मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Mukhyamantri Ladki Bahin Yojana
ऑक्टोबर महिन्यात राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. म्हणून सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र मिळून 3,000 रूपये देण्याचा निर्णय घेतला होता. कालपासून 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
आत्तापर्यंत या योजनेत सरकारने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4,500 रुपये याआधीच महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केले आहेत आणि आता हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे 3,000 रुपये.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत असे सर्व मिळून 5 महिन्यांचे 7,500 रुपये जमा होतील. महिलांची दसरा, दिवाळी गोड होणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळणे चालू
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेला संबोधित करत असताना महाराष्ट्राच्या बहिणींना बोलले की महिलांनी काहीही चिंता करू नका. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच बँक खात्यात जमा करू,
अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्या अनुसंगाने आता ज्या महिलांचे बँक खाते आधार नंबर सोबत लिंक आहे, अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होत आहेत.
Ladki Bahin Yojana : कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही
अनुक्रमांक | कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही |
---|---|
1 | ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे पण तो अप्रूव्ह झालेला नाही. |
2 | काही महिला या अपात्र ठरल्या असतील. |
3 | काही महिलांचे बँक खाते अजून आधार संलग्न नसणार. |
अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा सर्व महिलांनी अंगणवाडी सेविकाना भेटून फॉर्म त्रुटीचे निराकरण करून करून घेणे जेणे करून तुम्हाला ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, आणि बँक खाते अजून आधार संलग्न नसेल तर बँकेत जाऊन ई-केवायसी करून घेणे जेणेकरून तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळेल.
कसे आणि किती पैसे या योजने अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत
योजना ही जुलै महिन्यात सुरु झाली, त्यानंतर सरकारने फॉर्म भरण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत महिनाला दिली आणि 15 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली.
पण काही महिलांकडे कागदपत्र पुरेसे नसल्यामुळे योजनेसाठी अजून मुदत ही वाढवण्यात आली आणि तीन महिन्याचे 4,500 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आणि आता दसरा आणि दिवाळी येत असल्याने सरकार ऑक्टोबरमध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली.
सरकारकडून महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन
काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये ई-केवायसी अभावी बंद आहेत. अशा महिलांच्या बँक खात्यात अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. अशा सर्व महिलांना सरकार आवाहन करते की लवकरात लवकर बँकेत जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्या.
जेणेकरून तुमच्या बँक खात्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील आणि कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
महत्वाचे घटक
घटक 1: ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नसतील, त्यांना योजनेचा 6वा हफ्ता डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
घटक 2: विधानसभा आचारसंहितेमुळे योजना थांबवली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा योजना सुरू होईल. तेव्हा नवीन रजिस्ट्रेशन अर्ज दाखल करू शकतात.
घटक 3: ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले नसतील, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे जाऊन कागदपत्रांचे पाठपुरावा करून घेणे.
निष्कर्ष (Conclusion)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून. ज्या महिलांनी कागदपत्रे आणि ई-केवायसी सारखे निकष पूर्ण केले असतील अशा महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे,
पण ज्या महिलांची बँक खात्याची ई-केवायसी अपूर्ण असेल त्यांनी तत्काळ करून घेणे किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर त्या सुद्धा लवकर दुरुस्त करून घेणे. जेणे करून तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. आणि तुमची दिवाळी अधिक गोड आणि आनंदमयी होईल. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या हिताचा विचार करून ही योजना राबण्यात येत असल्याने योजनेला सकारात्मक दिशा मिळत आहे.
FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे चालू करण्यात आलेली महिलांसाठी कल्याणकारी योजना आहे.
प्रश्न 2: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का थांबवली?
उत्तर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. आणि त्याची आचारसंहिता ही राज्यात लागू झालेली आहे. आचारसंहितेमध्ये अशा योजना सरकार चालवू शकत नाही ज्या मधून लोकांना डायरेक्ट लाभ भेटत असेल.
प्रश्न 3: आता पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेतून किती रुपयांचा लाभ महिलांना मिळाला आहे?
उत्तर: आता पर्यंत 7,500 रुपये इतका लाभ महिलांच्या बँक खात्यात DBTमार्फत जमा करण्यात आला आहे.
प्रश्न 4: ज्या महिलांचा फॉर्म अँप्रूव आहे, पण अजून एकही हफ्ता बँक खात्यात जमा झाला नाही, त्यांनी काय करावे?
उत्तर: अशा सर्व महिलांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत जोडून घ्यायचे म्हणजे ई-केवायसी करून घेणे. पुढच्या हफ्त्यासोबत तुमचे उरलेले हफ्ते देखील जमा होतील.