Home  |  प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना: सरकार उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना 6.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज देत आहे

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना: सरकार उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना 6.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज देत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्या लक्ष्मी योजनेविषयी तपशील | Details of Vidya Lakshmi Yojana

योजनेचे संपूर्ण नाव प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना (PM Vidya Lakshmi Yojana)
योजनेची सुरुवात 6 नोव्हेंबर 2024
विभागाचे नाव केंद्र सरकार
लाभार्थी देशातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
उद्देश्य उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेब पोर्टल https://www.vidyalakshmi.co.in/Students/

विद्या लक्ष्मी योजने विषयी | About Vidya Lakshmi Yojana

विद्या लक्ष्मी योजना (Vidya Lakshmi Yojana) ही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने सुरु केलेली कल्याणकारी योजना आहे. सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करता एकाच प्लॅटफॉर्मवर भरपूर बँकेच्या कर्ज योजना विद्यार्थ्यांसाठी इथे उपलब्ध करून दिल्या आहेत.

जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार बँक, कर्ज आणि कर्जाची परतफेड करताना द्यावयाचा परतावा याची योग्य निवड करू शकतो. विद्या लक्ष्मी योजनामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल.

50 हजार ते 6.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या कर्जावर 10.5 टक्के ते 12.75 टक्के इतका व्याजदर आकारला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी हा कर्जाची गणना करू शकतो. इथे विद्यार्थ्याने एकदाच रेजिस्ट्रेशन केल्यावर योजनेचा लाभ घेऊ शकतात.

विद्या लक्ष्मी योजनाचा उद्देश | Objective of Vidya Lakshmi Yojana

विद्या लक्ष्मी योजना (Vidya Lakshmi Yojana) ही केंद्र सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात 6.5 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या आर्थिक मदतीमुळे आता देशातील हुशार आणि होतकरू विद्यार्थी त्यांचा उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांनी इच्छा असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊन विदेशातही उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात.

विद्या लक्ष्मी योजनेची वैशिष्ट्ये | Features of Vidya Lakshmi Yojana

1. सरकारने पीएम विद्या लक्ष्मी योजनेत एकाच पोर्टलवर अनेक बँका उपलब्ध करून दिल्या आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार अनेक बँकांना कर्जासाठी अर्ज पाठवू शकतो.

2. या पोर्टलवर 34 पेक्षा जास्त बँकांनी रजिस्ट्रेशन केले आहे आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या कर्ज योजना इथे उपलब्ध करून दिल्या आहेत.

3. विद्या लक्ष्मी योजनेत 89 शैक्षणिक कर्ज योजना ऑफर या बँकांकडून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत.

4. विद्यार्थ्याला शिक्षणासाठी 50 हजार ते 6.5 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

5. या योजनेअंतर्गत विद्यार्थी हा शिष्यवृत्ती आणि कर्ज दोन्ही मिळवू शकतो.

6. विद्यार्थ्यांकडून या कर्जावर 10.5 टक्के ते 12.75 टक्के व्याजदर आकारले जाणार आहे.

7. केंद्र सरकारच्या 10 वेगवेगळ्या विभागांमार्फत ही योजना राबवली जाणार आहे.

विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता | Eligibility of Vidya Lakshmi Yojana

अनुक्रमांक योजनेची पात्रता
1 योजनेचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
2 विद्यार्थ्यांना त्यांच्या 10 वी आणि 12 वी परीक्षेमध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असावे.
3 उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याचा प्रवेश हा मान्यताप्राप्त संस्थेत घेतलेला असावा.
4 विद्यार्थ्याला प्रमाण द्यावं लागेल, तो वेळेवर कर्ज फेडेल.

विद्या लक्ष्मी योजनेसाठी लागणारे कागदपत्र | Documents required for Vidya Lakshmi Yojana

अर्ज सबमिट करताना विद्यार्थ्यांना लागणारे किंवा अपलोड करावे लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खाली टेबलमध्ये दिली आहे. (Documents Required for Vidya Lakshmi Education Loan)

कागदपत्र कागदपत्रां विषयी सविस्तर माहिती
पासपोर्ट फोटो विद्यार्थ्यांचे आणि सह-अर्जदारांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो. पोर्टलवर सांगितलेल्या साईझमध्ये
ओळख सिद्ध करण्यासाठी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (Voter ID), ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी
10 वी आणि 12वीचे मार्कशीट 10 वी आणि 12 वी वर्गाचे अधिकृत गुणपत्रक आवश्यक आहे, त्यात विद्यार्थ्याचे मार्क, विषय आणि टक्के असणे आवश्यक आहे.
उत्पन्न दाखल शिष्यवृत्ती किंवा इतर लाभासाठी अर्ज करताना अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखल करणे गरजेचे आहे. त्या साठी विद्यार्थी हा उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate), पगार दाखला (Salary Slip), आयकर रिटर्न (ITR) उत्पन्न सिद्ध करण्यासाठी दाखवू शकता.
जात प्रमाणपत्र सरकारी अधिकारी किंवा तहसीलदारांनी जारी केलेले असावे किंवा ई-सेवा केंद्राद्वारे प्राप्त डिजिटल प्रमाणपत्र देखील तुम्ही सादर करू शकता.

विद्या लक्ष्मी योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया | Registration Process for Vidya Lakshmi Yojana

1:  या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.  https://www.vidyalakshmi.co.in/Students/

2:  होम पेजवर “Apply Now” किंवा “Register” असे बटन दिसेल. त्या पैकी एका बटनावर क्लिक करून घ्या.

3:  आता उघडलेल्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती नचुकता भरावी. वैयक्तिक माहिती जसे विद्यार्थ्यांचे नाव, ईमेल, फोन नंबर इत्यादी. नंतर खाली दिलेल्या सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा.

4:  मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या ई-मेलवर तुमचे खाते ऍक्टिव्ह करण्यासाठी एक लिंक पाठवली जाईल.

5:  तुमच्या ई-मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेत तयार केलेले खाते ऍक्टिव्ह करा.

6:  खाते ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही रेजिस्ट्रेशन करताना वापरलेला ई-मेल आणि पासवर्डचा वापर करून प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेत लॉगिन करा.

7:  आता पोर्टलवर “Search and Apply for Loan” (शोधा आणि कर्जासाठी अर्ज करा) पर्याय निवडा. म्हणजे क्लिक करा.

8:  पुढे तुम्हाला शिक्षण कुठे घ्यायचे आहे त्या विषयी प्रश्न विचारला असेल, त्यात देश निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमचे उच्च शिक्षण भारतात घेई इच्छितात की परदेशात, त्या पैकी एक पर्याय निवडून घ्या (देश निवडा: भारत/परदेशात).

9:  नंतर उच्च शिक्षण तुम्ही ज्या कोर्समधून करणार आहात, तो कोर्स निवडून घ्या.

10:  तुम्ही ज्या संस्थेमध्ये किंवा विद्यापीठात प्रवेश घेणार आहात, तिथे लागणारी फी आणि इतर खर्चाचा हिशोब करून आवश्यक असलेली रक्कम निवडा.

11:  आता तुमच्या समोर अधिक माहिती भरण्यासाठी तुम्हाला फॉर्म दिसेल. तो तुम्ही योग्य आणि अचूक माहिती भरून पूर्ण करा. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती, परिवाराची माहिती, शैक्षणिक माहिती, तुमचा सध्याचा पत्ता आणि निवास पत्ता भरा, संपर्क माहिती योग्य रीतीने भरून घ्या.

12:  नंतर विद्यार्थ्यांचे मार्कशीट आणि सांगितलेली कागदपत्रे अपलोड करावीत. लक्षात घ्या त्यांनी सांगितलेल्या आकारात आणि साईझमध्ये तुमचे कागदपत्र अपलोड करावीत..

13:  शेवटची स्टेप म्हणजे दिलेल्या लिस्टमधून एक बँकेची निवड करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भरपूर बँकांची यादी दिलेली असेल. तुम्ही ती नीट तपासून तुमच्यासाठी कोणत्या बँकेचे कर्ज हे परवडणारे आहे, त्याचा सखोल अभ्यास करून बँकेची निवड करावी..

14:  योग्य बँकेची निवड केल्यानंतर तुमचे रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

विद्या लक्ष्मी योजनेत नोंदणीकृत बँकांची नावे | Names of banks registered under Vidya Lakshmi Yojana

अनुक्रमांक नोंदणीकृत बँकांची नावे मराठीत बँकांची इंग्रजीत नावे
1 अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड Abhyudaya Cooperative Bank Limited
2 आंध्र प्रगती ग्रामीण बँक Andhra Pragathi Grameena Bank
3 ॲक्सिस बँक AXIS BANK
4 बँक ऑफ बडोदा Bank of Baroda
5 बँक ऑफ इंडिया Bank of India
6 बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
7 कॅनरा बँक Canara Bank
8 सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India
9 छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक Chhattisgarh Rajya Gramin Bank
10 सिटी युनियन बँक लिमिटेड CITY UNION BANK LIMITED
11 डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड Dombivli Nagari Sahakari Bank Limited
12 फेडरल बँक Federal Bank
13 जीपी पारसीक बँक लिमिटेड GP PARSIK BANK LTD
14 एचडीएफसी बँक HDFC Bank
15 आयसीआयसीआय बँक ICICI Bank
16 आयडीबीआय बँक IDBI Bank
17 आयडीएफसी फर्स्ट बँक IDFC First Bank
18 इंडियन बँक Indian Bank
19 इंडियन ओव्हरसीज बँक Indian Overseas Bank
20 जम्मू अँड कश्मीर बँक लिमिटेड Jammu and Kashmir Bank Limited
21 कर्नाटक बँक लिमिटेड Karnataka Bank Limited
22 कर्नाटक ग्रामीण बँक Karnataka Gramin Bank
23 कर्नाटक विकास ग्रामीण बँक Karnataka Vikas Grameena Bank
24 करूर वैश्य बँक Karur Vysya Bank
25 केरळ ग्रामीण बँक Kerala Gramin Bank
26 कोटक महिंद्रा बँक Kotak Mahindra Bank
27 न्यू इंडियन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड New Indian Cooperative Bank Limited
28 पंजाब अँड सिंध बँक Punjab and Sindh Bank
29 पंजाब नॅशनल बँक Punjab National Bank
30 राजस्थान मरुधरा ग्रामीण बँक Rajasthan Marudhara Gramin Bank
31 आरबीएल बँक लिमिटेड (रिझर्व बँक ऑफ इंडिया बँक) RBL Bank Limited
32 स्टेट बँक ऑफ इंडिया (भारतीय स्टेट बँक) State Bank of India
33 तामिळनाड मर्कंटाइल बँक लिमिटेड Tamilnad Mercantile Bank Limited
34 द कळुपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड The Kalupur Commercial Co Op Bank LTD
35 द साऊथ इंडियन बँक लिमिटेड The South Indian Bank LTD
36 युको बँक UCO Bank
37 युनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India
38 येस बँक Yes Bank

निष्कर्ष (Conclusion)

विद्या लक्ष्मी योजनेचा लाभ देशातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी घ्यायला हवा. या योजनेत एकाच पोर्टलवरून भरपूर प्रकारच्या शैक्षणिक कर्जाचे प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तुमचा फॉर्म भरल्यावर तो बँकेकडे पडताळणी प्रक्रियेसाठी पाठवला जाईल. त्यानंतर तुमच्या फॉर्मबद्दल जो निर्णय बँक घेईल, म्हणजे तुमचे कर्ज मंजूर झाले की तुमच्या भरलेल्या फॉर्ममध्ये चुका आढळून आल्या. तुम्हाला बँक आणि सरकारने तयार केलेल्या पोर्टलवर समजेल.

FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: विद्या लक्ष्मी योजनेची फेड किती वर्षांची असणार आहे?
उत्तर: योजनेची फेड ही 5 वर्षांची असणार आहे.

प्रश्न 2: विद्या लक्ष्मी योजनेत किती कर्ज देण्यात येणार आहे?
उत्तर: विद्या लक्ष्मी योजनेत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये ते 6.5 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

प्रश्न 3: विद्या लक्ष्मी योजनेत किती व्याजदर आकारले जाणार आहे?
उत्तर: या योजनेत 10.5 टक्के ते 12.75 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.

प्रश्न 4: विद्या लक्ष्मी योजनेचे महत्व काय आहे?
उत्तर: या योजनेमुळे गरीब आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करता येतील.

प्रश्न 5: विद्या लक्ष्मी योजना कोण राबवत आहे?
उत्तर: विद्या लक्ष्मी योजना ही केंद्र सरकारच्या १० वेगवेगळ्या विभागांमार्फत राबवली जात आहे, आणि या योजनेत 35 बँकांनी सहभाग घेतला आहे.

प्रश्न 6: पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना कशासाठी आहे?
उत्तर: उच्च शिक्षण घेऊ इच्छित होतकरू आणि गरीब परिवारातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार विद्या लक्ष्मी योजनेमार्फत शिक्षणासाठी बँकेचं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना आहे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Mukhyamantri ladki bahin yojana

सरकार देणार लाडक्या बहि‍णींची भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरमध्येच

Mukhyamantri ladki bahin yojana 2024

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होन सुरु

Mukhyamantri annapurna yojanet badal

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत बदल हे काम करा तरच मिळणार पैसे

E shram card yojana 3000 rupees pension scheme

ई-श्रम कार्ड वर कामगार आणि मजूरांना 3,000 रुपये मिळणार आहेत का?

Mukhyamantri mazi ladki bahin yojana mazi fake news

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने विषयी अफवा

Mukhyamantri mazi ladki bahin yojana 6th installment update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता महिलांना कधी मिळणार

Bsnl ne update kiya logo aur slogan

BSNL अपडेट: लोगो आणि स्लोगनमध्ये बदल, नवीन सात सेवा देखील सुरू केल्या

Maharashtrat mahilana swalambi banvnyasathi rabavlya janarya yojana

महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या योजना

Ration card e kyc new date release

रेशन कार्ड विषयी सविस्तर माहिती आणि रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची तारीख बदलली

Ladki bahin yojanet don mothe badal

लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल महिलांना पैसे मिळणार की नाही?

Identity cards will be accepted for voting

मतदान ओळखपत्र नाही? मतदान करण्यासाठी 'हे' 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

Jaykumar bhau rawal yancha vijay 2024

महाराष्ट्र विधानसभा 2024: जयकुमार भाऊ रावल यांचा ऐतिहासिक विजय