शेतकऱ्यांनी घेतला ‘मागेल त्याला सोलर पंप’ योजनेचा लाभ
शेतात सोलर बसवण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या कार्य करत आहेत. ‘मागेल त्याला सोलर पंप’ योजनेअंतर्गत शेतकरी ऑनलाईन पद्धतीने कंपन्या (Vendor List) निवडून आपल्या शेतात सोलर बसवून घेत आहेत. खूप साऱ्या सोलर कंपन्या नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होत आहे.
एक उल्लेखनीय तंत्रज्ञानाचा शोध त्यांनी लावलाय, मोबाईल ॲपद्वारे शेतातील सोलर पंप चालू-बंद करणे. सध्या सोलर बंद झाल्यावर शेतकऱ्यांना शेतात जाऊन पुन्हा चालू करून घरी यावे लागायचे. आता या अँपच्या मदतीने शेतकरी घरी बसून सुद्धा सोलर चालवणार आहेत, म्हणजे मोबाईलवरून सोलर पंप चालू-बंद करणार आहेत.
मोबाईल अँपद्वारे सोलर पंप ऑपरेट
मोबाईलच्या माध्यमातून सोलर पंप ऑपरेट करण्यासाठी शेतकरी बांधवांना एक मोबाईल अॅपचा वापर करावा लागणार आहे. शेतकरी या अॅपच्या मदतीने सोलर पंप ऑपरेट करण्यापासून ते अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
त्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील, त्यानंतर शेतकरी या अॅपचा वापर आपल्या मोबाईलवरून करू शकतात. त्या कोणत्या ते खाली सविस्तर पाहू.
◼️ शेतकरी बांधवांनी ज्या कंपनीचे सोलर शेतात बसवले असेल, त्या कंपनीने उपलब्ध करून दिलेले मोबाईल ॲप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. तुम्ही सोलर पंपसाठी अर्ज करताना वापरलेला क्रमांक भरायचा आहे.
◼️ आता मोबाईल क्रमांक भरल्यानंतर पुढे पंप विषयी आणि इतर माहिती भरून घ्यायची आहे. जसे, पंपचा क्रमांक किंवा युनिक आयडी भरून घ्यायचा आहे.
◼️ अँपमध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर अँप सेटअप प्रक्रिया पूर्ण होईल. अँपमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही सोलर पंप चालू-बंद करण्याचा पर्याय निवडू शकता आणि शेतातील पंप ऑपरेट करू शकता.
या अँपमध्ये तुम्हाला इतर पर्याय सुद्धा दिसतील, जसे पंपच्या कार्यक्षमतेची माहिती, पाण्याचा प्रवाह कसा आहे, आणि शेतातील ड्रिप इरिगेशन नियंत्रण यासारखे पर्याय असणार आहेत. यांच्या मदतीने तुम्ही घरी बसून शेतातील कामे करू शकता.
