Home  |  रब्बी हंगामातही 1 रुपयात मिळणार पीक विमा

रब्बी हंगामातही 1 रुपयात मिळणार पीक विमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक रुपयात पीक विमा योजना | One Rupee Crop Insurance Scheme

महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत खरीब आणि रब्बी हंगामात पिकवले जाणारे सर्व अन्नधान्य, तृणधान्ये, बाजरी, कडधान्ये आणि तेलबिया पिकांसाठी महाराष्ट्र सरकारने 1 रुपयात पीक विमा सुरू केला आहे.

खरीप हंगामाप्रमाणे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक विमा मिळणार आहे. याच अनुषंगाने 2024-25 मध्ये शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात खरीप हंगामासाठी 1 रुपयात पीक विमा काढला. अशा प्रकारे आता सरकारने शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पीक विमा काढण्यास 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विमा काढण्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पाहताना दिसतो.

पीक विमा म्हणजे काय | What is Crop Insurance

शेतकरी पूर्ण हंगाम शेतात मेहनत करून पेरणी किंवा लागवड करतो. काही नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल, कीडरोग किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याचे साधन म्हणजे पीक विमा. शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात होणाऱ्या खर्चासाठी मदत होते.

पीक विमा प्रक्रिया कधी सुरू होणार आहे

रब्बी हंगामासाठी रब्बी विमा काढण्यास 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पीक विमा (Crop Insurance Scheme) योजनेसाठी लागणारी उर्वरित रक्कम ही राज्य सरकार भरणार आहे. राज्यात रब्बी पिकांसाठी म्हणजे गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा या पिकांचा विमा शेतकरी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

तर उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढण्याची मुभा देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता

अनुक्रमांक लाभार्थ्यांची पात्रता
1 शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
2 ती जमीन शेती करण्यायोग्य पाहिजे.
3 कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरीसुद्धा योजनेसाठी पात्र असणार आहे.
4 भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी योजनेसाठी पात्र असतील.

पीक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्र

अनुक्रमांक लागणारी कागदपत्र
1 शेतकऱ्याचं आधार कार्ड.
2 बँक पासबुक (आधार संलग्न खाते हवे).
3 ७/१२ उतारा.
4 ८ अ प्रमाणपत्र.
5 स्वघोषणा पत्र.

विमा फॉर्म भरण्याचे प्रकार | Types of crop insurance form filling

1) शेतकरी बांधव स्वतः सरकारने अधिकृत तयार केलेल्या PMFBY पोर्टलवर जाऊन 1 रुपयात पीक विमा काढू शकतात.

2) तसेच शेतकरी बँकेत, कंपनी प्रतिनिधी किंवा CSC सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.

पीक विमा फॉर्म कसा भरायचा | How to fill crop insurance form

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रब्बी हंगाम प्रधान मंत्री फसल बिमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्या शेतातील पिकाला स्वरक्षण प्रदान करायचे असेल तर 1 रुपयात पीक विमा कसा करायचा ते सविस्तर पाहू या.

1) सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) या वेबपोर्टलवर जा. वेबपोर्टलवर जाण्यासाठी समोरील लिंक क्लिक करा. - येथे क्लिक करा

2) वेबपोर्टलवर आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला भाषा बदलण्यासाठीचा पर्याय येईल. तिथून तुमची भाषा निवडून घ्या किंवा डीफॉल्ट भाषा इंग्लिश निवडलेली राहू द्या.

3) नंतर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या शेतकरी कॉर्नर बटणावर क्लिक करून घ्या.

4) तुमच्या समोर एक पॉपअप उघडेल त्यात “शेतकऱ्याचा अर्ज” असे शीर्षक दिसेल. खाली तुम्हाला लॉगिन करण्यासाठी “शेतक-याकरिता लॉग इन करा” बटण आणि नवीन शेतकरी रजिस्ट्रेशनसाठी “Guest Farmer” असे दोन पर्याय दिसतील. त्या मधून एक पर्याय निवडून घ्या.

5) तुम्ही या वेबपोर्टलवर पहिल्यांदा भेट देत असाल आणि तुमचे इथे खाते नसल्यास, तर तुम्हाला “Guest Farmer” बटणावर क्लिक करायचं आहे.

तपशील सविस्तर माहिती
शेतकरी तपशील (Farmer Details) 1) शेतकऱ्याची माहिती भरताना आधी तुमचे पूर्ण नाव.
2) तुमच्या बँक पुस्तकावर असलेले नाव.
3) तुमच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव.
4) तुमचा मोबाईल क्रमांक, समोर दिसत असलेल्या “Verify” बटणावर क्लिक करून मोबाईल नंबर verify करून घ्या.
5) नंतर वय, जातीचा प्रकार, लिंग निवडून घ्या.
6) शेतकरी प्रकार (Small, Marginal, Others) निवडून घ्या.
7) शेतकरी वर्ग (Owner, Tenant, Share Cropper) निवडून घ्या.
निवासी तपशील (Residential Details) निवासी तपशीलमध्ये तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा उपजिल्हा म्हणजे तालुका, त्यानंतर तुमचे गाव, पत्ता आणि शेवटी पिन कोड भरून घ्या.
शेतकरी आईडी (Farmer ID) ID Type निवडून घ्या आणि त्याचा क्रमांक भरून तो verify करून घ्या. उदाहरणार्थ ID Type मध्ये आधार कार्ड निवडून घ्या, आणि आधार क्रमांक टाकून मोबाईलवर आलेल्या OTP ने व्हेरिफाय करून घ्या.
बँक खाते तपशील (Account Details) यात तुम्हाला तुमच्या बँक खात्याविषयी माहिती भरावयाची आहे.
1) तुमच्याकडे आईएफएससी कोड आहे का? होय असेल तर “होय” वर क्लिक करा. नाही असेल तर “नाही” वर क्लिक करा.
2) आईएफएससी क्रमांक, राज्य, जिल्हा, बँकेचे नाव, शाखेचे नाव निवडून घ्या. नंतर तुमचं बचत बँक A/C क्रमांक दोनदा भरून घ्या.

6) खाली दिलेला कॅप्चा भरून खाली दिलेल्या “वापरकर्ता तयार करा” बटणावर क्लिक करून घ्या आणि तुमचे खाते तयार करून घ्या.

7) शेतकरी लॉगिन करण्यासाठी आता आपण मुखपृष्ठावर जाऊन “शेतकरी कॉर्नर” बटणावर क्लिक करून पुढे “शेतक-याकरिता लॉग इन करा” या बटणावर क्लिक करून घेऊ.

8) पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा भरून घ्यायचा आहे. आणि नंतर “Request for OTP” बटणावर क्लिक करून घ्या. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल.

9) तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTP खाली दिलेल्या जागेत भरून घ्या. आणि “Submit” बटणावर क्लिक करा. (मित्रांनो, OTP हा 1 मिनिटांसाठी वैध असतो. म्हणून लवकर OTP टाकून सबमिट बटणावर क्लिक करून घेणे.)

10) OTP verify झाल्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिसेल. तुम्ही आधी विमा काढला असेल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता.

11) आपल्याला रब्बी हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी सर्वात वरती दिसत असलेल्या “Apply for Insurance” वर क्लिक करा.

12) रेजिस्ट्रेशनसाठी तीन स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे.

अनुक्रमांक प्रकार
1 शेतकरी बांधवांची वैयक्तिक आणि निवासी माहिती (घराचा आणि शेत ज्या गावात आहे, तिथली माहिती)
2 शेतकऱ्याच्या बँक खात्याविषयी माहिती (बँकेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC क्रमांक, बँक अकाउंट नंबर, शाखेचे नाव)
3 शेतात जे पीक लावले आहे, त्या पिकाची संपूर्ण माहिती.

13) वैयक्तिक आणि निवासी माहिती आपण शेतकरी नोंदणी करताना आधीच भरली आहे. पण तुम्हाला भरलेल्या माहितीमध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता.

14) तुमची भरलेली माहिती संपूर्ण बरोबर असेल तर खाली दिलेल्या “Next” बटणावर क्लिक करा.

15) पुढे आता बँक खात्याविषयी माहिती भरायची आहे. या आधी भरलेल्या बँक खात्यातून तुमचे एक बँक खाते निवडून पुन्हा “Next” बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.

16) शेतकरी मित्रांनो, आता पुढे “Crop Details” माहिती भरून घ्यायची आहे.

  • तुमचे राज्य आधीच निवडून आले असेल, पण त्यात बदल करायचा असेल तर तुम्ही दुसरे राज्य शकता. काही बदल नसेल तर निवडलेले राज्य राहू द्या आणि पुढे चला.
  • नंतर Scheme मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील, आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेत फॉर्म भरतोय म्हणून “Pradhan Mantri Fasal Bima Yojana” पर्याय निवडून घ्यायचा आहे.
  • त्या नंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे. आपला हंगाम रब्बी हंगाम आहे, म्हणून रब्बी हंगाम निवडून घ्या.
  • चालू वर्ष निवडून घ्या. आपण 2024 रब्बी हंगामासाठी फॉर्म भरतोय म्हणून 2024 निवडून घ्या.

17) नंतर पुढे तुम्हाला जमिनीचा तपशील (Land Details) माहिती भरून घ्यायची आहे. तुम्ही रेजिस्ट्रेशन करताना भरलेली गावाची माहिती ही तुमच्या जमिनीची माहिती म्हणून भरलेली दिसेल. या माहितीमध्ये काही बदल असेल तर खाली दिसत असलेल्या “Add New Land Details” वर क्लिक करून तुमच्या जमिनीची माहिती भरून घ्या.

18) खाली तुम्हाला “Mix Cropping” पर्याय निवडून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतात एकच पीक घेत असाल तर “No” पर्यायावर क्लिक करा. आणि जर तुमच्या शेतात 2-3 पीक असतील तर “Yes” पर्यायावर क्लिक करा.

19) खाली आता पीक निवडून घ्या. तुम्ही तुमच्या शेतात लावलेले पीक निवडून घ्यायचे आहे. त्यात खूप प्रकारच्या पिकांची यादी आहे, म्हणून सर्व पिकांची नावे पाहून योग्य पीक पर्याय निवडा.

20) शेतात पीक पेरणी केलेली तारीख निवडा.

21) पुढे खाता नंबर आणि खासरा नंबर किंवा सर्वे नंबर टाकून Verify बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.

22) Verify बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या शेतीची माहिती तुमच्या समोर दिसेल. माहिती बरोबर असेल तर सिलेक्ट करून घ्या. आता तुमच्या समोर शेतकऱ्याची माहिती दाखवली जाईल आणि आधी इन्शुरन्स केला असेल तर त्याची माहिती पाहण्यासाठी “View Already Insured” बटण दिसेल, त्या बटणावर क्लिक करून पाहू शकतात.

23) तुमची माहिती बरोबर असेल तर खालील “Submit” बटणावर क्लिक करा.

24) हे झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे इन्शुरन्स क्षेत्र दाखवले जाईल. तुम्हाला या क्षेत्रात बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता.

25) “Add” बटणावर क्लिक करून घ्या. खाली तुम्हाला भरलेल्या पिकांची माहिती दाखवली जाईल.

26) खाली तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करून घायचे आहे. त्यात कोणती कागदपत्रे भरायची आहेत ते पाहू.

  • बँक पासबुक, जमिनीचे कागदपत्रे आणि स्वघोषित पत्र (अपलोड करत असलेल्या कागदपत्रांची साइज ही 500 KB पेक्षा कमी पाहिजे)

27) अपलोड (upload) बटणावर क्लिक करून घ्या. जेणेकरून तुमचे कागदपत्र अपलोड होतील आणि तुम्हाला “Success” संदेश दाखवला जाईल. म्हणजे तुमचे कागदपत्र अपलोड झाले आहे.

28) “Next” बटणावर क्लिक करून घ्या, आता तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती तपासण्यासाठी दाखवली जाईल. माहिती तपासून घ्या. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा.

29) पुढे तुम्हाला विमा साठी पेमेंट करायचे आहे. पेमेंट १ रुपयाचे असणार आहे. जर तुम्ही जास्त पिकांसाठी विमा करत असाल तर तुम्हाला तितके पेमेंट करावे लागेल. उदाहरणार्थ तुम्ही ४ पिकांसाठी विमा करत असाल तर तुम्हाला ४ रुपयांचे पेमेंट करावे लागेल.

30) पेमेंट करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. (Net Banking, Credit / Debit Card, QR Code Scan, UPI Payment) या मधून एक पर्याय निवडून पेमेंट करून घ्यायचे आहे.

31) पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर पाठवले जाईल. तिथे तुम्ही भरलेला विमा तपासू शकता.

मित्रांनो, वर दिलेल्या माहितीच्या अनुसार तुम्ही तुमच्या पिकांचा विमा हा घरी बसून करू शकता.

पीक विमा योजनेचे फायदे | Benefits of Crop Insurance Scheme

कमी खर्चात पिकांना मोठं संरक्षण

शेतकरी बांधवांना 1 रुपयात संपूर्ण हंगामासाठी त्यांच्या शेतातील पिकाला संरक्षण मिळते. त्यामुळे कमी खर्चात पिकाला संरक्षण मिळतो, त्यासोबत त्यांची आर्थिक बचत सुद्धा होते.

नैसर्गिक आपत्तीपासून पीक संरक्षण

शेतकरी मित्रांनो, हवामानाचे अचूक अंदाज मिळत नसल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान होते. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, वादळ, कीडरोग अशा असंख्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्याला खूप मोठे नुकसान होते.

अशातच पीक विमामुळे होणाऱ्या नुकसानीपासून पिकांना संरक्षण मिळते आणि नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळत राहते.

आर्थिक मदत

शेतात पिकाचे नुकसान झाले, तर कंपनी तुम्हाला विमा भरपाई देईल. त्यामुळे तुम्ही पुढील हंगामासाठी लागणाऱ्या भांडवलाची चिंता राहणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे.

राज्यसरकारकडून मोठी मदत

शेतकरी मित्रांनो, तुम्ही 1 रुपयात पीक विमा काढल्यानंतर उर्वरित रक्कम ही राज्यसरकार भरत असते. त्यामुळे तुम्हाला विमाचा अतिरिक्त भार सोसावा लागत नाही.

शेतीतील जोखीम कमी होते

शेतात संपूर्ण हंगामात शेतकऱ्याचे कोणत्याही प्रकारच्या पिकाचे अनपेक्षित नुकसान झाल्यास विमा कंपनी पीक नुकसान भरपाई देते. त्यामुळे शेतकरी बांधवाला आर्थिक मदत मिळते.

पीक विमा योजनेचे तोटे | Disadvantages of Crop Insurance Scheme

पीक विमा सर्व पीकांसाठी उपलब्ध नाही

शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सर्व पिकांना लागू नाही. त्यामुळे पीक विमा काढताना एकदा तपासून घ्या कोणत्या पिकांना १ रुपयात पीक विमा आहे आणि इतर पीकांसाठी पूर्ण रक्कम भरावी लागेल, म्हणजे तुम्हाला अन्य पीकांसाठी स्वतंत्र विमा काढावा लागेल.

कागदपत्रांची अडचण

काही वेळेस विमा मंजूर होऊनसुद्धा शेतकरी बांधवांना मिळत नाही. कारण शेतकऱ्याकडे 7/12 उतारा, 8 अ उतारा, बँक खाते, बँक खात्यासोबत आधार लिंक सारख्या कागदांमुळे शेतकरी पात्र असूनसुद्धा विमाच्या लाभापासून वंचित राहतात.

सरकारी अनुदानाचा विलंब

राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांना अनुदान देत असते, म्हणून काही वेळा राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना उर्वरित विम्याची रक्कम दिली जात नाही. त्यामुळे कंपनीकडून शेतकरी बांधवांना विमा रक्कम उशिरा मिळण्याची शंका असते.

विमा कंपनीची शर्ती आणि अटी

विमा कंपन्यांचे अटी आणि शर्ती खूप कीटचकट म्हणजे गुंतागुंतीचे असतात. ते शेतकरी असो की सर्व सामान्य जनता समजण्यास कठीण असतात. त्यामुळे क्लेम करून सुद्धा लहान अटींमुळे शेतकरी बांधवांचा अर्ज फेटाळण्यात येतो.

माहितीचा अभाव

शेतकऱ्यांना पीक विमाच्या अटींविषयी, योजनेविषयी संपूर्ण माहिती नसते. अर्जाची शेवटची तारीख, अर्ज प्रक्रिया आणि योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने शेतकरी बांधव विमा काढत नाहीत. आणि गरीब शेतकरी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतो.

निष्कर्ष (Conclusion)

शेतकरी बांधवांनो, पिकाला स्वरक्षण म्हणून विमा करायला हवा. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामाला सुद्धा आता १ रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. याचा लाभ राज्यातील शेतकरी बांधवांनी घ्यायला हवा.

त्यासाठी स्वतः शेतकरी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करू शकतो. वर दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही पिकाचा विमा काढू शकता.

FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: कोणत्या पीकांवर विमा घेऊ शकतो?
उत्तर: सर्व अन्नधान्य, तृणधान्ये, बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि वार्षिक व्यावसायिक/वार्षिक बागायती पिकांसाठी विमा घेऊ शकतो.

प्रश्न 2: रब्बी हंगामासाठी पीक विमा प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
उत्तर: 1 नोव्हेंबरपासून शेतकरी विम्यासाठी अर्ज करू शकतात. गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा या पिकांसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात, तर उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात.

प्रश्न 3: विमा ची उर्वरित रक्कम कोण अदा करतो?
उत्तर: 1 रुपया भरून पीक विमा घेतल्यानंतर उर्वरित रक्कम ही राज्य सरकार भरते.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Pradhan mantri kisan samman nidhi yojana

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी मध्ये मोठे बदल ही सर्व कागदपत्रे लागणार

Magel tyala solar pump yojana maharashtra

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु

Namo shetkari mahasmman nidhi yojna th installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी

How to check status of pm kisan payment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे संपूर्ण माहिती

Pradhan mantri kisan fpo yojana

PM Kisan FPO Yojana: सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे

Plastic mulching paper subsidy

प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

Shetkaryanchya kalyanasathi rabavnyat yenarya yojana

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना

Mangel tyala solar pump yojana payment sms

मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

Special arrangements for animals in winter

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

Rabbi hangam digital crop survey

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

Magel tyala solar krushi pump vendor selection option

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

How to do rabi season e pick inspection

रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती