Home  |  मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

मागेल त्याला सौर कृषी पंप निवड पद्धत

शेतकरी बांधवानो, या योजनेत काही दिवसांपूर्वी पेमेन्ट करण्यासाठी संदेश (SMS) प्राप्त झाले होते. ज्या शेतकरी बांधवांनी 3 HP साठी अर्ज केला होता, अशा शेतकरी बांधवांना 22,000 ते 23,000 रुपये भरणा करण्यासाठी संदेश प्राप्त झाले होते.

ज्या शेतकरी बांधवांनी 5 HP साठी अर्ज केला होता, अशा शेतकरी बांधवांना 32,000 ते 33,000 रुपये भरणा करण्यासाठी तर ज्या शेतकऱ्यांनी 7.5 HP पंप साठी अर्ज केला होता, अशा शेतकरी बांधवांना 44,000 ते 45,000 रुपये इतका भरणा करण्यासाठी संदेश पाठवण्यात आले होते. भरपूर शेतकरी बांधवांनी पेमेन्ट प्रक्रिया ही पूर्ण केली.

फॉर्म भरण्याच्या बाबतीत जालना जिल्हा हा प्रथम क्रमांकावर तर बीड जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर होता. इतके फॉर्म भरण्याचे कारण म्हणजे वेळेवर शेतकरी बांधवांना वीज दिली जात नाही. ठराविक वेळेसाठी वीज दिली जाते, त्यात पण शॉर्ट सर्किट, वीजपुरवठा काही कारणास्तव खंडित होणे अशा भरपूर गोष्टींनी शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.

म्हणून देशातील प्रत्येक शेतकरी हा आपल्या मालकीच्या आणि पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतात सोलर पंप लावण्यासाठी इच्छुक आहे. मग या योजनेत जो शेतकरी सर्वात आधी येईल म्हणजे आधी फॉर्मची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेल, त्या शेतकऱ्याची निवड ही पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवली जाते. त्या अनुषंगाने सरकारने अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या अर्जामध्ये वेंडर निवडण्याचे ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे.

जेणेकरून शेतकरी बांधव हा चांगल्या कंपनीचे सोलर हे आपल्या शेतात बसवण्यासाठी निवडू शकतो. शेतकरी बांधवांनी सोलर पंप विक्रेता कंपनी निवडताना त्या कंपनीविषयी माहिती काढून विचार करून वेंडर निवडायचा आहे. त्या पेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे कोणती सोलर कंपनी चांगली सेवा देते हे पण शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे, त्या नुसार त्याची निवड करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलर पंप वेंडरची निवड कशी करावी

या योजनेत शेतकरी बांधव कशा प्रकारे वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करू शकतात, आपण सविस्तर पाहू या.
1. सर्वात आधी सरकारने तयार केलेल्या अधिकृत वेबपोर्टलवर जा - येथे क्लिक करा

2. त्या नंतर वेवपोर्टलवर दिसत असलेल्या "Beneficiary Services" लाभार्थी सेवावर जाऊन त्यामधून "Application Current Status" अर्जाची सद्यस्थितीवर क्लिक करायचे आहे. - येथे क्लिक करा

3. शेतकरी बांधवानो, समोर दिसत असलेल्या "Search by Beneficiary ID" मध्ये तुम्हाला तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तयार झालेला लाभार्थी ID भरून घ्यायचा आहे. आणि "Search" या बटणावर क्लिक करायचे आहे. तुम्ही भरलेला ID बरोबर असेल तर तुमच्या समोर आता तुम्ही भरलेला अर्ज आणि त्याविषयी संपूर्ण माहिती दिसेल.

4. त्याखाली तुम्हाला "Vendor Select" वेंडर निवडा असा पर्याय दिला असेल. आता त्या पर्यायावर क्लिक करून घ्या. आता अर्जाच्या खाली एक पर्याय दिसेल.

5. "Vendor Assignment" समोरील Select Vendor वर क्लिक करून घ्या, आता तुमच्या समोर उपलब्ध असलेल्या वेंडरांची यादी दिसेल. त्यामधून एक वेंडर निवडून घ्या.

6. वेंडर निवडल्यावर खाली "Assign" बटण दिसेल. त्या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक "OTP" पाठवला जाईल.

7. "OTP" भरून तो सबमिट करा. अशा प्रकारे तुमची वेंडर निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


विशेष माहिती

विक्रेता निवड प्रक्रिया झाल्यानंतर महावितरण कार्यालयाकडे संपूर्ण डेटा जातो. ज्यात कोणत्या वेंडरला किती शेतकऱ्यांनी निवडले आहे. त्यानंतर त्या कंपनीकडून जॉईन सर्व्ह करण्यात येतो. सर्वे झाल्यानंतर सर्वे डेटा हा महावितरणकडे जमा केला जातो.

त्यानंतर महावितरण कंपनी परत सर्वे केलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी बनवेल. आणि पुढील प्रक्रियेसाठी अर्ज पाठवला जाईल.


निष्कर्ष (Conclusion)

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत ज्या शेतकरी बांधवांनी पैसे भरले होते. त्यांना आता पुढील प्रक्रियेसाठी म्हणजेच वेंडर निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता शेतकरी त्यांना आवडेल आणि वेळोवेळी चांगली सर्व्हिस देणारी कंपनी निवडून फॉर्म पूर्ण करतील,

जेणेकरून पुढच्या फेरीला त्यांच्या शेतात संबंधित कार्यालयाकडून चौकशी आणि सर्वे करून त्यांच्या शेतात सोलर पॅनल आणि पंप बसवण्यास सुरुवात होईल. आणि शेतकरी बांधवांना दिवसा सौर पंपामुळे विजेचा वापर करण्यास मिळेल.


👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nddb dairy plan maharashtra 19 districts

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत NDDB च्या मदतीने पशुपालकांसाठी गाय-भैंस आणि चारा योजना

Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra heavy rain alert 2025

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: गडचिरोली, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट

Jalgaon kharif crop crisis 2025

जळगावात खरीप पिकांचे संकट: पावसाअभावी शेतकऱ्याने मुगाच्या पिकावर फिरवले रोटाव्हेटर