कांद्याचे आजचे बाजारभाव | Today’s market price of onion
कांदा हा प्रत्येक घरात, हॉटेल, कंपनी या सारख्या विविध भागांमध्ये कांद्याची मोठी मागणी आहे. म्हणून कांद्याच्या बाजारभावात बदल पाहण्यास मिळतात. कांदा हा विदेशात सुद्धा निर्यात आणि आयात केला जातो, त्यामुळे देशातील बाजारपेठांवर याचा परिणाम पाहण्यास मिळतो.
मागील काही दिवसांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की कांद्याच्या भावात उतार-चढाव होत आहे. बाजारभावानुसार कांद्याचे भाव २५ ते ४५ रुपये किलोपर्यंत असू शकतात, पण तुमच्या नजीकच्या बाजारभावानुसार त्यांचे दर हे वेगळे असू शकतात. खालील तक्त्यात काही शहरांचे आजचे बाजारभाव दिले आहेत.
बाजार समिती शहराचे नाव | कांद्याची जात | परिमाण | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | कमाल दर (रु.) | सरासरी दर (रु.) |
---|---|---|---|---|---|---|
पुणे | लोकल | क्विंटल | 13647 | 1200 | 2500 | 1850 |
छत्रपती संभाजीनगर | — | क्विंटल | 3512 | 400 | 2200 | 1300 |
कोल्हापूर | — | क्विंटल | 3309 | 700 | 2800 | 1500 |
नागपूर | लाल | क्विंटल | 1000 | 1400 | 2400 | 2150 |
नागपूर | पांढरा | क्विंटल | 680 | 1500 | 2500 | 2250 |
सातारा | — | क्विंटल | 358 | 1000 | 2800 | 1900 |
धुळे | लाल | क्विंटल | 1093 | 300 | 2200 | 2000 |
गव्हाचे आजचे बाजारभाव | Today’s Market Price of Wheat
भारतात गहू सर्वात जास्त प्रमाणात पेरले जातात आणि मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे भारतात गव्हाचे बाजारभाव हे काही प्रमाणात स्थिर असतात. गव्हाचे दर हे देशात आणि राज्यात दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असतात. देशात गव्हाचे किती उत्पादन झाले आहे आणि गव्हाचे आयात किती प्रमाणात केले जाणार आहे.
सध्या देशातील विविध भागातील गव्हाचे दर हे 2300 रुपये ते 5300 रुपये पर्यंत प्रति क्विंटल विकले जात आहेत. गहू साठवण करून ठेवू शकतात, त्यामुळे बाजारात याचे भाव कमी-जास्त होताना पाहू शकतो. आजचे बाजारभाव खालील तक्त्यात दिले आहेत.
बाजार समिती शहराचे नाव | गव्हाची जात | परिमाण | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | कमाल दर (रु.) | सरासरी दर (रु.) |
---|---|---|---|---|---|---|
मुंबई | लोकल | क्विंटल | 4405 | 3000 | 6000 | 4500 |
अकोला | लोकल | क्विंटल | 41 | 2300 | 2810 | 2585 |
अमरावती | लोकल | क्विंटल | 16 | 2850 | 3050 | 2950 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 79 | 2900 | 3186 | 3115 |
नागपूर | शरबती | क्विंटल | 400 | 3000 | 3500 | 3375 |
धुळे | लोकल | क्विंटल | 11 | 2424 | 3370 | 3100 |
पुणे | शरबती | क्विंटल | 405 | 4800 | 5800 | 5300 |
पाथरी | लोकल | क्विंटल | 2 | 2100 | 2300 | 2300 |
हरभरा आजचे बाजारभाव | today’s market price of Gram
हरभरा हा देखील देशातील सर्वात जास्त पेरला जाणारा कडधान्यातला एक आहे. हरभऱ्याचे भाव हे देशात मागणी आणि पुरवठ्यावर ठरवले जातात. स्थानिक बाजारपेठेत आज हरभऱ्याचा भाव हा 4400 ते 8000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.
राज्यातील काही बाजारपेठेत हरभऱ्याचे भाव हे वाढताना पाहिले गेले तर अकोला आणि धुळे बाजारपेठेत भाव कमी होताना पाहिला गेला. बाकी तुम्ही खालील तक्त्यात सविस्तर भाव पाहू शकता.
बाजार समिती शहराचे नाव | हरभऱ्याची जात | परिमाण | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | कमाल दर (रु.) | सरासरी दर (रु.) |
---|---|---|---|---|---|---|
मुंबई | लोकल | क्विंटल | 673 | 7000 | 8800 | 8200 |
अकोला | लोकल | क्विंटल | 189 | 3800 | 6205 | 6190 |
अमरावती | लोकल | क्विंटल | 240 | 5800 | 6275 | 6037 |
धुळे | लाल | क्विंटल | 5 | 3910 | 5310 | 4405 |
पुणे | — | क्विंटल | 35 | 7300 | 8400 | 7850 |
पाथरी | लोकल | क्विंटल | 5 | 5300 | 5300 | 5300 |
तुरीचे आजचे बाजारभाव | today’s market price of Tur
शेतकरी मित्रांनो, आज तुरीचे भाव पाथरी आणि नागपूर बाजारपेठेत वाढताना पाहिले गेले. बाकी अकोला, अमरावती, आणि धुळे बाजारपेठेत तुरीचे भाव कमी होताना पहिले गेले. आज राज्यात तुरीची आवक सुद्धा कमी-जास्त पाहायला मिळाली.
मार्केटमध्ये लाल तुरीची आवक जास्त पाहण्यात आली, तर काळ्या आणि पांढऱ्या तुरीची आवक कमी पहिली गेली. तरी राज्यातील काही प्रमुख बाजारपेठेतील तुरीचे किमान आणि कमाल तुरीचे भाव खालील तक्त्यात.
बाजार समिती शहराचे नाव | तुरीची जात | परिमाण | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | कमाल दर (रु.) | सरासरी दर (रु.) |
---|---|---|---|---|---|---|
अकोला | लाल | क्विंटल | 2609 | 5500 | 7500 | 6950 |
अमरावती | लाल | क्विंटल | 3486 | 6750 | 7522 | 7136 |
नागपूर | लाल | क्विंटल | 1194 | 7000 | 7490 | 7368 |
धुळे | लाल | क्विंटल | 68 | 5300 | 7055 | 6605 |
पाथरी | लाल | क्विंटल | 23 | 6500 | 6951 | 6800 |
सोयाबीनचे आजचे बाजारभाव | Today’s market price of soybeans
सोयाबीन मार्केट शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचे आहे. राज्यातील खरीप हंगामात घेण्यात येणारे पीक असूनसुद्धा अजून सोयाबीन पिकाला पाहिजे तसा भाव मिळत नाही आहे.
केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकीत 6000 रुपये हमीभावाची घोषणा केली आणि ती फक्त घोषणा राहिली. शेतकरी बांधवांना सोयाबीनला 3200 ते 3500 रुपये इतकाच बाजार भाव मिळताना दिसतोय. तुम्ही राज्यातील इतर जिल्ह्यातील सोयाबीन भावाची माहिती खाली पाहू शकता.
बाजार समिती शहराचे नाव | सोयाबीनची जात | परिमाण | आवक (क्विंटल) | किमान दर (रु.) | कमाल दर (रु.) | सरासरी दर (रु.) |
---|---|---|---|---|---|---|
अकोला | पिवळा | क्विंटल | 2726 | 2500 | 4150 | 3995 |
अमरावती | लोकल | क्विंटल | 8421 | 3950 | 4165 | 4057 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 750 | 3700 | 4100 | 4000 |
धुळे | हायब्रीड | क्विंटल | 22 | 2800 | 4000 | 3785 |
पाथरी | पिवळा | क्विंटल | 31 | 3600 | 3800 | 3700 |
निष्कर्ष
कांदा, गहू, हरभरा, तूर आणि सोयाबीन हे भारतात आणि महाराष्ट्रातील विविध भागातील महत्वाचे पीक मानले जाते. आणि त्यांचे बाजारभाव हे शेतकरी बांधवांचे आर्थिक चक्र ठरवत असते. आपण पाहतो की देशातील आणि राज्यातील बाजारभाव हे रोज बदलत असतात.
कुठल्याही बाजारपेठेत सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे माल खरेदी केला जात नाही. आणि या मधून होणारे नुकसान हे फक्त शेतकरी बांधवांना सोसावे लागते. तरी आपण कांदा, गहू, हरभरा, तूर आणि सोयाबीन यांचे बाजारभाव पहिले. मित्रांनो,
उद्या पासून आपण रोज राज्यातील मुख्य शहरांचे बाजारभाव जाणून घेत जाऊ जेणेकरून तुम्हाला तुमच्या नजीकच्या बाजारपेठेतील मालाचे भाव आणि आवक किती आहे याची तंतोतंत माहिती असेल. आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही ठरवू शकता की तुमचा माल कोणत्या बाजारपेठेत विकायचा आहे.