Home  |  पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

थंडीमुळे पशुपालनावर होणारे वाईट परिणाम

थंडी जास्त प्रमाणात वाढली तर माणसांना सुद्धा त्याचा त्रास होतो. माणसे स्वतःची काळजी घेतात, पण जनावरे हे मुक्के आणि बाहेर बांधल्यामुळे त्यांची काळजी कोणी घेत नाही. त्यामुळे आपल्याला जनावरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. म्हणून हिवाळ्यात पशुपालनावर थंडीमुळे काही समस्या ह्या उद्भवताना दिसून येतात.

1. जनावरांचे आरोग्य आणि आजार

शेतकरी बांधवानो, हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने आपल्या गोठ्यामधील जनावरांवर सर्वसाधारण आजारांचा धोका वाढतो. मग त्यात आपण सर्दी, न्यूमोनिया सारखे आजार पाहू शकतो. या दिवसांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेऊन जनावरांवर योग्य उपचार करून घेणे आवश्यक आहे.

2. जनावरांच्या उत्पादन घट

हिवाळ्यात गोठ्यामध्ये थंड हवा शिरत असल्याने याचा परिणाम आपल्याला दूध उत्पादनात होणाऱ्या घटीवर पाहायला मिळू शकतो. तसेच तुम्हाला थंडीचा परिणाम हा जनावरांच्या प्रजननक्षमतेवरसुद्धा दिसून येईल.

3. जनावरांचे अन्नपचन

थंडीच्या दिवसांमध्ये पचनक्रिया ही मंदावते. त्याचा परिणाम म्हणजे थंडीत जास्त भूक लागत नाही. याचा परिणाम हा माणसांसोबत जनावरांवर लागू होतो. याचा परिणाम आपल्याला दूध उत्पादनावर आणि वासरांच्या वाढीवर दिसून येतो. म्हणून हिवाळ्यात जनावरांना पूरक आणि पोषणतत्त्वांनी भरपूर असलेला आहार दिला गेला पाहिजे.

4. वाढ कमी होतेे

हिवाळ्यात जास्त थंडीमुळे पचनक्रिया मंदावते आणि याचा परिणाम जनावरांच्या वासरूंवर पाहायला मिळतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिवाळ्यात जनावरांसाठी आवश्यक उपाययोजना

1. जनावरांची राहण्याची व्यवस्था

ज्या प्रमाणे हिवाळ्यात जास्त थंडीमुळे आपण आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेतो. त्यात प्रमाणे जनावरे हे आपल्या परिवाराचे सदस्य समजून त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. हिवाळ्यात त्यांच्यासाठी गोठ्यात उबदार आणि आरामदायक जागेची व्यवस्था करायला हवी.

थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांचे थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात पडद्याची किंवा चाऱ्याच्या भिंतीची व्यवस्था करायला हवी. जर तुमच्या गोठ्यात तुमच्या कडे विजेची व्यवस्था असेल तर जनावरांची जागा उष्ण ठेवण्यासाठी गरम पाण्याचे हिटर किंवा बल्ब लावून त्यांना उब द्यावी.

2. जनावरांसाठी पोषण आहार

हिवाळ्यात थंडीचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील उष्णता टिकवून राहण्यासाठी जनावरांना जास्त ऊर्जेची गरज भासते. जनावरांचा त्यांच्या शरीरात ह्या ऊर्जेची भर आपण त्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था करून करू शकतो. त्यासाठी त्यांच्या पोषक आहाराची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

त्यांच्या आहारात साधारण गहू, मका, बाजरी यासारख्या कडधान्यांचा वापर करायला पाहिजे. थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांच्या आहारात खनिजयुक्त अन्नाचा समावेश करायला हवा. विशेष काळजी घ्यावयाची म्हणजे त्यांच्या आहारात गरम पाणी, सुक्या चाऱ्यात ओलसर गहू आणि हरभरा या सारख्या घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, तुमच्या गोठ्यात दूध देणारे जनावरे असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनेयुक्त म्हणजे सोयाबीन आणि कडवळ याचा समावेश करू शकता. या प्रकारचा आहार तुमच्या गोठ्यातील जनावरांना दिला गेला पाहिजे.

पशुपालन करणाऱ्या मित्रांनो, तुम्हाला अजून जास्त आणि सविस्तर माहिती हवी असल्यास तुमच्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, जेणेकरून तुम्हाला हिवाळ्यात जनावरांविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. त्या प्रमाणे, थंडीच्या दिवसात तुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावरांच्या आहाराची काळजी घेऊ शकता.

3. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाहेर असल्याने हिवाळ्यात त्यांचे पिण्याचे पाणी हे थंड होते. त्यामुळे जनावरे शरीराला हवे तेवढे पुरेसे पाणी पित नाहीत. म्हणून तुमच्या गोठ्यात जनावरांना पिण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा कोमट पाण्याची व्यवस्था केली तर उत्तम होईल.

गोठ्यात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना म्हणून तुम्ही हिवाळ्यात त्यांच्या पाण्याची स्वतंत्र जागा बनवू शकता जेणेकरून थंडीमुळे पाणी जास्त थंड होणार नाही. जनावरांना पाणी नियमित स्वच्छ दिले गेले पाहिजे. त्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे.

4. हिवाळ्यात आजारांपासून जनावरांचे संरक्षण

हिवाळ्यात जास्त थंडीमुळे गोठ्यातील जनावरांमध्ये सर्दी, न्यूमोनिया, आणि खोकल्यासारख्या आजारांचा प्राधुरभाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. त्यासाठी तुमच्या जवळच्या पशुवैद्याचा योग्य सल्ला घेऊन उपचार करायला पाहिजे.

त्यासोबतच हिवाळ्यात जास्त थंडीमुळे जनावरांना न्यूमोनिया, फूट अँड माउथ डिसीज (FMD) सारखे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून याच्यावर उपाययोजना आणि अशा आजारांपासून संरक्षणासाठी जनावरांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या गोठ्यातील जनावरांना हिवाळ्यात थंडीमुळे आजार होणार नाहीत.

5. गाभण जनावरांची विशेष काळजी

तुमच्या गोठ्यातील गाभण जनावरांची हिवाळ्यात थंडीपासून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनावरांना वेळोवेळी पिण्यासाठी कोमट पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, खनिजयुक्त आहार, त्यांच्या खाण्यात जीवनसत्त्वेयुक्त चारा असेल याची काळजी घ्यावी आणि त्यासोबतच प्रथिनेयुक्त चारा द्यावा,

तसेच गोठ्यात त्यांची बसण्याची जागा उबदार ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. वेळोवेळी डॉक्टरांचे योग्य सल्ले घेऊन लसीकरण आणि खाण्याची उत्तम काळजी घ्यायला पाहिजे.

6. लहान जनावरांचे नियोजन

शेतकरी बांधवानो, हिवाळ्यात लहान जनावरांना थंडीचा खूप जास्त प्रमाणात धोका असतो. त्यासाठी लहान जनावरांना उबदार जागेची व्यवस्था करावी. त्यांच्या आजूबाजूला गोंट्याने संरक्षण करणे, गोंटे उबदार असल्याने वासरूंचे थंडीपासून संरक्षण होईल. त्यांचा आहार हा पौष्टिक तत्वांनी भरपूर असावा आणि वासरूंची रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार त्यांच्या खाण्यात दिला गेला पाहिजे.

7. दुधाळ जनावरांची विशेष काळजी

थंडीच्या दिवसात चारा जास्त खाल्ला जात नाही आणि पाणी थंड असल्याने तेही जास्त पिले जात नाही. याचा परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी हिवाळ्यात जनावरांना पुरेसा आराम आणि पौष्टिक आहार दिला गेला पाहिजे. त्यासोबतच गोठ्यात म्हणा किंवा बाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागेची सोय करायला हवी.


हिवाळ्यात जनावरांसाठी विशेष उपाययोजना

1. थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी उबदार आणि स्वच्छ जागेची व्यवस्था.

2. हिवाळ्यात जनावरांची योग्य हालचाल होणे गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी मोकळ्या जागेची व्यवस्था करणे खूप आवश्यक आहे.

3. जर तुमच्या गोठ्यातील जनावराला आजारपणाचे लक्षण दिसत असेल तर लगेच डॉक्टरांनाच सल्ला घ्या. जेणेकरून त्यांच्या वर योग्य वेळी योग्य उपचार होईल.

4. हिवाळ्यात जनावरांसाठी वेळोवेळी पौष्टिक आहार आणि स्वच्छ पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे.


हिवाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनासाठी मदत.

सरकार वेळोवेळी जनावरांच्या आरोग्यासाठी मोफत लसीकरण आणि तपासणी शिबीर गावोगावी असते. सरकार जनावरांच्या खाद्यासाठी वेळोवेळी अनुदान सुद्धा देत राहते, जेणेकरून चारा अभावी जनावरांचे हाल नको. त्यासोबतच शेतकरी बांधवांना जनावरे घेण्यासाठी सुद्धा सरकार अनुदान देते.

त्या बरोबर आता सरकार शेड बांधण्यासाठी सुद्धा अनुदान देत आहे. सरकारचा एकाच उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांनी जास्त प्रमाणात पशुपालन करायला पाहिजे, आणि कोणत्याही कारणास्तव मुक्या जनावराचे हाल नको.

शेतकरी मित्रांनो, सरकार जनावरांसाठी मनरेगा पशु शेड योजना राबवत आहे. त्यात तुम्हाला 3 किंवा त्यापेक्षा कमी जनावरांसाठी सरकार 75 ते 83 हजार रुपये, त्यासोबतच 3 ते 5 जनावरांसाठी 1 लाख 16 हजार रुपये आणि 6 पेक्षा जास्त जनावरांसाठी सरकार 1 लाख 60 हजार रुपये अनुदान देणार आहे.


निष्कर्ष (Conclusion)

हिवाळ्यात पशु व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पशु व्यवस्थापन व्यवस्थित केल्याने गोठ्यातील जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनात घट कमी करणे.

त्यासोबतच जनावरांच्या गोठ्यात बसण्यासाठी उबदार जागा, स्वच्छ पाणी, पोषणतत्त्वांनी भरलेला चारा, आणि मुख्य म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे. सरकारी योजनांचा लाभ घेऊन जनावरांचे नियोजन करण्यास आर्थिक मदत मिळते.

शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावरांचे योग्य नियोजन केले तर त्यांची तब्येत नीट राहील आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या उत्पादनात वाढ होताना दिसेल.

या लेखाचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावरांचे नियोजन करावे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा मिळेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Lift irrigation subsidy extended 2027

महाराष्ट्रात लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी 2027 पर्यंत वाढवली

Maharashtra solar spray pump subsidy

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सोलर स्प्रे पंपावर 100% अनुदान

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra heavy rain alert 2025

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: गडचिरोली, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट