कोणत्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात?
जून 2024 मध्ये झालेल्या अधिवेशनात खूप साऱ्या योजना महाराष्ट्र सरकारने चालू केल्या आणि त्या पूर्णही करत गेले. त्यातली सर्वात यशस्वी ठरलेली योजना म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी 1500 रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली.
या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना मिळू लागला. ही योजना महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र या विभागामार्फत राबवण्यात आली आहे. आदिती तटकरे या विभागाच्या मंत्री आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवली जात आहे. आणि या योजनेमधून आतापर्यंत महिलांना जुलै ते नोव्हेंबर असे 5 हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा केली गेली आहे.
काही महिलांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत आणि काही महिलांचे फॉर्म पण मंजूर झालेले नाहीत. तर काही महिलांचे कागदपत्र अभावी फॉर्म भरायचा बाकी आहे. अशा महिलांनी काळजी करू नये. नवीन सरकार बनल्यानंतर या विषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि या योजनेपासून कोणत्याही महिलांना वंचित ठेवले जाणार नाही याची दक्षता महायुती सरकार घेणार आहे.
23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुती सरकारला या निवडणुकीत 230 जागांच्या वर जागांवर विजय मिळवून दिला. महिलांनी दिलेल्या पाठिंबाबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आभार मानले आणि लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळू असेही ते बोलले.
मुख्यमंत्री साहेबाना मीडिया तर्फे विचारले गेले, तुम्ही महिलांना सांगितले होते जर महिलांनी आम्हाला निवडून दिले तर 1500 रुपये ऐवजी महिलांना 2100 रुपये हे प्रति महिना दिला जाईल. या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री बोलले की मागच्या वर्षी झालेल्या अधिवेशनात पुढील 5 वर्षांसाठी महिलांना प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे तरतूद केली होती.
पण आम्ही विधानसभा निवडणुकीच्या आधी महिलांना शब्द दिला होता निवडून आल्या नंतर 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. पण या 2100 रुपयांची तरतूद ही पुढील वर्षी म्हणजे “जून 2025” मध्ये होणाऱ्या अधिवेशनात केली जाईल. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करण्यात सुरुवात होईल.
म्हणजे महिलांना अजून पुढच्या अधिवेशनपर्यंत वाट ही पाहावी लागेल. आणि अधिवेशनात जो निर्णय आणि पैशांविषयी तरतूद होईल, त्या नुसार महिलांना लाडकी बहीण योजनेचे सुधारित 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होईल.
लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित अशी काही जादू करता आली नाही. त्यांना लोकसभेत मोठं नुकसान झालं. त्याचेच प्रतिसाद नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पडतील असे सर्वांना वाटत होते. पण महायुती सरकारने जून २०२४ च्या अधिवेशनात ज्या प्रकारे योजना चालू केल्या आणि रखडलेले प्रश्न मार्गी लागले.
विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली
राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही विधानसभा 2024 निवडणुकीत गेम चेंजर ठरली. हे सर्व पाहता निवडणुकीचा चेहराच पूर्ण बदलला. आणि महायुतीला खूप मोठं यश महाराष्ट्रात मिळाले. आता नवीन सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. त्यांनी ज्या निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दांचे पालन हे नवीन सरकार करते की नाही ते पाहू.
निष्कर्ष (Conclusion)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यातच याचा निर्णय हा लगेच घेतला जाणार नाही. यासाठी पुढील म्हणजे 2025 मधील अधिवेशनात त्याची मांडणी करून अर्थसंकल्पनेत मंजुरी मिळवून महिलांना 2100 रुपयांचा वाटप सुरु करण्यात येईल.