नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | Namo Shetkari Mahasmman Nidhi Yojna
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasmman Nidhi Yojna) ही महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये सुरू केली. महाराष्ट्रात शेतीवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारे शेतकरी आहेत.
म्हणून यांची आर्थिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने "नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" (Namo Shetkari Mahasmman Nidhi Yojna) सुरू केली.
ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखीच कार्य करते. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत वर्षाला 6,000 रु. तीन समान 2,000 रु. चे चार महिन्यात एकदा असे जमा करण्यात येतात.
या योजने मुळे शेतकऱ्यांना "नमो शेतकरी" आणि "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" (PM Kisan Samman Nidhi Yojana) या दोन्ही योजनांमधून एकूण 12,000 रु. मिळतील वर्षाला शेतकऱ्यांना मिळतात.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी । Namo Shetkari Mahasmman Nidhi 5th installment
नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasmman Nidhi) योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी वाशिम, महाराष्ट्र येथून प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या योजनेचा 4था हफ्ता हा केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात करण्यात आला होता. यात बहुतांश शेतकऱ्यांना योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही अशी तक्रार आहे.
म्हणून या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की या योजनेत शासन पात्रता नियमानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित हफ्ते हे 5 ऑक्टोबर रोजी करणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 4,000 रु सोबत राहिलेल्या हफ्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाच्या लाभार्थी स्टेटस कसा पाहावा । How to Check Beneficiary Status of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
पायरी 1: स्टेटस पाहण्यासाठी नमो शेतकरी योजनाच्या सरकारने तयार केलेल्या वेबसाईटवर जा येथे क्लिक करा
पायरी 2: होम पेजवर "Beneficiary Status" बटनावर क्लिक करा. तुमच्या समोर नवीन पेज उघडेल.
पायरी 3: तुम्ही तुमचा स्टेटस हा रेजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबरने चेक करू शकता.
पायरी 4: नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा दिसेल, तो भरून द्या.
पायरी 5: "Get Mobile OTP" या बटनावर क्लिक करा.
पायरी 6: आता तुम्हाला तुमच्या ई-केवायसी करताना वापर केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
पायरी 7: मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून "Get Data" वर क्लिक करा.
पायरी 8: तुम्ही आता NSMNY लाभार्थी तपशील आणि NSMNY निधी वितरित तपशील पाहू शकता.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?
नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasmman Nidhi) योजनेचा लाभ घेण्यासाठी, खालील पात्रता असणे अत्यंत आवश्यक आहे.
अनुक्रमांक | योजनेसाठी पात्रता |
---|---|
1 | तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक आहे. |
2 | तुमच्याकडे लागवडीयोग्य शेतजमीन असणे आवश्यक आहे. |
3 | तुमची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी आवश्यक आहे. |
4 | तुमची ई-केवायसी आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. |
निष्कर्ष (Conclusion)
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये आर्थिक मदत केली जाते. त्याच प्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमार्फत सुद्धा 6,000 रुपये आर्थिक मदत मिळते. या दोन्ही योजनांचे पैसे मिळून 12,000 रुपये वार्षिक दिले जातात.
5 ऑक्टोबर 2024 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5व्या हप्त्याचे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 18व्या हप्त्याचे वितरण महाराष्ट्राच्या वाशिम येथून देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. योजनेत होणारे बदल आणि प्रलंबित हप्त्याचे वितरण होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे.
योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: शेतकरी बंधूंनो या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकारी पोर्टल नाही. या योजनेचा लाभ हा फक्त PM किसान सम्मान निधी योजनेत पात्र शेतकरी घेऊ शकतात.
प्रश्न 2: नमो शेतकरी योजनेत आतापर्यंत किती हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत?
उत्तर: योजनेमार्फत आतापर्यंत 5 हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
प्रश्न 3: नमो शेतकरी योजना कधी सुरू केली गेली आहे?
उत्तर: ही योजना सन 2023 - 24 मध्ये चालू करण्यात आली आहे, आणि या योजनेतून 5 हफ्ते शेतकऱ्यांना दिले गेले आहेत.
प्रश्न 4: नमो शेतकरी योजना चालू करण्याचं उद्दिष्ट?
उत्तर: गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधारासाठी हा निधी दिला जातो.