Home  |  प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने विषयी संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने विषयी संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तपशील

योजनेचे नाव प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना
योजनेची सुरुवात भारत सरकार
अर्थसंकल्प 2024-2025
विभागाचे नाव कॉर्पोरेट मामलों का मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Corporate Affairs, Government of India)
उद्देश भारतातील एक कोटी बेरोजगार तरुणांना इंटर्नशिप प्रदान करणे
लाभार्थी भारतातील बेरोजगार तरुण
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट https://pminternship.mca.gov.in/login/#

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना | PM Internship Yojana

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी 800 कोटी रुपयांची PM इंटर्नशिप योजना (अंदाज) जाहीर केली. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 1 कोटी बेरोजगार तरुणांना इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आणि 2025 मध्ये एक लाख 25 हजार तरुणांना इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेत केंद्र सरकारचे आरक्षण धोरण लागू केले जाणार आहे. पीएम इंटर्नशिप योजना 12 महिन्यांसाठी असेल, यामध्ये इंटर्नशिपसाठी निवडलेल्या आणि कंपनीत सामील झालेल्यांना केंद्र सरकार एकरकमी 6,000 रुपये आणि 5,000 रुपये प्रति महिना आर्थिक मदत देईल.

यामध्ये 4500 रुपयांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून आणखी 500 रुपये कंपनीकडून देण्यात येईल. या योजनेअंतर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. भारत सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत प्रत्येक वैयक्तिक युवकाला विमा संरक्षण प्रदान केले जाईल, याशिवाय कंपनी युवकांना अपघात विमा देखील देऊ शकते.

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी पात्रता

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी उमेदवाराची पात्रता विविध निकषांद्वारे निश्चित केली जाईल.

  • उमेदवार लाभार्थी तरुण हा भारताचा नागरिक असावा.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय हे फक्त 21 ते 24 वयोगटातील असणे आवश्यक आहे. आणि तेच लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
  • लाभार्थी तरुण हा शिक्षण घेत असेल किंवा कुठे कामात गुंतलेला असेल तर असा लाभार्थी तरुण अर्ज करू शकत नाही.
  • ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रम (विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय शिकण्याची संधी देणारे शैक्षणिक कार्यक्रम) उमेदवार अर्ज करू शकतात.
  • शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण, ITI प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पदवी जसे की BA, B.Sc, B.Com, BCA, BBA, B.Pharma, इ. अर्ज करू शकतात.

पीएम इंटर्नशिप योजनेच्या अपात्रतेच्या अटी

1. IITs, IIMs, राष्ट्रीय कायदा विद्यापीठे, IISERs, NIDS आणि IIITs तरुण अपात्र आहेत.

2. CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, कोणतेही पदव्युत्तर किंवा उच्च पदवीधारक तरुण अपात्र आहेत.

3. कोणताही उमेदवार जो कौशल्य, इंटर्नशिप, विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षणार्थीशी संबंधित आहे तो अपात्र आहे.

4. नॅशनल ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) आणि नॅशनल ॲप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेला कोणताही उमेदवार अपात्र आहे.

5. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे उत्पन्न 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते तरुण अपात्र आहेत.

6. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणताही तरुण जो सरकारी नोकरीत आहे तो अपात्र आहे.

PM Internship important Dates : पीएम इंटर्नशिपच्या महत्त्वाच्या तारखा: पीएम इंटर्नशिपच्या महत्त्वाच्या तारखा कधी आणि कसे होईल?

1: 12 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्रीपासून पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी उमेदवार अर्ज करू शकतील अशी शक्यता आहे.

2: उमेदवार 12 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करू शकतात.

3: 26 ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील एक टीम सर्व फॉर्मची तपासणी आणि पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची यादी तयार केली जाईल.

4: 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत, कंपन्या त्यांच्या गरजांनुसार उमेदवार निवडतील आणि नंतर त्यांना ऑफर देतील. उमेदवारांना कोणत्या विभागात इंटर्नशिप करायची आहे.

5: उमेदवार 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत ऑफर स्वीकारू शकतात.

6: इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होईल.

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 
  • आधार कार्ड - नाव, पत्ता, जन्मतारीख संपूर्ण, तुमचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे. (तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि तुम्हाला ज्या हुद्द्यासाठी फॉर्म भरायचा आहे त्या नुसार प्रमाणपत्रे असावीत)
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
  • आधार लिंक केलेले बँक खाते - (बँकेचं नाव , पत्ता , IFSC नंबर, खातेधारकाचे नाव, पत्ता इत्यादी माहिती असणे आवश्यक)

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा | How To Apply Online for PM Internship Yojana

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

1. सरकारने "PM Internship Online Registration" तयार केलेल्या PM इंटर्नशिप ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर जा. - येथे क्लिक करा

2.  होमपेजवर दिलेल्या  “New Registration”  पर्यायावर क्लिक करा.

3.  नोंदणी फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती (आधारनुसार) भरा, शैक्षणिक पात्रतेशी संबंधित माहिती प्रविष्ट करा.

4.  मोबाईल  OTP  सह पडताळणी करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

महत्वाचे घटक

1:  पीएम इंटर्नशिप योजनेत रेजिस्ट्रेशन केल्यानंतर उर्वरित फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा. जेणेकरून तुमचा योग्य कंपनीकडे पोहचेल आणि तुम्हाला त्या अनुसार योग्य काम दिले जाईल.

2:  मोबाईल नंबर आणि ई-मेल तुमचाच द्या जेणेकरून तुम्हाला मेल किंवा संदेश आल्याचं लवकर समजेल.

3:  तुमचे कागदपत्र हे  “Digi Locker”  मध्ये साठवले असू द्या, सरकारी योजनांमध्ये  “Digi Locker”  ला खूप महत्त्व दिले जाते.

4: ई-केवायसी करून घेणे (e-KYC) : पीएम इंटर्नशिप योजनेत e-KYC करण्यासाठी Proceed Further नावाच्या बटनावर क्लिक करा. नंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून Next बटनावर क्लिक करा. तुम्हाला एक OTP प्राप्त होईल, तो भरून Continue बटनावर क्लिक करा.

नंतर साइन इन करण्याचा प्रकार निवडून ई-मेल आयडी व्हेरिफायसाठी तुम्हाला OTP पाठवला जाईल, तो सबमिट करून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

5: वैयक्तिक माहिती (Personal Details) : या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे आधार कार्डानुसार तुमचे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आईचे नाव किंवा जोडीदाराचे नाव भरून घ्या. नंतर जन्म दिनांक, लिंग आणि जाती निवडून घ्या.

नंतर सध्याचा आणि कायमचा पत्ता भरून घ्या, त्यात शहर/गाव, जिल्हा, ब्लॉक, राज्य आणि पिनकोड भरून घेणे. पुढे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल तुमच्या विकलांग विषयी.

जर तुम्ही विकलांग वर्गात येत असाल तर “Yes” वर क्लिक करा अथवा “No” वर क्लिक करा. तुम्हाला फोटो अपलोड करण्यासाठी काही अटी दिल्या आहेत.

त्यात तुमचा फोटो हा JPG किंवा PNG फॉरमॅटमधील असावा आणि त्याची साइजही 500 KB च्या आत असावी. नंतर “Save And Next” बटनावर क्लिक करून घेणे.

6: संपर्क माहिती ( Contact Details ) : या स्टेपमध्ये तुम्हाला संपर्क तपशील भरायचा आहे. यात तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर उपलब्ध असेल तर मोबाईल क्रमांक, नंतर ई-मेल आयडी भरून Save बटनावर क्लिक करून घेणे.

7: शैक्षणिक माहिती (Education Details) : पीएम इंटर्नशिप योजनेत शैक्षणिक माहिती भरताना तुम्हाला तुमच्या कोर्स आणि स्ट्रीमची निवड करून घ्यायची आहे, त्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, संस्थेचे नाव आणि उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण आणि टक्केवारी,

त्या सोबतच शैक्षणिक मार्कशीट किंवा कागदपत्र PDF स्वरूपात (2 MB मर्यादेत) अपलोड करणे. नंतर Save And Next बटनावर क्लिक करून घ्या.

8: बँक खाते तपशील (Bank Details) : बँक खाते माहिती भरताना तुम्हाला आधी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे का असे विचारले जाईल. जर आधार लिंक असेल, तर Yes करा. विचारलेली बँक खात्याविषयी माहिती भरून घ्या आणि पुढे Save and Next बटनावर क्लिक करा.

9: कौशल्य तपशील (Skills Detail) : यात तुम्हाला तुमच्या अनुभवाबद्दल माहिती भरायची आहे. तुम्हाला येणाऱ्या भाषांविषयीची माहिती भरून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

10:  वैयक्तिक माहितीतुम्हाला योजनेविषयी काही प्रश्न असतील तर ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर जाऊन तुमचे प्रश्न विचारू शकता.

निष्कर्ष (Conclusion)

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना भारतातील बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी तयार केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण, आर्थिक मदत सोबतच व्यावसायिक अनुभव सुद्धा दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून 5 वर्षांत देशातील 1 कोटी बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

त्यामुळे देशातील बेरोजगारीचा आकडा कमी होण्याची अपेक्षा आहे. ही योजना देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा करिअर घडवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यात भर देण्यास एक सुवर्ण संधी असेल.

या योजनेमार्फत तरुणांना आर्थिक मदत, विमा संरक्षण, आणि कंपनीमधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे तरुण स्वतःला सिद्ध करू शकतो. तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी ठोस पाऊल उचलावे.

FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: पंतप्रधान इंटर्नशिप योजना काय आहे?
उत्तर: सरकारच्या या योजनेअंतर्गत तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे.

प्रश्न 2: इंटर्नशिपमध्ये पगार किती आहे?
उत्तर: योजनेअंतर्गत, इंटर्नला 12 महिन्यांसाठी 5,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य आणि 6,000 रुपये एकवेळ अनुदान मिळेल.

प्रश्न 3: पंतप्रधान इंटर्नशिप योजनांचा कालावधी किती आहे?
उत्तर: पीएम इंटर्नशिप योजना 12 महिन्यांसाठी असेल.

प्रश्न 4: PM इंटर्नशिप योजनेत वयाची अट किती आहे?
उत्तर: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत 21 ते 24 वयोगटाची अट ठेवली आहे. या वयोगटाव्यतिरिक्त विद्यार्थी अपात्र असतील.

प्रश्न 5: PM इंटर्नशिप योजनेत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: PM इंटर्नशिप योजनेत फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.

प्रश्न 6: PM इंटर्नशिप योजना कोणी चालू केली आहे?
उत्तर: पंतप्रधान इंटर्नशिप योजना भारत सरकारद्वारे चालू करण्यात आली आहे आणि ती संपूर्ण देशात लागू असणार आहे.

प्रश्न 7: PM इंटर्नशिप कधी पर्यंत सुरु होणार आहे?
उत्तर: PM इंटर्नशिप योजनेत संपूर्ण निवड प्रक्रिया झाल्यानंतर 02 डिसेंबर 2024 पासून इंटर्नशिप सुरू करण्यात येणार आहे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Mukhyamantri ladki bahin yojana

सरकार देणार लाडक्या बहि‍णींची भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरमध्येच

Mukhyamantri ladki bahin yojana 2024

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होन सुरु

Mukhyamantri annapurna yojanet badal

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत बदल हे काम करा तरच मिळणार पैसे

E shram card yojana 3000 rupees pension scheme

ई-श्रम कार्ड वर कामगार आणि मजूरांना 3,000 रुपये मिळणार आहेत का?

Mukhyamantri mazi ladki bahin yojana mazi fake news

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने विषयी अफवा

Mukhyamantri mazi ladki bahin yojana 6th installment update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता महिलांना कधी मिळणार

Bsnl ne update kiya logo aur slogan

BSNL अपडेट: लोगो आणि स्लोगनमध्ये बदल, नवीन सात सेवा देखील सुरू केल्या

Maharashtrat mahilana swalambi banvnyasathi rabavlya janarya yojana

महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या योजना

Ration card e kyc new date release

रेशन कार्ड विषयी सविस्तर माहिती आणि रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची तारीख बदलली

Ladki bahin yojanet don mothe badal

लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल महिलांना पैसे मिळणार की नाही?

Identity cards will be accepted for voting

मतदान ओळखपत्र नाही? मतदान करण्यासाठी 'हे' 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

Jaykumar bhau rawal yancha vijay 2024

महाराष्ट्र विधानसभा 2024: जयकुमार भाऊ रावल यांचा ऐतिहासिक विजय