मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तपशील
योजनेचे नाव | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |
राज्य | महाराष्ट्र शासन |
विभाग / कार्यालय | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
दिनांक / तारीख | 28 जून 2024 |
उद्दिष्टे | महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांपर्यंत गॅस सिलिंडर पोहचवणे |
लाभ/अनुदान | योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक वर्षी 3 गॅस सिलिंडर मोफत |
पात्रता | उज्ज्वला योजनेत पात्र महिला आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला |
पात्र लाभार्थी महिला संख्या | 52 लाख 16 हजार |
अधिकृत संकेतस्थळ | ——————– |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | Mukhyamantri Annapurna Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने जून २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना चालू करण्याची घोषणा केली होती. योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील.
या योजनेचा लाभ हा भारत सरकारच्या उज्ज्वला योजनेत पात्र महिला लाभार्थी आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे. या योजनेत एक अट सरकारकडून ठेवण्यात आली होती, ती म्हणजे ज्या महिलांच्या नावाने गॅसजोडणी असेल, अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता.
पण राज्यात लाखो गॅस जोडण्या ह्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत, त्यामुळे लाखो महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र असूनसुद्धा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे सरकारच्या मंत्रिमंडळामार्फत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पूर्वीच्या आदेशामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित नियमांनुसार पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने जे बदल केले आहेत ते पाहू या.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस (Mukhyamantri Annapurna Yojanes) पात्र महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळवायचे असतील तर महिलांनी लवकरात लवकर घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे असलेली गॅसजोडणी ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन स्वतः महिलेच्या नावावर हस्तांतरित करून घेणे.
असं सरकारच्या नव्या आदेशामध्ये सरकारच्या मंत्रिमंडळाने नवीन पत्रात सांगितलं आहे. जेणेकरून महाराष्ट्राच्या लाखो गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या महिला या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकतील. असं केल्याने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाहीत आणि त्यांना वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत मिळू शकणार.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून किती पैसे मिळणार आहेत
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत गॅस भरताना तुमच्या क्षेत्रात गॅस सिलिंडरचे जे भाव चालत असतील, त्या भावात तुम्हाला सिलिंडर घ्यावे लागेल. म्हणजे तुम्हाला आधी पैसे भरावे लागणार आहेत.
- त्यानंतर काही दिवसांनी सबसिडी ही योजनेस पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा करण्यात येणार आहे.
- ज्या महिलांच्या नावे भारत सरकारची उज्ज्वला गॅस जोडणी असेल अशा सर्व पात्र महिलांना 830 रुपये अनुदान हे महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत मिळणार आहेत.
- ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत असणार आणि उज्ज्वला गॅसजोडणी नसेल अशा महिलांना या योजनेमार्फत 530 रुपये किंवा जिल्ह्यानिहाय सिलेंडरच्या दरानुसार अनुदान मिळणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासाठी पात्रता | Eligibility for CM Annapurna Yojana
केंद्राच्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला योजनेस पात्र ठरणार आहेत, म्हणून या योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची गरज नाही.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महिलेच्या नावाने गॅस जोडणी असणे आवश्यक आहे.
- पंतप्रधान उज्ज्वला योजनेतर्गत पात्र असलेले सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेण्यास साठी पात्र असेल.
- योजनेचा लाभ हा फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या लाभार्थी महिलेलाच मिळणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for CM Annapurna Yojana
रहिवासी पुरावा: योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे, म्हणून ते सिद्ध करण्यासाठी रहिवासी दाखला.
आधार कार्ड: अपडेटेड आधार कार्ड असणे आवश्यक आहे, कारण आधार कार्डवर 12 अंकी नंबर, तुमचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख सुद्धा असते. त्या सोबत ओळख पटण्यासाठी फोटो.
बँक खाते: राष्ट्रियकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खात्याबरोबर आधार संलग्न हवे.
रेशन कार्ड: रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कार्डवरून महिलांची पात्रता ठरवली जाणार आहे.
पासपोर्ट फोटो: मागील 3 महिने जुना किंवा नवीन, स्पष्ट दिसणारा पासपोर्ट साईझ 2 फोटो लागणार आहेत.
उज्ज्वला योजनेचा: भारत सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत असाल तर रिफिल बुक पुरावा म्हणून द्यावा लागेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेस पात्र महिलांना त्यांनी भरलेला फॉर्म पुरावा म्हणून द्यावा लागेल.
मोबाईल क्रमांक: 10 अंकी मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. OTP येण्यास आणि योजनेविषयी योग्य सूचना तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येतात.
खाली दिलेल्या बाबी पूर्ण करून घ्या, तुम्हाला योजनेचा लाभ नक्की मिळेल.
1) तुमच्या नावाने गॅस जोडणी नसेल, तर तुमच्या गॅस वितरक जवळ जाऊन ते गॅस जोडणी तुमच्या नावे हस्तांतरण करण्याचा फॉर्म भरून द्या. जेणेकरून तुम्ही ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहाल.
2) तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन त्याचा फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुम्हाला मिळणारा लाभ लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल.
3) एका कुटुंबात एकाच महिलेला लाभ दिला जाणार आहे, म्हणून गॅस जोडणी ही त्या महिलेच्या नावावर करा जिचे सर्व कागदपत्रे तयार असतील.
4) बँक खात्याची ई-केवायसी सुद्धा करून घ्या जेणेकरून DBT मार्फत येणारे अनुदान हे तुमच्या बँक खात्यात वेळेवर जमा होतील.
टीप
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने विषयी अधिक माहिती आणि सरकारच्या नवीन GR विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करा – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407301150453906.pdf
निष्कर्ष (Conclusion)
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत केलेले बदल महाराष्ट्रातील गरीब आणि मजुरी करणाऱ्या महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत मिळण्यास मदत मिळेल. त्यासाठी महिलांनी सरकारने बनवलेल्या नवीन नियमांचे पालन करावे जेणेकरून योजनेचा लाभ मिळेल.
योजनेचा लाभ DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. महिलांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा. सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत जास्तीत जास्त महिला पात्र आणि अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून हा एक महत्वाचा पाऊल म्हणायला हरकत नाही.
FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत नोंदणी कशी करावी?
उत्तर: योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आपोआप या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत. फक्त लाभ घेणाऱ्या महिलांच्या नावे गॅस जोडणी असावी.
प्रश्न 2: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत कोणता नवीन बदल करण्यात आला आहे?
उत्तर: महाराष्ट्रात महिलांच्या नावे गॅस जोडणी नाही, अशा सर्व महिला या योजनेपासून वंचित राहणार होत्या, म्हणून महाराष्ट्र सरकारने नवीन निर्णय घेतला आणि त्यात सांगितलं की महिलांनी लवकरात लवकर गॅस जोडणी ही त्यांच्या नावे करून घेणे, जेणेकरून महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.
प्रश्न 3: किती किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर मिळणार आहे?
उत्तर: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत 14.2 किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहे.
प्रश्न 4: किती गॅस सिलेंडरवर महिलांना सबसिडी मिळणार आहे?
उत्तर: या योजनेस पात्र महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळणार आहे.
प्रश्न 5: गॅस सिलेंडर भरताना पैसे द्यावे लागतील का?
उत्तर: हो, आधी महिलांना गॅस भरताना पैसे द्यावे लागतील. नंतर DBT द्वारे सबसिडी रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
प्रश्न 6: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कधी सुरू करण्यात आली?
उत्तर: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात मंजूर करून 28 जून 2024 रोजी योजना चालू केली.
प्रश्न 7: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या सरकारी विभागाअंतर्गत येते?
उत्तर: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत कार्य करते. या विभागाचे कामकाज मंत्री माननीय श्री छगन भुजबळ पाहतात.