Home  |  या दोन सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत तपासा तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे की नाही

या दोन सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत तपासा तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे की नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीक विमा काढण्याचे मुख्य फायदे

  • शेतकऱ्यांना १ रुपयात शेतातील पिकांसाठी पीक विमा उपलब्ध.
  • शेतकरी हा पीक विमा सर्व हंगामांसाठी काढू शकतात.
  • या योजनेमध्ये विम्याची उर्वरित रक्कम ही राज्य सरकार भरणार आहे.
  • शेतात असंख्य प्रकारचे अडचणी असतात. कोणत्याही कारणाने पिकांचे नुकसान होऊ शकते. झालेले नुकसान शेतकरी सोसू शकत नाही, म्हणून अल्प दरात शेतातील पिकांना संरक्षण म्हणून पीक विमा काढला आहे. पिकांचे नुकसान हे नैसर्गिक रित्या असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव, या विम्यामधून नुकसान भरपाई मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल.
  • पीक विमा पासून ते लाभ मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने शेतकरी बांधवांना विम्यासाठी अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठवण्याची गरज नाही.

पीक विमा अर्जाची स्थिती तपासण्याचे २ प्रकार

पीक विमा अर्जाची स्थिती तपासण्याचे दोन्ही पर्याय खूप सोपे आहेत. दोन्ही पर्याय हे तुम्ही तुमच्या मोबाईल फोन वापरून पाहू शकता. ते पर्याय खालील प्रमाणे:

  • पहिला पर्याय म्हणजे सरकारच्या अधिकृत वेबपोर्टलवरून तुम्ही तुमच्या पीक विम्याची स्थिती तपासू शकता.
  • दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या मोबाईलमधील व्हाट्सअँपच्या माध्यमातून.

दोघी पद्धतीने ते कसे तपासायचे ते सविस्तर जाणून घेऊ.

वेबपोर्टलवरून पीक विमा अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया

वेबसाइटवरून पीक विमा अर्जाची सद्य स्थिती तपासणे खूप सोपे आहे. खाली सांगितल्या प्रमाणे तुम्ही तुमच्या पीक विम्याची स्थिती तपासू शकता, चला सविस्तर माहिती पाहू.

शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पीक विम्याची स्थिती लॉगिन करून किंवा लॉगिन न करता सुद्धा पाहू शकता. ते दोन्ही पर्याय आपण पाहू.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्याची लिंक समोर दिली आहे. – https://www.pmfby.gov.in/

लॉगिन न करता पीक विमा अर्जाची स्थिती पाहण्याची प्रक्रिया

  • अधिकृत वेबसाइटवर आल्यावर खाली तुम्हाला “अर्जाची स्थिती” (Application Status) अशा नावाचा बॉक्स दिसेल. त्या बॉक्सवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर “Check Application Status” नावाने एक पॉपअप उघडेल.
  • नंतर खाली तुम्हाला “पॉलिसी आईडी विचारली आहे, ती भरून घ्या. पॉलिसी आईडी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या संदेशात मिळेल किंवा पीक विमा भरल्याच्या स्लिपमध्ये मिळेल.
  • नंतर खाली “Enter Captcha Code” या जागी नचुकता दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करून घ्यावा.
  • नंतर खालील “Check Status” या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • आता पुढील पानावर विमा विषयी माहिती मिळेल. त्यात तुम्ही तुमच्या पीक विमा विषयी अधिक माहिती पाहू शकता. तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) पाहू शकता. त्यात मंजूर (Approved), प्रलंबित (Pending), नाकारले (Rejected) असे स्टेटस पाहायला मिळतील.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती लॉगिन न करता पाहू शकता. पुढे आपण लॉगिन करून कसे चेक करावे ते पाहू.

लॉगिन करून पीक विमा अर्जाची स्थिती पाहण्याची प्रक्रिया

आता आपण लॉगिन करून कशा प्रकारे पीक विमा अर्जाची स्थिती पाहावी त्या विषयी जाणून घेऊ.

  • वेबसाइटवर आल्यावर “साइन इन करा” या बटणावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक पॉपअप उघडेल “Login as farmer” शेतकरी म्हणून लॉगिन करण्यासाठी “इथे क्लिक करा” या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • पुन्हा तुमच्या समोर नवीन पॉपअप उघडेल “शेतकऱ्याचा अर्ज” त्यात “शेतकऱ्याकरिता लॉग इन करा” या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • शेतकरी लॉगिन म्हणून एक नवीन पृष्ठ उघडेल. आता मोबाईल क्रमांक (Mobile Number) आणि कॅप्चा कोड भरून “Request for OTP” बटणावर क्लिक करून घ्या.
  • तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. त्याला भरून घ्या आणि लॉगिन करून घ्या.
  • पुढे “Application” मेनूवर क्लिक करून घ्या.
  • तुम्ही भरलेल्या विम्याविषयी सविस्तर माहिती पाहू शकता आणि तुमच्या मागील वर्षांमध्ये भरलेल्या विम्याविषयीसुद्धा सविस्तर माहिती पाहू शकता.

मोबाईल व्हाट्सअँपवरून पीक विमा अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया

आता आपण दुसऱ्या पर्यायाविषयी म्हणजे मोबाईल व्हाट्सअँपवरून पीक विमा अर्ज स्थिती कशी तपासावी त्या विषयी पाहू.

  • शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकृत चॅटबॉट नंबर म्हणजे मोबाईल क्रमांक जतन करा. क्रमांक पुढील प्रमाणे – +९१ ७० ६५ ५१ ४४ ४७ (+91 70 65 51 44 47)
  • आता व्हाट्सअँपमध्ये जाऊन जतन केलेला क्रमांक उघडून घ्या.
  • आणि इतर व्यक्तींना ज्या प्रमाणे संदेश पाठवतो, त्याच प्रकारे आता PMFBY च्या नंबरवर “Hi” लिहून पाठवायचे आहे.
  • संदेश पाठवल्यानंतर तुम्हाला लगेच उत्तर (Reply) येईल.
  • त्यात पॉलिसी इन्शुरन्स स्टेटस, पॉलिसी क्रॉप, लॉस इंटीमेशन, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅल्क्युलेटर (Insurance Status, Policy Crop, Loss Intimation, Claim Status, Ticket Status, Premium Calculator) असे पर्याय दिसतील.
  • आता दिलेल्या पर्यायांमधून “इन्शुरन्स स्टेटस” (Insurance Status) वर क्लिक करायचे आहे.
  • पुन्हा तुम्हाला खाली दोन स्टेटस दिसतील: “रब्बी हंगाम २०२४” आणि “खरीप हंगाम २०२४” (Rabbi hangam 2024 And Kharip hangam 2024)
  • शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ज्या हंगामाची माहिती हवी आहे, त्या हंगामावर क्लिक करून घ्या.
  • नंतर तुम्हाला तुमच्या पीक विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.

या प्रकारे तुम्ही नवीन माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा वरील पर्यायांपैकी एक पर्याय निवडून तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवू शकता.

पीक विमा माहितीमध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या असतील

  • तुम्हाला पॉलिसी क्रमांक पाहायला मिळेल.
  • त्यानंतर अर्ज क्रमांक सुद्धा दिला असेल.
  • तुमच्या गावाचे नाव, पीकाचे नाव दिलेले असेल.
  • तुमच्या शेतीचा सर्वे नंबर पाहायला मिळेल.
  • पुढे भरलेली विमा रक्कम दिसेल.
  • तुमचा पीक विमा कोणत्या कंपनीचा आहे, त्या कंपनीचे नाव.
  • त्यानंतर तुमच्या पीक विमा अनुदान रक्कम.
  • विमा पॉलिसीचे सद्याचे स्टेटस.

पीक विमा देणाऱ्या कंपन्यांची नावे

  • भारतीय कृषी विमा कंपनी (ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड – Agriculture Insurance Company of India Limited)
  • चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी (Cholamandalam MS General Insurance Company Ltd)
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Reliance General Insurance Company Limited)
  • बजाज अलायन्झ (Bajaj Allianz)
  • फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Future Generali India Insurance Company Limited)
  • एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (HDFC ERGO General Insurance.)
  • इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (IFFCO-Tokio General Insurance Company Limited)
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी (Universal Sompo general insurance company)
  • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ICICI Lombard General Insurance Company Limited)
  • टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Tata AIG General Insurance Company Limited)
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स (SBI General Insurance)
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (United India Insurance Company Limited)

निष्कर्ष (Conclusion)

या बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शेतकरी कसा मागे राहू शकतो. म्हणून सरकारने शेतकर्त्यांसाठी सोप्या आणि सरळ पद्धतीने शेतातील पिकांना विमा करण्याची प्रधानमंत्री पीक विमा योजना ऑनलाईन पद्धत विकसित केली आणि शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम सरकार करत आहे.

आपण आज पाहिले कशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकविम्याची सद्यस्थिती तपासू शकता. या लेखात आपण समजून घेतले किती सोप्या पद्धतीने पीक विमा तपासू शकता. आणि ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता. त्या विम्याबद्दल तुम्हाला कोणती माहिती मिळेल ते सुद्धा आपण पहिले.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Pradhan mantri kisan samman nidhi yojana

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी मध्ये मोठे बदल ही सर्व कागदपत्रे लागणार

Magel tyala solar pump yojana maharashtra

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु

Namo shetkari mahasmman nidhi yojna th installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी

How to check status of pm kisan payment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे संपूर्ण माहिती

Pradhan mantri kisan fpo yojana

PM Kisan FPO Yojana: सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे

Plastic mulching paper subsidy

प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

Shetkaryanchya kalyanasathi rabavnyat yenarya yojana

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना

Mangel tyala solar pump yojana payment sms

मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

Special arrangements for animals in winter

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

Rabbi hangam digital crop survey

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

Magel tyala solar krushi pump vendor selection option

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

How to do rabi season e pick inspection

रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती