Home  |  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत ५ मिनिटांत तुमच्या मोबाईलवरून तपासा तुमच्या अर्जाची स्थिती

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत ५ मिनिटांत तुमच्या मोबाईलवरून तपासा तुमच्या अर्जाची स्थिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) मध्ये तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासावी

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) मध्ये जर तुमच्याकडे रेजिस्ट्रेशन क्रमांक (नोंदणी क्रमांक) नसेल तर तुमच्यासाठी हे खास आहे. खालील स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे नाव, तुमचा रेजिस्ट्रेशन क्रमांक (Registration Number) आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे "Beneficiary Status" विषयी संपूर्ण माहिती पाहू शकता. चला पाहू तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे.

1. सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) च्या अधिकृत वेबपोर्टलला भेट द्या. येथे क्लिक करा
2. पीएम आवास योजना – ग्रामीणचे मुख्यपृष्ठ तुमच्या समोर उघडेल.
3. सर्वात वर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल. "English किंवा हिंदी" भाषा तुम्ही निवडू शकता. तुमच्या सोईनुसार भाषा निवडा.
4. आता वरती मेनूयादीमध्ये "आवाससॉफ्ट" (Awaassoft) नावाचा मेनू आहे. त्यावर जाऊन "अहवाल" (Report) पर्यायावर क्लिक करा.
5. आता नवीन पेज उघडेल. त्यात उजव्या बाजूला असलेल्या "F" विभागात (Section) जा. म्हणजे ई-एफएमएस अहवाल (E-FMS Reports) वर जा, आणि तिथे दिलेल्या "Beneficiaries registered, accounts frozen and verified" लिंकवर क्लिक करा.
6. तुमच्या समोर "एमआयएस अहवाल" (MIS Report) पृष्ठ उघडेल. तुम्हाला डाव्या बाजूला दिसत असलेल्या "निवड फिल्टर" (Selection Filters) मध्ये विचारलेली माहिती निवडायची आहे. निवडलेल्या माहितीनुसार तुम्हाला उजव्या बाजूला "Beneficiaries registered, accounts frozen and verified" मध्ये गावाची माहिती पाहायला मिळेल.
7. यादीमधून तुमचे वास्तव्य असलेले राज्य निवडून घ्यायचे आहे.
8. तुमचे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडण्याचा पर्याय दिला असेल, आता तुम्ही तुमचा जिल्हा निवडून घ्या.
9. नंतर तुमचा तालुका, तुमचे गाव, आणि शेवटच्या यादीतून "PRADHAN MANTRI AWAAS YOJANA GRAMIN" (PMAYG) हा पहिला निवडून घ्यायचा आहे.
10. खाली दिलेला कॅप्चा रिकाम्या जागेत भरून घ्या. आणि खालील "सबमिट" (Submit) बटणावर क्लिक करा. आता तुमच्या समोर तुमच्या गावाची यादी उघडेल. त्यात तुमचे नाव तपासा.

गावाच्या यादीत मिळणाऱ्या माहितीविषयी

1. यात तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थ्यांची नावे मिळतील.
2. तुम्ही तुमचा आणि तुमच्या शुभचिंतकाचा रेजिस्ट्रेशन क्रमांक जाणून घेऊ शकता.
3. तुमचे नाव, तसेच तुमच्या बँकेचे नाव असेल, आणि शेवटी तुमच्या अर्जाची स्थिती.
4. अर्जाच्या स्थिती (Status) मध्ये तुम्हाला "सत्यापन केले" (Verified) आणि "नाकारले" (Rejected) असे दर्शवण्यात आले असेल.
5. जर तुमचा अर्ज नाकारला गेला असेल तर पुढील "अर्ज नाकारण्याचे कारण" (Reject Reason) स्तंभात त्या विषयी माहिती मिळेल.

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) मध्ये तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती कशी तपासावी

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) मध्ये जर तुमच्याकडे रेजिस्ट्रेशन क्रमांक असेल तर तुमच्यासाठी हे खास आहे. खालील स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे लाभार्थी तपशील (Beneficiary Details), तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती (Personal Details), बँक तपशील (Bank Details), मंजुरी आणि पूर्णत्वाचा तपशील (Sanction and Completion Details) विषयी संपूर्ण माहिती पाहू शकता.

1. दिलेल्या वरील माहितीच्या अनुसार ३ स्टेप्सपर्यंत सारखे आहे. पुढे काय करायचे आहे ते पाहू.
2. आता वरती मेनूयादीमध्ये "भागधारक" (Stakeholders) नावाचा मेनू आहे. त्यावर जाऊन "IAY/PMAYG लाभार्थी" (IAY/PMAYG Beneficiary) पर्यायावर क्लिक करा.
3. आता तुम्हाला नवीन पेज उघडेल. "नोंदणी क्रमांक" (Registration Number) भरून घ्यायचा आहे.
4. खाली दिलेला कॅप्चा दिलेल्या जागेत भरून घ्या आणि समोरील "सबमिट" (Submit) बटणावर क्लिक करा. आता तुमच्या समोर तुमच्या अर्जाविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Mukhyamantri ladki bahin yojana

सरकार देणार लाडक्या बहि‍णींची भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरमध्येच

Mukhyamantri ladki bahin yojana 2024

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होन सुरु

Mukhyamantri annapurna yojanet badal

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत बदल हे काम करा तरच मिळणार पैसे

E shram card yojana 3000 rupees pension scheme

ई-श्रम कार्ड वर कामगार आणि मजूरांना 3,000 रुपये मिळणार आहेत का?

Mukhyamantri mazi ladki bahin yojana mazi fake news

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने विषयी अफवा

Mukhyamantri mazi ladki bahin yojana 6th installment update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता महिलांना कधी मिळणार

Bsnl ne update kiya logo aur slogan

BSNL अपडेट: लोगो आणि स्लोगनमध्ये बदल, नवीन सात सेवा देखील सुरू केल्या

Maharashtrat mahilana swalambi banvnyasathi rabavlya janarya yojana

महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या योजना

Ration card e kyc new date release

रेशन कार्ड विषयी सविस्तर माहिती आणि रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची तारीख बदलली

Ladki bahin yojanet don mothe badal

लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल महिलांना पैसे मिळणार की नाही?

Identity cards will be accepted for voting

मतदान ओळखपत्र नाही? मतदान करण्यासाठी 'हे' 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

Jaykumar bhau rawal yancha vijay 2024

महाराष्ट्र विधानसभा 2024: जयकुमार भाऊ रावल यांचा ऐतिहासिक विजय