Home  |  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता महिलांना कधी मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता महिलांना कधी मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी X वर केलेली पोस्ट

मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri mazi ladki bahin yojana) विषयी महत्वाची अपडेट ही X च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी एक आनंदाची बातमी पोस्ट केली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे लिहितात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. आणि महिलांना त्यांचा ७वा हफ्ता हा डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. असंही त्यांनी लिहलंय.

X वर केलेल्या पोस्ट विषयी सविस्तर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi ladki bahin yojana) ही महिलांसाठी कल्याणकारी योजना आहे. योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही. या योजनेबद्दल महाराष्ट्रातील माता भगिनींना खूप चुकीची माहिती दिली जातेय. अशा माहितींवर  माता भगिनींना बळी पडू नये असे अदिती तटकरे यांनी म्हंटले आहे.

ही योजना जुलै 2024 मध्ये चालू करण्यात आली आणि या योजनेमार्फत पात्र महिलांना प्रतिमहिना 1,500  रुपये इतकी रक्कम ही त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केली जाते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट 2024 चे 2 हफ्ते म्हणजे 3,000   रुपये हे 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान जमा करण्यात आले.

ज्या महिलांनी ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा 4,500   रुपये हे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्या सोबत सप्टेंबर महिन्याचा तिसऱ्या हफ्त्याचे 1,500   रुपये देखील महिलांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात आले.

नंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे संकेत समोर आल्यावर आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे 3,000 हजार रुपये हे दिवाळी बोनस म्हणून महिलांच्या खात्यात 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या आत जमा करण्यात आले.

नंतर राज्यात निवडणुका जाहीर करण्यात आल्या आणि आचारसंहिता लावण्यात आली. आचारसंहितेमध्ये काही योजना या नियमानुसार सरकारला थांबवाव्या लागतात. आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा चालू करू शकता. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही येते.

मंत्री अदिती तटकरे शेवटी बोलले की महिलांना त्यांच्या डिसेंबर महिन्याचा लाभ हा त्यांना डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. म्हणजे महिलांना त्यांच्या डिसेंबर महिन्याचा 7वा हफ्ता हा डिसेंबर महिन्यात भेटेल.

निष्कर्ष (Conclusion)

आचारसंहितेमुळे माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin) योजनेला ब्रेक लागलाय पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर ही योजना परत अशीच जोरात चालू होईल. ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ भेटला नसेल त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन ई-केवायसी करून घेणे. जेणेकरून अशा महिलांना डिसेंबर महिन्यात त्यांचे राहिलेले हफ्ते देखील भेटतील.

FAQs : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेविषयी विचारले जाणारे काही प्रश्न

प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: 15 ऑक्टोबर 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे.

प्रश्न 2: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ महिलांना कसा मिळेल?
उत्तर: योजनेंतर्गत, राज्य सरकार दरमहा 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे हस्तांतरित करेल.

प्रश्न 3: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज करण्यासाठी, योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि लॉग इन करा आणि फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट करा. किंवा अंगणवाडी सेविकांच्या कडे जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता.

प्रश्न 4: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना का बंद केली?
उत्तर: नाही, विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने तात्पुरती बंद केली आहे.

प्रश्न 5: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना पुन्हा कधी सुरू होणार?
उत्तर: विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच योजना पुन्हा सुरु होईल.

प्रश्न 6: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता कधी येणार आहे?
उत्तर: विधानसभा निवडणूक संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW