पर्याय निवडून घ्यायचा आहे.

स्टेप 5: आता पुढे पाइपची लांबी विचारली असेल, आता पाइपची लांबी ही मीटरमध्ये भरावी.

स्टेप 6: तुम्ही पीव्हीसी पाइपसाठी 428 मीटर लांबी आणि एचडीपीइ पाइपसाठी 300 मीटर लांबी भरावी.

स्टेप 7: खाली दिलेल्या "अर्ज जतन" वर क्लिक करून आपला भरलेला अर्ज जतन करून घ्यावा.

स्टेप 8: नंतर मुख्य पृष्ठावर यावे. मुख्य पृष्ठावरील "अर्ज सादर करा" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9: पुढे विचारण्यात येणारी संपूर्ण माहिती न चुकता भरून घ्या. म्हणजे तुमची प्रोफाइल पूर्ण करून घ्या.

स्टेप 10: आता तुमच्या समोर तुम्ही भरलेले सर्व अर्ज दिसतील. त्या सर्वांना प्राधान्यक्रम द्यावा म्हणजे तुम्हाला ज्या योजनेचा लाभ लवकर हवा आहे, ती योजना टॉपमध्ये निवडावी, नंतर बाकी योजना निवडाव्यात.

स्टेप 11: पुढे खालील "अर्ज सादर करा" या बटणावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सादर करा. आणि निवड यादी जाहीर होण्याची वाट पहा.

महाडीबीटी पोर्टलवर पीव्हीसी किंवा एचडीपीई पाइपसाठी (PVC Pipe/HDPE Pipe) ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यासाठी वरील सर्व स्टेप फॉलो करा आणि अनुदानासाठी अर्ज सादर करा.

लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक शेतकऱ्यांची निवड केली जाते. तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाविषयी विचार करण्यात येईल, आणि कृषि विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सोड यादीमध्ये लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांची निवड होईल, त्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून निवड झाल्याबद्दल कळवण्यात येईल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet