Home  |  नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तूर पिकांचे संगोपन आणि विशेष काळजी

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तूर पिकांचे संगोपन आणि विशेष काळजी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तूर पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे

1. तूर पीक हे कमी पाण्यातही घेऊ शकता. तुरीसाठी जास्त पाण्याची गरज नसते. कमी पाण्यातही तूर चांगल्या प्रमाणात वाढते, पण जेव्हा तूर झाडाला फुलोरा आणि शेंगा लागण्याचा वेळ असते, तेव्हा तूर पिकाला पाण्याची आवश्यकता असते. तेव्हा तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही पिकासाठी पाणी भरल्यास उत्तम असेल.

2. तुमच्या शेतातील मातीची आर्द्रता ही तूर पिकाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची जमीन तुम्ही थोडी ओलसर ठेवू शकता.

3. नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी असल्याने तुम्ही 12-15 दिवसांच्या अंतराने जमीन हलकी ओलसर ठेवण्याच्या पद्धतीला योग्य मानले जाते.

4. डिसेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यापेक्षा जास्त थंडी जाणवते, म्हणून या दिवसात पिकाला पाणी घालणे टाळावे. फक्त जमीन थोडी हलकी आवश्यक असेल तेवढी ओलसर करावी.

5. जर शेतकरी बांधवांनी आधुनिक शेती करण्याच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर पिकाच्या पाणी नियोजनासाठी ड्रिप सिंचन योग्य पर्याय आहे. जितके पाणी झाडाला लागणार आहे, तितकेच पाणी थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहचते. ड्रिप सिंचन केल्याने पाण्याची बचत होते आणि शेतात तण नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

6. खरं पाहिलं गेलं तर पिकाला पाणी देण्याच्या अगोदर शेताला मातीच्या प्रकारावर, तिथल्या हवामानावर आणि पिकाची वाढ, आणि त्याला लागणाऱ्या फुलोऱ्यावर निर्भर करत, तरी शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाण्याच्या नियोजनाविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

खत व्यवस्थापन (Fertilizer Management) कसे करावे

तूर पिक जमिनीतून लागणारे पोषणतत्त्व घेते. पण शेतात वर्षानुवर्ष सतत समान पीक घेत असल्याने जमिनीची झीज होते. आणि जमिनीतील पोषणतत्त्व नष्ट होत जातात. मग त्या तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी शेतात खात्याचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे. तूरसाठी विशेष नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम खत घटक देणे आवश्यक आहे. ते देण्याची सोपी पद्धत आपण पाहू.

1. नायट्रोजन :- नायट्रोजनयुक्त खते तूर पिकासाठी महत्वाचे खनिज मानले जातात. नायट्रोजनयुक्त प्रकारची खते तुम्ही शेतात तूर लागवडीच्या वेळी किंवा त्यांच्या वाढीच्या पहिल्या टप्यात दिली तर उत्तम. त्यामुळे तूर पिकाला पोषक तत्व मिळतील आणि तुरीची वाढ ही योग्य रित्या होईल.

2. फॉस्फरस :- फॉस्फरसयुक्त खते मुळाच्या वाढीसाठी पोषक मानले जातात. म्हणून फॉस्फरसयुक्त प्रकारची खते ही शेतकरी बांधव पेरणीच्या वेळी वापरू शकतात.

3. पोटॅशियम :- पोटॅशियमयुक्त खते पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे पोटॅशियमयुक्त खते फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस दिल्यास त्याचा फायदा येणाऱ्या उत्पन्नात नक्कीच पाहायला मिळेल.

4. त्यासोबत तुम्ही पेरणीपूर्वी 10 किलो युरिया प्रति एकर जमिनीत टाकू शकता. त्या सोबत डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) 50 किलो प्रति एकर वापरू शकता. त्यानंतर तुम्ही तूर पिकाची लागवड करू शकता.

5. डिसेंबर महिन्यात तुम्ही सुपर फॉस्फेट आणि जिप्सम खते यांचा पुरवठा केला तर पिकांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरते.

6. शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापन टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून या विषयी सरकार अधिकृत खत बियाणे दुकानातून खात घेणे आणि जवळच्या कृषी सल्लागाराकडून घेतले तर अति उत्तम ठरेल.

तूर पिकांचे तण नियंत्रण (Weed Management) कसे करावे

तूर पिकात तण असेल तर त्याच्यावर लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढावा, कारण तणामुळे तूर पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो.

1. तण नियंत्रण करण्यासाठी तुम्ही शेतात कोळपणी करून घ्यावी, जेणेकरून शेतात तणावर नियंत्रण मिळवू शकतो आणि तूर पिकाला उत्तम रित्या पोषक घटक मिळतील.

2. तण नियंत्रणात येत नसेल तर कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन तुम्ही शेतात Pendimethalin किंवा Imazethapyr योग्य प्रमाणात फवारणी करू शकता, जेणेकरून शेतातील तण नियंत्रणात येईल.

तूर पिकांचे कीड नियंत्रण कसे करावे

तूर झाडाला फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात खूप प्रकारच्या कीड, मावा आणि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. कृषी विभागाशी संपर्क करून योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यांनी शिफारस केलेली कीटकनाशकांची फवारणी ही शेतात करून घेणे जेणेकरून योग्य व्यवस्थापन केल्यास नुकसान टाळता येते.

तूर पिकावर पाहिले जाणारे कीड घाटे अळी, अफिड्स, पाने खाणारी अळी (Pod borer), फुलकिडे (Flower thrips), मावा (Aphids), फ्युजेरियम उशीरा कोमेजणे (Fusarium Wilt), पानांवर डाग पडणे (Leaf Spot) या सारखे रोग आणि कीड तूर पिकावर पाहण्यात येते. चला तर सविस्तर पाहू या यांच्या वर काय उपाययोजना करू शकतो आणि आपल्या तूर पिकाला वाचवून भरगोस उत्पन्न घेऊ शकतो.

1. घाटे अळी आणि अफिड्स :- हे दोन्ही तूर पिकासाठी घातक आहे. अफिड्स ही एक लहान अळी असते, ती पानांचा रस शोषून घेते, तर घाटे अळी ही तूर पिकासाठी खूप घातक आहे. या रोगावर अधिकाऱ्यांनी शिफारस केलेली कीटकनाशके वापरून फवारणी करून घेणे.

2. पाने खाणारी अळी (Pod borer) :- जर तूर पिकाची पाने कतरलेली दिसत असतील तर समजून घ्या झाडावर पाने खाणारी अळी असेल, म्हणून शेतकऱ्यांनी Spinosad 45% SC @ 0.5 ml प्रति लिटर सांगितल्याप्रमाणे पाण्यात मिश्र करून झाडावर फवारणी करावी.

3. फुलकिडे (Flower thrips) :- शेतकऱ्यांनी Imidacloprid 17.8% SL @ 0.5 ml प्रति लिटर सांगितल्याप्रमाणे पाण्यात मिश्र करून झाडावर फवारणी करावी.

4. पानांवर डाग पडणे (Leaf Spot) :- हा रोग तूर पिकावर दिसत असेल तर कृषी अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांनी Carbendazim 50% WP @ 1 ग्रॅम प्रति लिटर सांगितल्याप्रमाणे पाण्यात मिश्र करून झाडावर फवारणी करावी.

5. फ्युजेरियम उशीरा कोमेजणे (Fusarium Wilt) :- हा रोज जर जाणवू लागला तर शेतकऱ्यांनी Trichoderma viride 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यांना प्रक्रिया करून घ्यावी.

6. मावा (Aphids) :- हा रोग तूर पिकावर दिसत असेल तर शेतकऱ्यांनी Dimethoate 30% EC @ 2 ml प्रति लिटर सांगितल्याप्रमाणे पाण्यात मिश्र करून झाडावर फवारणी करावी. जेणेकरून मावा रोग कमी होईल आणि तुमच्या पिकाला जास्त हानी होणार नाही.

तूर पिकांची काळजी

1. प्रत्येक आठवड्याला पिकाचे निरीक्षण करा आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन फवारणी, खतांचा वापर करत राहा. तुमच्या जवळ जैविक खत उपलब्ध असेल तर त्या खताचा पण वापर करा; त्याने तुमच्या मातीची सुपिकता टिकून राहील.

2. तूर पिकाला खूप वाढ असते, म्हणून तिची वेळोवेळी छाटणी करून नवीन शाखांना फुटण्यास वाव मिळेल. झाड जितके पसरेल, तितकाच शेंगांचा बहार जास्त लागेल.

3. तुमच्या जवळ पाण्याची व्यवस्था असेल तर शेंगा भरण्याच्या टप्प्यावर तुम्ही एकदा तूर पिकाला पाणी दिल्याने शेंगा योग्य प्रकारे भरली जातात. याचा फायदा तुम्हाला तूर उत्पन्नावर सुद्धा दिसून येईल.

महत्त्वाची सूचना

कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरण्यापूर्वी तुमच्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच पुढील पाऊल उचला.

निष्कर्ष (Conclusion)

तूर पीक हे उत्पन्नासाठी चांगले मानले जाते. जास्त दिवसाचे पीक असल्याने शेतकरी तूर लावण्यास कंटाळा करतात. पण योग्य नियोजन केले असता खूप प्रमाणात शेतकरी उत्पन्न कमावू शकतात. वरील लेख हा खूप सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याचा उपयोग शेतकरी बांधवांना मिळेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Pradhan mantri kisan samman nidhi yojana

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी मध्ये मोठे बदल ही सर्व कागदपत्रे लागणार

Magel tyala solar pump yojana maharashtra

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु

Namo shetkari mahasmman nidhi yojna th installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी

How to check status of pm kisan payment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळेल की नाही हे कसे तपासायचे संपूर्ण माहिती

Pradhan mantri kisan fpo yojana

PM Kisan FPO Yojana: सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे

Plastic mulching paper subsidy

प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

Shetkaryanchya kalyanasathi rabavnyat yenarya yojana

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना

Mangel tyala solar pump yojana payment sms

मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

Special arrangements for animals in winter

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

Rabbi hangam digital crop survey

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

Magel tyala solar krushi pump vendor selection option

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

How to do rabi season e pick inspection

रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती