Home  |  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी महत्वाची माहिती

योजनेचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Work Training Scheme)
योजना अंमलात आणणारे राज्य महाराष्ट्र सरकार
विभाग महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग.
योजना चालू झाल्याची तारीख 17 जुलै 2024
लाभार्थी महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण.
उद्दिष्टे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यायोग्य बनवण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दोन्ही प्रदान केले जाणार आहेत.
फॉर्म भरण्याचा प्रकार ऑनलाईन
अधिकृत वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in/
संपर्क क्रमांक 18001208040
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने विषयी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांसाठी 27 जून 2024 रोजी 2024-25 या वर्षाच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुरु केली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं लक्ष आहे. या योजनेमार्फत युवकांना 6,000 ते 10,000 पर्यंत प्रतिमाह विद्यावेतन देण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थ्यांचं किमान वय हे 18 आणि कमाल वय हे 35 असावे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि तरुणांना 6 हजार, आयटीआय आणि पदविकाधारक विद्यार्थी आणि तरुणांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी आणि तरुणांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेसाठी आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त अर्ज सरकारकडे आले आहेत आणि 10 हजारापेक्षा जास्त खाजगी व शासकीय आस्थापनांनी नाव नोंदणी केली आहे.

योजनेसाठी किती कोटींची तरतूद आहे?

महाराष्ट्र सरकारने जून 2024 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (CM Youth Work Training Scheme) योजनेसाठी 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लाभार्थी पात्रता | Eligibility for Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

  • ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. म्हणून लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे किमान वय 18 आणि कमाल वय 35 असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांची किमान शैक्षणिक पात्रता ही 12 पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे अपडेटेड आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • लाभार्थ्यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Important Documents For Chief Minister Youth Work Training Scheme

  • आधार कार्ड असावे. लाभार्थ्यांकडे अपडेटेड आधार कार्ड पाहिजे.
  • आधार लिंक बँक खाते. म्हणजे ई-केवायसी केलेली पाहिजे.
  • 12वी पास / आयटीआय / पदविका / पदवीधर / पदव्युत्तर प्रमाणपत्र.
  • कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेला नंबर.

योजनेचा वेतन लाभ कसा मिळणार

योजनेचा वेतन लाभ हा सदर लाभार्थाच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.

  • 12 वी पास झालेल्या लाभार्थ्यांना 6,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
  • आयटीआय/पदविका लाभार्थ्याना 8,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
  • पदवीधर/पदव्युत्तर लाभार्थ्याना 10,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी

1) आधी लाभार्थ्याने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर जावे. येथे क्लिक करा

2) तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. होम पेजवर ( Job Seeker Find a Job ) / नोकरी शोधा लिंक किंवा बटण दिसेल तिथे क्लिक करा.

3) तुम्हाला उजव्या बाजूला "Jobseeker / CMYKPY Training Login" असे दिसेल.

4) आधी तुम्ही या पोर्टलवर रेजिस्ट्रेशन केले असेल तर, लॉगिन आयडी (username) आणि पासवर्ड (password) टाकून लॉगिन करून प्रत्येक टॅबची अचूक माहिती भरून (अपडेट) करून "SAVE" करावी.

5) तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर, "नोंदणी" या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन नोकरी साधक ( New Job Seeker) नोंदणी फॉर्म ओपन होईल.

6) फॉर्म ओपन झाल्यानंतर आधार कार्डवरील माहितीशी सुसंगत माहिती काळजीपूर्वक आवश्यक माहिती भरायची आहे.

अनुक्रमांक भरावाची माहिती
1 पहिले नाव (First Name)
2 वडीलांचे नाव (Father Name)
3 आडनाव (Sir Name)
4 जन्म दिनांक (Date Of Birth)
5 आधार क्रमांक (Aadhar Number)
6 मोबाईल नंबर (Mobile Number)

        इत्यादी माहिती भरून कॅप्चा भरून पुढील (NEXT) बटनावर क्लिक करा.
7) आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो भरून आपण आपला पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे.

अनुक्रमांक भरावाची माहिती
1 आईचे नाव (Mother Name)
2 पत्ता (Address)
3 धर्म (Religion), जात (Caste)
4 वैवािहक स्थिति (Marital status)
5 शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
6 मोबाईल नंबर
7 ई-मेल आयडी टाकून स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे.

8) फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक संदेश येईल, त्यात आपल्याला नोंदणी क्रमांक व पासवर्ड भेटेल.

9) मिळालेल्या नोंदणी क्रमांक / आधार क्रमांक टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरून लॉगिन करावे.

10) प्रोफाइलमध्ये "Edit Button" बटनावर क्लिक करून उर्वरित माहिती भरावी.

अनुक्रमांक भरावाची माहिती
1 वैयक्तिक माहिती (Other Information)
2 शैक्षणिक माहिती
3 अनुभवाचा तपशील (Experience Details)
4 बँक खाते तपशील अपडेट करावे (Bank Account)

11) शेवटी आपणास दस्तऐवज (Document) अपलोड करावयाची आहेत.

अनुक्रमांक दस्तऐवज (Document)
1 रहिवासी दाखला (Domicile Certificate)
2 शैक्षणिक कागतपत्र
3 कॅन्सल चेक / पासबुक पेज (आधार लिंक बँक खात) इ.

कागतपत्र अपलोड केल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल. अशा प्रकारे लाभार्थी नोंदणी करू शकतात.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे फायदे | Benefits of CM Youth Work Training Scheme

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • योजनेस पात्र उमेदवारांना स्टायपेंड म्हणून 6,000 ते 10,000 रुपये प्रतिमाह दिला जाणार आहे.
  • तरुणाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, जे त्यांच्या पुढील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • योजनेचा लाभ घेणे सोपे आहे कारण योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बेरोजगार तरुण कुठूनही आपली नोंदणी करू शकतो.
  • योजनेद्वारे राज्यातील 4 लाख 5 हजार 626 बेरोजगार तरुणांना काम शिकण्याची सुवर्ण संधी देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे तोटे | Disadvantages of CM Youth Work Training Scheme

  • प्रशिक्षण कालावधी हा फक्त 6 महिन्यांचा असल्याने, दीर्घकालीन नोकरीसाठी लागणारे कंपनीतील सर्व कौशल्ये शिकण्यास संधी मिळणार नाही. फक्त काम करण्यास इतकंच प्रशिक्षण मिळेल.
  • लाखो करोडो बेरोजगार तरुण योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरणार आहेत. आणि प्रशिक्षण हे फक्त मर्यादित जागांसाठी उपलब्ध आहे. म्हणून सर्व तरुणांना याचा लाभ मिळेल असे नाही.
  • मित्रानो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे: मोठ्या शहरांमध्ये 6,000 ते 10,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड पुरत नाही. तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागेल.
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत ठराविक क्षेत्रांमध्येच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये संधी हवी असेल, त्यांच्या साठी फायद्याची ठरणार नाही.

टीप आणि संपर्क तपशील

ऑनलाईन अर्ज करताना अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाशी संपर्क करावा. वर दिलेल्या क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता – 18001208040

निष्कर्ष (Conclusion)

महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनण्यासाठी सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम शिकवले जाणार आहे आणि त्यासोबतच युवकांना मासिक आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे.

या योजनेत पात्र ठरण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील तरुण फॉर्म भरू शकतात. तर 12 वी पास किंवा उच्च शिक्षण घेतलेले युवक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

सरकार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे युवकांच्या कौशल्यांमध्ये वाढ होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तरुण ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या योजनेमार्फत फक्त रोजगार मिळवून देण्याचा उद्देश नसून राज्यातील तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळवून देण्याचा आहे.

FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी किती महिने राहणार आहे?
उत्तर: योजनेचा कालावधा 6 महिन्यांसाठी असेल.

प्रश्न 2: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत किती स्टायपेंड मिळेल?
उत्तर: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 6,000 ते 10,000 रुपये इतका स्टायपेंड मिळणार आहे.

प्रश्न 3: युवा कार्य प्रशिक्षण योजना कधी चालू करण्यात आली?
उत्तर: महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांसाठी 27 जून 2024 रोजी 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना सुरू केली.

प्रश्न 4: युवा कार्य प्रशिक्षण योजनेत वयाची अट किती आहे?
उत्तर: लाभार्थीचे वय 18 आणि कमाल वय 35 असावे.

प्रश्न 5: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फॉर्म भरायला चालू झालाय का?
उत्तर: होय, योजनेचा फॉर्म भरणे चालू झालंय. "https://rojgar.mahaswayam.gov.in/" या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता.

प्रश्न 6: दुसऱ्या राज्याचे विद्यार्थी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकता का?
उत्तर: नाही, ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. म्हणून या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थी घेऊ शकतात.

प्रश्न 7: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट काय आहे?
उत्तर: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्याचे मुख्य उद्दीष्ट हे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी योग्य बनवणे जेणेकरून युवांना लवकर रोजगार मिळेल.

प्रश्न 8: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का?
उत्तर: नाही, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत वेबपोर्टल तयार केले आहे. लाभार्थी हा अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म सबमिट करू शकतो. ऑफलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध नाही.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Farmer id mandatory crop loss compensation

शेतकऱ्यांसाठी धोकादायक निर्णय: नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी बंधनकारक

Heavy rain crop damage farmers compensation

मराठवाड्यात मुसळधार पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना अपूर्ण भरपाई; हंगामी संकट गडद

Fadnavis meets pm seeks help for rain hit farmers

फडणवीसांची मोदींशी भेट : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून आर्थिक मदतची मागणी

Ladki bahin yojana ekyc alert

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: ई-केवायसी करताना सावध रहा, नाहीतर बँक खाते होईल रिकामे

Ladki bahin yojana e kyc otp error

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसीत ओटीपी त्रुटी: कारणे व उपाय

Mukhyamantri majhi ladki bahin yojana ekyc

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: e-KYC द्वारे आधार प्रमाणीकरणाला शासन मान्यता

Maharashtra rains jalgaon flood damage

महाराष्ट्रात पाऊस: जळगाव जिल्ह्यात ढगफुटी, सुमारे १५ गावांतील पिके जलमग्न, एकाचा मृत्यू

Maharashtra rojgar hami yojana

महाराष्ट्र रोजगार हमी योजना 2025 : आवश्यक कागदपत्रे, पात्रता व संपूर्ण माहिती

Maharashtra sugarcane crop threatened by continuous rainfall

महाराष्ट्रात सतत पावसामुळे उसाच्या पिकाला धोका

Maharashtra onion prices nafed

महाराष्ट्रात कांद्याचे भाव वाढले, नाफेडवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Maharashtra crop damage august 2025

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सरकारकडून भरपाईचे आश्वासन

Maharashtra farmer suicide crisis loan waiver delay

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं संकट: दररोज सहा आत्महत्या, कर्जमाफीचा प्रश्न कायम