नमो शेतकरी योजना: का आहे खास?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana) ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidh) योजनेप्रमाणे, या योजनेतूनही शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात, जे तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) थेट त्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जातात.
पीएम किसान योजने च्या ६,००० रुपयांबरोबरच, नमो शेतकरी योजनेतून मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रुपये आर्थिक मदत पुरवते. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, आणि इतर शेतीच्या गरजांसाठी आर्थिक पाठबळ मिळते.
आत्तापर्यंत या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता सातव्या हप्त्यासाठी १९३२.७२ कोटी रुपये मंजूर झाले असून, याचा लाभ सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे जमा होईल, ज्यामुळे पारदर्शकता आणि गैरव्यवहार टाळले जाईल.
सातवा हप्ता: कधी आणि कसा मिळणार?
राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, या योजनेसाठी १९३२.७२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा सातवा हप्ता एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे.
मागील अनुभवानुसार, पीएम किसान योजने (PM Kisan Yojana) चा हप्ता जमा झाल्यानंतर ९ ते १० दिवसांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. यावेळी पीएम किसान योजने चा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जमा झाला होता. त्यानुसार, सातवा हप्ता सप्टेंबर २०२५ च्या मध्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजने च्या लाभार्थ्यांच्या यादीच्या आधारावर पात्र शेतकऱ्यांची निवड केली आहे. ही यादी केंद्रीय कृषी विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा निधी वितरित करते. यामुळे पात्र शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य रीतीने लाभ मिळेल, याची खातरजमा केली जाते.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:
पात्रता :
-
शेतकरी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
-
पीएम किसान सन्मान निधी योजने त नोंदणीकृत असावा.
-
शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.
-
आधार-लिंक केलेलं बँक खातं असावं.
आवश्यक कागदपत्रे :
-
आधार कार्ड (Aadhar Card)
-
मतदार ओळखपत्र (Voter ID card)
-
शेतीच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे
-
बँक खात्याचा तपशील (Bank account details)
-
पीएम किसान योजने चा नोंदणी क्रमांक
-
महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र अर्जाची गरज नाही. पीएम किसान योजने त नोंदणीकृत शेतकरी आपोआप नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात. तथापि, ई-केवायसी (e-KYC) आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे.
लाभार्थी यादी आणि स्टेटस कसं तपासायचं?
शेतकरी आपल्या नमो शेतकरी योजनेच्या (Namo Shetkari Yojana) लाभार्थी स्थितीची खात्री nsmny.mahait.org या अधिकृत वेबसाइटवर करू शकतात. खालील स्टेप्स फॉलो करा:
-
अधिकृत वेबसाइटला भेट द्या : nsmny.mahait.org वर जा.
-
लॉगिन किंवा बेनिफिशियरी स्टेटस पर्याय निवडा : होमपेजवर “Beneficiary Status” किंवा “Login” पर्यायावर क्लिक करा.
-
तपशील भरा : तुमचा मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
-
OTP सत्यापन : OTP टाकून सबमिट करा.
-
स्थिती तपासा : तुमच्या स्क्रीनवर हप्त्याची आणि लाभार्थी यादीची माहिती दिसेल.
हप्त्याची रक्कम आणि यादीतील नाव तपासण्यासाठी नियमितपणे वेबसाइट तपासत राहा. यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, याची माहिती मिळेल.
शासनाची जबाबदारी आणि पारदर्शकता
या योजनेच्या निधीचे वितरण कृषी आयुक्तां वर सोपवण्यात आले आहे. त्यांना खात्री करावी लागेल की, १९३२.७२ कोटी रुपये योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि यामध्ये कोणताही गैरव्यवहार होणार नाही. याशिवाय, प्रत्येक हप्त्याच्या वितरणानंतर बँक खात्यात शिल्लक राहिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज सरकारच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारीही आयुक्तांवर आहे. हा शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या सहमतीने घेण्यात आला आहे, ज्यामुळे योजनेची विश्वासार्हता वाढते.
शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे ही योजना?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana) शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करते. शेती हा महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांचा आधार आहे, पण उत्पन्नातील अनिश्चितता आणि वाढते खते, बियाणे यांचे खर्च यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात.
ही योजना शेतकऱ्यांना स्थिर आर्थिक आधार देते, ज्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत वाढ आणि टिकाऊ शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळते. सध्या १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे, आणि सातव्या हप्त्यामुळे आणखी ९६ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping Click here
