Home  |  प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 18 व्या हप्त्याबद्दल अपडेट | PM Kisan Samman Nidhi Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता (installment) देशातील 9.4 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 05 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम मधून एका कार्यक्रमाला संबोधित करताना जमा करणार आहेत.

तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे?

घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची सद्यस्थिती पाहू शकता. तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही, हे तुम्ही पाहू शकता. त्या सोबतच तुम्ही तुमच्या मागील हप्त्याची माहिती सुद्धा तुमच्या मोबाईलवरून तपासू शकता. चला तर मग सविस्तर पाहू या.

1)  सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये "pfms" टाइप करून शोधून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही pfms च्या अधिकृत वेबसाइटवर जा - येथे क्लिक करा

2)  नंतर, तुम्हाला प्रथम दिसत असलेल्या PFMS वर क्लिक करा, नंतर एक "सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली" (Public Financial Management System - PFMS) वेबसाइट तुमच्या समोर उघडेल.

3) त्यानंतर मेनूमधील "पेमेंट स्टेटसवर" (Payment Status) जा आणि "डीबीटी स्टेटस ट्रॅकरवर" (DBT Status Tracker) क्लिक करा.

4) आता तुमच्यासमोर "DBT Status of Beneficiary and Payment Details (Beta ver 1.0)" म्हणून एक फॉर्म उघडेल.

5) आता तुम्हाला समोर दिसत असलेल्या "Category" मधून "PMKISAN" ही Category निवडून घ्यायची आहे.

6) त्यांनतर "DBT Status" मध्ये तुम्हाला "Payment" हा पर्याय निवडलेला राहू द्या.

7) आता तुम्हाला "Enter Application Id" (Enter PM Kisan Registration No.) किंवा "Enter Beneficiary Code" या दोघांमधून एक भरून घ्यायचा आहे.

8) जर तुम्हाला तुमचा "PM Kisan Registration No" माहित नसेल तर, तो कसा चेक करायचा ते पाहू या.

  • आधी तुम्हाला "PM Kisan Samman Nidhi Yojana" च्या अधिकृत वेबसाइटवर जा - येथे क्लिक करा
  • वेबसाईटवर गेल्यानंतर समोर दिसत असलेल्या "Know Your Status" वर जाऊन क्लिक करा. - येथे क्लिक करा
  • नंतर तुम्हाला "Know your registration no" वर क्लिक करायच आहे. - येथे क्लिक करा
  • तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये दोन पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही "Mobile Number" वापरून तुमचा नोंदणी क्रमांक शोधू इच्छिता का आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचे "Aadhaar Number" वापरून तुमचा नोंदणी क्रमांक शोधू इच्छिता का. आता तुम्ही तुमच्या सोईनुसार एक ऑप्शन सेलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यात तो नंबर टाकून घ्या.
  • नंबर टाकला गेल्यानंतर समोरील कॅप्चा भरून घायचा आहे.
  • आता तुम्ही "Get Mobile OTP" नंबरवर क्लिक करायचं आहे. आणि आता तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवर एक "OTP" येईल. तुमच्या मोबाइलवर आलेला "OTP" लिहून घ्या आणि नंतर "Get Data" बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या समोर एक पानावर तुमचे नाव आणि "PM Kisan Registration No" दिसेल. ते तुम्ही कुठे तरी लिहून ठेवा. भविष्यात तुम्हाला उपयोगी येऊ शकतो.

9) नंबर टाकल्यावर समोरील कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे आणि समोरील "Search" बटनावर क्लिक करा.

10) क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या सध्याच्या पेमेंट आणि मागच्या पेमेंटची पूर्ण माहिती पाहायला मिळेल. त्यात तुम्ही सध्याच्या पेमेंटची माहिती पाहू शकता आणि तुमच्या पेमेंटची स्थिती काय आहे हे देखील पाहू शकता. तुम्हाला पेमेंट मिळणार आहे की नाही, याबाबतची सर्व माहिती तुम्ही तिथे पाहू शकता.

या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमची पेमेंट स्थिती तपासू शकता.

पेमेंट तपशील पृष्ठावर तुम्हाला कोणती स्थिती पाहायला मिळेल | Payment Details page

तुमची पंतप्रधान किसान सन्मान (पीएम किसान सन्मान निधी योजना) निधीच्या पुढील हप्त्यासाठी निवड झाली असेल, तर तुम्हाला सत्यापित स्थिती पाहण्यास मिळेल.

Validation status :- validated - 25-Sep-2024 01:05:06

Fund status :- Approved by agency - 25-Sep-2024 01:06:05

File Status:- Bank Receive - 25-Sep-2024 01:51:30

Credit Status :- Payment Pending at Bank

वरील सर्व माहिती तुम्हाला दिसेल.

निष्कर्ष (Conclusion)

या लेखात पाहिले की प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेत पात्र शेतकरी बांधवांना पुढील हफ्ता कधी मिळणार आहे. त्यासोबतच तुम्ही तुम्हाला मिळत असलेल्या हफ्त्यांची संपूर्ण माहिती आणि पुढील हफ्त्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या लेखात सांगितल्या प्रमाणे तपासू शकता. त्या सोबत तुम्हाला तुमच्या पेमेन्ट विषयी सविस्तर माहिती तपासलेल्या माहितीमध्ये वाचायला मिळेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW