Home  |  Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

डिजिटल क्रॉप सर्वे (Digital Crop Survey) आहे तरी काय?

आधी पीक पाहणी ही सरकारी अधिकारी शेतात जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात बसून करत असत. पण त्यात खूप वेळ लागायचा आणि संग्रहित माहिती सुद्धा पूर्णपणे बरोबर नसायची. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा किंवा पीक कर्ज घ्यायला खूप अडचणी यायच्या.

म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि कृषी अधिकाऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म चालू केलं. त्यात स्वतः शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकाविषयी माहिती भरू शकेल. यात सरकारने एक मोबाईल अॅप तयार केले. या अॅपमध्ये लॉगिन करून शेतकरी स्वतःच्या शेताची पीक पाहणी करू शकतो.

या अॅपच्या माध्यमातून खूप साऱ्या पिकांची ई पीक पाहणी करता येते. यात डिजिटल पद्धतीने केलेली ई-पीक पाहणी जमा केली जाते. आणि तिचा वापर हा सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोगात आणला जातो.

यात शेताचा GPS लोकेशन ट्रॅक केला जातो, जेणेकरून अचूक लागवड झालेल्या जमिनीची पीक पाहणी नोंद व्हावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी कधी सुरू होणार आहे

शासनाने संपूर्ण राज्यात पीक पाहणी करण्यासाठी आदेश काढला आहे. चला तर पाहू या आदेशात काय म्हटले आहे. सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) अँप सुरू करणार आहे आणि या अँपचा वापर करून शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी करायची आहे.

संपूर्ण राज्यात 1 डिसेंबर 2024 पासून ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात होणार आहे. दोन स्तरात ही पाहणी केली जाणार आहे. पहिला स्तर हा शेतकरी स्तरावर आणि दुसरा स्तर सहाय्यक स्तरावर पिकाची नोंद ही मोबाईल अँपद्वारे करण्यात येणार आहे.

1. पहिला टप्पा शेतकरी स्तरावर

त्यासाठी 01 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी केली जाणार आहे. यात शेतकरी बांधवाना प्ले स्टोअरवर सरकारने तयार केलेले अँप डाउनलोड करून घ्या. आणि शेतात जाऊन GPS location ऑन करून घ्या. आणि शेताची ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्या.

2. दुसरा टप्पा कृषी सहाय्यक स्तरावर

त्यासाठी 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कृषी सहाय्यक स्तरावर पीक पाहणी केली जाणार आहे. यात शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांची मदत घेऊन शेताची ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे.


ई पीक पाहणी करण्याचे फायदे

1. पीक कर्ज घेण्यासाठी सोयीचे

बँकेतून पीक कर्ज घ्यायचे असेल तर अचूक नोंदणी सादर करणे गरजेचे असते. डिजिटल क्रॉप सर्वे मुळे शेतकरी बांधवांना कर्जाची प्रक्रिया करणे सोपे जाते.

2. पीक विमा काढण्यासाठी उपयोगी आहे

राज्यात पीक विमा हा १ रुपयात भरला जातोय. त्यासाठी डिजिटल नोंदणी स्वीकारल्या जातात. म्हणून शेतकरी बांधवांनी डिजिटल ई पीक पाहणी केली असेल तर त्यांची पुढील फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी होईल.

3. योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सोईस्कर

जर शेतकरी बांधवांनी डिजिटल ई-पीक पाहणी केली असेल, तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सोईस्कर होईल.

4. आपत्कालीन परिस्थितीत मदत

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई किंवा क्षेत्रानुसार सर्वेक्षण करण्यासाठी जलद माहिती मिळू शकते आणि शेतकरी बांधवांना योग्य ती भरपाई शेतकरी बांधवांकडून मिळू शकते.


ई-पीक पाहणी अ‍ॅप डाउनलोड

पहिला पर्याय : E-Peek Pahani ई-पीक पाहणी (DCS) हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करा – https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&pcampaignid=web_share

दुसरा पर्याय : तुमच्या स्मार्ट मोबाईलमध्ये (Android Mobile) Google Play उघडून घ्या आणि त्यात e-Peek Pahani किंवा ई-पीक पाहणी किंवा Digital Crop Survey (DCS) किंवा डिजिटल क्रॉप सर्वे असे टाकून सर्च (Search) करून घ्या.

आणि नंतर महाराष्ट्र सरकारने तयार केलेले अँप डाउनलोड करा. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून तुमच्या शेताची ई-पीक पाहणी या अँपवरून करा.


महत्त्वाचे टप्पे

1. सरकारने तयात केलेल्या मोबाईल अँपचा वापर करणे बंधनकारक.

2. तुमच्या शेताची क्षेत्रफळ, पीक प्रकार आणि अँपमध्ये मागितलेली माहिती नचुकता भरून घ्या.

3. पीक पाहणी करताना Geo Fencing बंधनकारक असेल. तुमची माहिती याचिका आहे का, एकदा जरूर खात्री करून घ्यायची आहे.

4. शेतकरी बांधव, फॉर्म भरताना तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल तर स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

निष्कर्ष (Conclusion)

रब्बी हंगाममध्ये पिकांची ई-पिक पाहणी करण्याबाबत सरकारने GR काढला असून. शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकाची ई-पिक पाहणी करून घेणे आवश्यक आहे. वरील लेखात आपण पाहिले. ई-पिक पाहणी करण्याचे प्रकार, त्याचे फायदे, आणि शेतकरी मोबाईलवरून कशा प्रकारे करू शकतात.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nddb dairy plan maharashtra 19 districts

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत NDDB च्या मदतीने पशुपालकांसाठी गाय-भैंस आणि चारा योजना

Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Lift irrigation subsidy extended 2027

महाराष्ट्रात लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी 2027 पर्यंत वाढवली

Maharashtra solar spray pump subsidy

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सोलर स्प्रे पंपावर 100% अनुदान

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान