Home  |  PM Kisan : प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेविषयी अपडेट आणि 19वा हफ्ता

PM Kisan : प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेविषयी अपडेट आणि 19वा हफ्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएम किसान सम्मान निधि योजनेविषयी थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ही देशातील अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी बांधवांना अर्थसहाय्य म्हणून चालू करण्यात आलेली कल्याणकारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने 2018 साली चालू केली.

या योजनेअंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये मात्र देण्यात येतात. आणि हे 6,000 रुपये तीन टप्यात प्रत्येकी 2,000 रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्फत जमा करण्यात येतात.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हफ्ते जमा करण्यात आले आहेत आणि पुढील हफ्ता ही लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. किसान सम्मान योजनेत वेळोवेळी सरकारमार्फत बदल करण्यात येतात.

पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचा तपशील

योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
19व्या हफ्ता जमा होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2025
हप्त्याची एकूण रक्कम 2,000 /- रुपये मात्र

पीएम किसानचा 19 वा हप्ता कधी येणार?

देशातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील लाखो शेतकऱ्यांना 19 व्या हफ्त्याची प्रतीक्षा होती, ती आता संपणार आहे. कारण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले

की देशातील लाखो शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ हा देशाचे आवडते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24 फेब्रुवारी रोजी 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत.

2024 मध्ये पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा करण्यात आला होता. 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातून देशातील 9 कोटींपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना 20 हजार कोटी रुपयांहून जास्त रक्कम वाटप करण्यात आली होती. त्या वेळी पीएम किसान योजनेस पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT मार्फत 2 हजार रुपये जमा करण्यात आले होते.

पीएम किसान योजनेत नवीन बदल

या योजनेत शेतकऱ्यांच्या पात्रतेविषयी वेळोवेळी बदल केले जातात. या वेळेससुद्धा सरकारच्या मंत्रिमंडळाने बदल केले आहेत. ते बदल कोणते ते पाहू.

  • आता या योजनेचा लाभ हा 2018 आणि 2019 मध्ये रजिस्टर केलेल्या शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे.
  • एका कुटुंबातील एक व्यक्तीला आता लाभ दिला जाणार आहे. या अटींमधून परिवारातील पती-पत्नी, 18 वर्षांखालील मुलांना वगळले आहे.
  • संविधान पदावरील व्यक्तींना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • माजी संविधान पदावरील व्यक्तींना सुद्धा आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निमशासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचारी आता पात्र नसतील.
  • ज्या व्यक्तीच्या नावे संस्था असेल, अशा व्यक्ती सुद्धा या पुढे योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत.
  • देशातील नोंदणीकृत व्यावसायिक.
  • देशात ज्या नागरिकांनी सलग तीन वेळा आयकर भरला असेल, असे लाभार्थी सुद्धा आता अपात्र असणार आहेत.
  • ज्या लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ समर्पित केला असेल अशा लाभार्थ्यांना सुद्धा या पुढे लाभ दिला जाणार नाही.
  • सेवा निवृत्तीधारक आता या योजनेस अपात्र असतील.
  • ज्या लाभार्थ्यांच्या नावे जमीन नसेल, असे लाभार्थी सुद्धा आता या पुढे अपात्र ठरणार आहेत.
  • ज्या लाभार्थ्यांनी दोनदा नोंदणी केली असेल, असे सर्व लाभार्थी योजनेस अपात्र असतील.
  • शेती दुसऱ्या कामासाठी वापरत असलेले लाभार्थी अपात्र असणार आहेत. (उदा. शेतात पेट्रोल पंप असणे, शेतात हॉटेल असणे, शेतात कंपनी असणे इत्यादी)
  • भारतातील अनिवासी लाभार्थी पुढे योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • या पुढे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही अजून केवायसी केली नसेल तर तुम्ही योजनेपासून वंचित राहू शकता.
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबत आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक पाहिजे.
  • खोटी माहितीद्वारे नोंदणी केलेले लाभार्थी पुढे अपात्र ठरणार आहेत.

पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार का?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. ही योजना सुरु होऊन 6 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण अद्याप योजनेतील रकमेत वाढ झालेली नाही.

त्याच अनुषंगाने काही शेतकरी संघटना आणि देशातील शेतकरी बांधव मागील 1-2 वर्षांपासून या योजनेतील रकमेत 4,000 रुपयांची भर करून ती 10,000 रुपये करावी म्हणून सरकारला निवेदन देत आहेत.

त्यामुळे आता देशात चर्चा चालू झाली आहे की 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात देशातील शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे की अर्थमंत्री या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी पीएम-किसान योजनेत 10,000 रुपये वार्षिक रक्कम वाढवून देतील.

1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा पूर्ण अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्थापनेपासून म्हणजे 2014 पासूनचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे.

त्यामुळे देशातील शेतकरी बांधवांसाठी या पूर्ण अर्थसंकल्पात काय घोषणा होतील, त्यावर देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष असणार आहे. आणि त्यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे.

शेतकरी वर्गाला या अर्थसंकल्पातून किती लाभ मिळेल हे पाहण्यासारखे असणार आहे.

अधिकृत वेबसाइट

पीएम किसान योजनेविषयी अधिक माहितीसाठी भारत सरकारने तयार केलेल्या अधिकृत वेब पोर्टलला भेट द्या. – https://pmkisan.gov.in

निष्कर्ष

आज आपण या लेखामधून पाहिले पीएम किसान सम्मान निधी योजनेचा इतिहास, योजनेमध्ये मिळणारा लाभ आता कोणत्या नवीन निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

या योजनेचा आतापर्यंत 18 वा हफ्ता हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला गेला आहे. आता नवीन वर्षाचा पहिला हफ्ता आणि योजना सुरू झाल्या पासूनच 19 वा हफ्ता हा आता पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे.

त्यासोबतच पाहिले की जेव्हा पासून योजना देशात लागू झाली आहे तेव्हा पासून फक्त नियम बदलले जात आहेत. पण कधी योजनेच्या हफ्त्यांमध्ये वाढ झाली नाही. या साठीच मागील वर्षांपासून देशातील शेतकरी संघटना आणि शेतकरी वर्ग या योजनेत वाढ व्हावी म्हणून मागणी करत आहेत.

आणि या वर्षी 1 फेब्रुवारीला देशाचा पूर्ण अर्थसंकल्प घोषित होणार आहे. शेतकरी वर्गाला अशी अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पात पीएम किसान सम्मान निधी योजनेत वाढ होऊन 10 हजार रुपये करण्यात येईल. सर्व देशाचे लक्ष आता पूर्ण अर्थसंकल्पावर आहे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW

Related Blogs


Shetkari soybean cotton anudan 2023

सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी कशी करावी । अनुदान जमा होण्याची तारीख ठरली

Magel tyala solar pump yojana maharashtra

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु

Pradhan mantri kisan fpo yojana

PM Kisan FPO Yojana: सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे

Plastic mulching paper subsidy

प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

Rabi hangam pik vima insurance

रब्बी हंगामातही 1 रुपयात मिळणार पीक विमा

Rabbi pikache yogya niyojan bhargos utpanna

रब्बी पिकांचे नियोजन: योग्य नियोजन भरघोस उत्पादन

Rabbi hangam kanda lagvadi sathi ghyavayachi kalji

रब्बी हंगाम: कांदा लागवडीसाठी घ्यावयाची विशेष काळजी आणि मार्गदर्शन

Toor pikache sangopan ani vishesh kalaji

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तूर पिकांचे संगोपन आणि विशेष काळजी

Kothimbir lagvad niyojan kami kharchat bharpur utpadan

कोथिंबीर लागवड नियोजन: योग्य नियोजन आणि कमी खर्चात भरपूर उत्पादन

Garlic rate update november 2024

देशात लसणाचा तुटवडा: अफगाणिस्तानातून लसणाचा पुरवठा

Mango orchard management special care

आंबा बागेचे नियोजन: अनियमित बहार येण्याची कारणे, संगोपन आणि विशेष काळजी

Vermicompost benefits and detail information

गांडूळखताचे फायदे आणि संपूर्ण माहिती