फार्मर युनिक आयडी विषयी । शेतकरी ओळखपत्रा विषयी । About Farmer Unique ID
देशातील लाखो करोडो लोक शेती करतात आणि या शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकार (Central Govt) आणि राज्य सरकार (State Govt) नवनवीन उपक्रम राबवत असतात. मग यात अनुदान, दुष्काळ निधी, पीक कर्ज, पीकविमा (Pik Vima) यासारख्या अनेक उपक्रम सरकार राबवत असते आणि यांचा लाभ हा देशातील शेतकरी बांधवांना मिळत असतो.
पण यात हा लाभ शेतकरी बांधवांसोबत जे शेतकरी पात्र नसतील त्यांना सुद्धा दिला जातो. मग यात अपात्र शेतकरी कोण असा प्रश्न नक्कीच पडतो. अपात्र शेतकरी जे असतात त्यांना सरकारी नोकरी किंवा निमसरकारी नोकरी असते.
ते एखाद्या मोठ्या जागेवर असतात. किंवा सरकारला टॅक्स देणारे अशा अनेक प्रकारचे नागरिक हे अपात्र असतात, पण त्यांना सुद्धा कधी कधी योजनांचा लाभ मिळतो. आणि खरंच ज्या शेतकरी बांधवांना याची गरज असते,
असे शेतकरी मित्रांना लाभ मिळत नाही. या उध्दभवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी सरकारने शेतकरी युनिक आयडी (Farmer Unique ID) ही संकल्पना देशात लागू केली. याने देशातील गरीब आणि गरजू शेतकरी बांधवांना लाभ मिळेल हाच सरकारचा हेतू आहे.
शेतकरी युनिक आयडी (Farmer Unique ID) हा फक्त ज्या शेतकरी बांधवांच्या नावे जमीन असेल अशाच शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे.
फार्मर युनिक आयडी नोंदणी ऑनलाईन स्टेटस | Farmer Unique ID Registration Online Status
शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती आणि तुमचा अर्ज कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेण्यासाठी सरकारने शेतकरी बांधवांसाठी ॲग्रिस्टॅक (Agristack) पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती कशी पहावी त्याविषयी सविस्तर माहिती पाहू.
- केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी तयार केलेल्या ॲग्रिस्टॅक (Agristack) अधिकृत वेबसाइटला भेट द्या. – https://mhfr.agristack.gov.in/
- त्यानंतर सर्वात वर दिलेल्या मेनूमधून “शेतकरी नोंदणी स्थिती” (Check Enrolment Status) पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यात तुम्हाला तुमचा “शेतकरी ओळखपत्र क्रमांक” किंवा “आधार क्रमांक” टाकून घ्यायचा आहे.
- नंतर “चेक” (Check) बटणावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीची स्थिती आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यात तुमची माहिती आणि तुमच्या अर्जाची स्थिती (स्टेटस – Status) दिसेल.
शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची चालू स्थिती तपासू शकता. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अर्जाची स्थिती (Status) काय आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती खाली पाहू.
फार्मर युनिक आयडी स्टेटस विषयी | About Farmer Unique ID Status
फार्मर युनिक आयडीमध्ये स्टेटस (Status) चार प्रकारचे आहेत, त्याविषयी माहिती पाहू.
प्रलंबित (Pending)
शेतकरी मित्रांनो, तुमच्या फॉर्ममध्ये “Pending” असे स्टेटस (Status) दिसत असेल तर तुमचा फॉर्म हा पुनरावलोकन प्रक्रियेत आहे. ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर तुम्हाला खालील Under Verification स्टेटस दाखवले जातील. तो पर्यंत प्रतीक्षा करा.
सत्यापन सुरू (Under Verification)
शेतकरी मित्रांनो, तुमच्या फॉर्ममध्ये “Under Verification” असे स्टेटस (Status) दिसत असेल तर तुमचा फॉर्म हा संबंधित कधिकाऱ्यांकडून तपासला जात आहे. एकदा तुमचा फॉर्म पूर्णपणे सत्यापन झाल्यानंतर तुम्हाला खालील स्टेटस दाखवले जातील, तो पर्यंत प्रतीक्षा करा.
मंजूर (Approved)
तुमच्या फॉर्ममध्ये “Approved” असे स्टेटस (Status) दिसत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, आणि आता तुमच्या फॉर्मवर Approved स्टेटस दिसेल.
नाकारले (Rejected)
तुमच्या अर्जामध्ये “Rejected” असे स्टेटस दिसत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला नाही, म्हणजे नाकारला गेला आहे. CSC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज नाकारण्याचे कारण विचारू शकता आणि त्या प्रमाणे पुढील प्रक्रिया करू शकता.
शेतकरी ओळखपत्रा अंतर्गत मिळणारे फायदे | Benefits Farmer Unique ID
शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या पुढे शेती विषयी कोणत्याही योजना किंवा अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळ हे कार्ड पाहिजे. तुम्ही शेतकरी ओळखपत्राच्या आधारे कोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकता.
- या पुढे तुमच्या जवळ फार्मर युनिक आयडी असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल.
- फार्मर युनिक आयडीमुळे तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल.
- शेतकरी मित्रांना युनिक आयडीच्या मदतीने KCC कर्ज मिळणार आहे. कर्ज काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही.
- फार्मर आयडीमुळे तुम्हाला तुमच्या जमिनीच्या मातीची आरोग्य स्थितीबद्दल अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.
- शेतकरी ओळखपत्रामुळे तुम्हाला सहजरीत्या पीक कर्ज (Crop Loan) मिळण्यास मदत मिळेल.
- युनिक आयडीच्या मदतीने पिक विमा किंवा तुमच्या नजीकच्या बाजारपेठेतील हमीभाव मिळवू शकता.
- त्यासोबत तुमच्या शेतीचा माल हा हमीभावानुसार विकू शकता.
- केंद्र सरकारसोबत राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यास मदत.
शेतकरी ओळखपत्रसाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for Farmer ID
तुमचा युनिक आयडी मिळवण्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. खालील कागदपत्र तुम्ही नजीकच्या CSC केंद्रावर घेऊन जाऊन शकता.
- शेतकऱ्याचे अपडेटेड आधार कार्ड (Adhar Card).
- शेतीचा ७/१२ उतारा, ८अ उतारा (सर्व्हे नंबर किंवा गट क्रमांक)
- मोबाईल नंबर (तुमचा आधार कार्ड क्रमांक हा मोबाईल क्रमांकाशी लिंक असावा.)
फार्मर युनिक आयडी पात्रता | Farmer Unique ID Eligibility
शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी जास्त नियम नाहीत.
- अर्जदार शेतकरी हा भारतीय नागरिक (Indian citizen) पाहिजे.
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावे शेती पाहिजे.
- सातबारा उतारा हा शेतकऱ्याच्या नावाने पाहिजे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे आठ अ गाव नमुना पाहिजे.
शेतकरी ओळखपत्रसाठी ऑनलाईन अर्ज | Farmer Unique ID Online Application
शेतकरी बांधवांनो, फार्मर युनिक आयडी (Farmer Unique ID) बनवण्यासाठी तुमच्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात (CSC Center) जाऊन अर्ज करू शकता. राज्यात अजून स्वता शेतकरी अर्ज करू शकत नाही. ही सुविधा इतर राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता आपण पाहू रेजिस्ट्रेशन कशा प्रकारे करू शकतो.
CSC सेंटरवर लागणारी आवश्यक माहिती आणि अर्ज प्रक्रिया
- आधारकार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- काही स्टेप्समध्ये हा फार्म भरला जाईल, त्यात मुख्य म्हणजे आधार प्रमाणीकरण (Aadhar Authentication), संपर्क तपशील (Contact Details), शेतकरी तपशील (Farmer Details), शेतकरी तपशील – विस्तारित/सानुकूल फील्ड (Farmer Details – Extended/Custom Fields), निवासी तपशील (Residential Details), जमीनधारक तपशील (Land Holder Details), व्यवसाय तपशील (Occupation Details).
- ही सर्व माहिती तुम्हाला फार्मर आयडी बनवण्यासाठी लागेल.
निष्कर्ष (Conclusion)
आज आपण पाहिले की केंद्र सरकारच्या शेतकरी बांधवांसाठी सुरु करण्यात आलेल्या ॲग्रिस्टॅक शेतकरी नोंदणी आणि शेतकरी ओळखपत्र उपक्रमाबद्दल, फार्मर युनिक आयडीमुळे खरा शेतकरी ओळखण्यास सरकारला मदत होईल आणि त्याच पात्र शेतकरीला योग्य लाभ मिळण्यास फायदा मिळेल.
देशातील ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर युनिक आयडी असेल अशा शेतकरी बांधवांना अनुदान, पीक कर्ज, पीक विमा, आणि अन्य राज्यातील आणि केंद्रातील कृषी योजनांचा लाभ मिळण्यास मदत मिळेल. त्यासोबत आपण पाहिले ओळखपत्र बनवण्यासाठीची पात्रता, लागणारे कागदपत्र, आणि तुमच्या अर्जाची स्थिती कशा प्रकारे तपासू शकता ते.
तुम्ही तुमच्या नजीकच्या CSC केंद्रात जाऊन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करू शकता आणि तुम्हाला कोणती महत्वाची माहिती लागेल त्याविषयी आपण पाहिले.