Home  |  मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश

केंद्र सरकारच्या PM कुसुम सोलर पंप आणि राज्य सरकारच्या मागेल त्याला सोलर पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात दिवसा वीज मिळावी म्हणून या योजना राबवल्या. या योजनेचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना विजेसाठी महावितरणावर अवलंबून न राहता स्वतःची वीज तयार करून दिवसा तिचा वापर करणे.

सध्या देशात आणि राज्यात शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असून सुद्धा त्यांना मोबलक प्रमाणात वीज मिळत नाही आणि शेतकऱ्यांना हवी तशी शेती ते करू शकत नाहीत. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेतात सोलर बसवतील आणि दिवसा सूर्य प्रकाशाने तयार होणाऱ्या विजेवर शेती करतील.

योजनेंतील पुढील टप्पा

ही योजना अधिक साधी आणि सोयीस्कर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. सरकार आता पुढच्या टप्यात लाभार्थ्यांना प्रत्येक पायरीविषयी एसएमएसद्वारे माहिती पुरवणार आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना योजनेविषयी आणि त्यांच्या फॉर्म प्रक्रियेतील बदलांची माहिती मिळेल. कोणताही शेतकरी लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.

मागेल त्याला सोलर पंप योजनेत अर्जाची आणि पेमेंटची स्थिती कशी तपासावी.

1: सरकारने तयार केलेली अधिकृत वेबसाइटवर जावे. -  येथे क्लिक करा

2: नंतर "लाभार्थी सुविधा" या पर्यायावर जाऊन "अर्जाची सद्यस्थिती" वर क्लिक करा.

3: तुमच्या समोर आता नवीन पृष्ठ उघडेल, तिथे "Search by Beneficiary ID" मध्ये तुमचा ID भरा.

4: पुढे दिलेल्या "Search" बटनावर क्लिक करा.

5: "Search" केल्यावर पुढे लाभार्थी शेतकऱ्याची संपूर्ण माहिती तिथे दिसेल.

6: जर तुमचा फॉर्म "Draft" मध्ये असेल तर याचा अर्थ तुमचे पेमेंट बाकी आहे. आणि फॉर्म जर "Draft" मध्ये नसेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म पुढच्या स्टेपसाठी पाठवण्यात आला आहे.

7: तुमचा फॉर्म "Draft" मध्ये असेल तर तुम्हाला खाली "Proceed Payment" दिसेल. आता तुम्ही या बटनावर क्लिक करा, आणि तुम्ही तुमची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. आणि तुमचा फॉर्म ही पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवा.

सोलर पंप योजनेत एसएमएस कसा कार्य करतो?

1. जेव्हा शेतकरी सोलर पंप अनुदानासाठी नोंदणी करतो, त्यानंतर त्याने नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर नोंदणी यशस्वी झाल्याचा एसएमएस पाठवण्यात येतो. त्यात शेतकऱ्याला एक ID प्रदान करण्यात येतो.

2. शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या फॉर्म बदल माहिती ही एसएमएस पाठवण्यात येते. जसे की "तुमचा अर्ज मंजूर झाला आहे", "आपले पेमेंट यशस्वीरित्या भरले गेले आहे", "तुमचे सोलर उपकरणे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे".

3. तुमचे सोलर बसवण्यासाठी पूर्णपणे तयार असेल. तर तुम्हाला एसएमएसद्वारे वितरण तारीख पाठवली जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या सोलरबद्दल माहिती मिळत राहावी.

या योजनेत एसएमएस प्रणालीचे विशेष फायदे.

शीर्षक नाव फायदे
पारदर्शकता शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाविषयी आणि पेमेंट प्रक्रियेविषयी अद्यतनित माहिती पुरवली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना एक पारदर्शक प्रकारे योजनेचा लाभ घेता येतो.
वेळेची बचत शेतकऱ्यांना त्यांचे काम सोडून अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होते आणि त्यांना त्यांच्या मोबाईलवर योजनेत त्यांच्या फॉर्मची स्थिती काय आहे, तेही घरी बसून माहिती असते.
सहजपणे एसएमएसच्या वापरामुळे योजनेची प्रक्रिया सुलभ आणि सोपी होते.

खरा एसएमएस कसा ओळखायचा

महावितरण कंपनी VM-MSEDCL / VK-MSEDCL / AM-MSEDCL / JM-MSEDCL अशा SENDER ID वरून एसएमएस पाठवते. म्हणून आधी तुम्हाला आलेल्या एसएमएस चा SENDER ID तपासा आणि नंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.

निष्कर्ष (Conclusion)

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पेमेंट प्रक्रियेसाठी संदेश प्राप्त होत आहेत. शेतकरी बांधवांनो, आधी प्राप्त संदेशाची पडताळणी करूनच अर्जाची पुढील प्रक्रियेला सुरुवात करा. तुम्हाला शंका वाटत असेल तर संबंधित अधिकार्यांसोबत चर्चा करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW