Monday, 12 May 2025
English   हिंदी
Home  |  Breaking News: घरबसल्या काही मिनटात करा तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC)

Breaking News: घरबसल्या काही मिनटात करा तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेशन कार्डची ई-केवायसी विषयी | About e-KYC of Ration Card

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मागील काही महिन्यांपासून नागरिकांची ई-केवायसी करण्याचे काम केले जात आहे. पण ही केवायसी रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनद्वारे केली जात आहे.

ई-पॉस मशीनमध्ये बोटांच्या ठश्याने केवायसी करू शकतात. यात असे लक्षात आले की खूप वर्षांपासून नागरिकांनी आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे नागरिकांचे ई-केवायसी करणे खूप त्रासदायक ठरत आहे. आणि ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख नजदिक येऊन ठेपली आहे.

तरी राज्यातील खूप लोकांची ई-केवायसी प्रलंबित आहेत. म्हणून सरकारने ही बाब लक्षात घेऊन राज्यातील नागरिकांसाठी सोपी आणि सरळ ई-केवायसी करण्याची प्रणाली विकसित केली आणि त्याचे शुभारंभ आजपासून करण्यात आले. त्यामुळे राज्यातील लाखो नागरिकांचे केवायसी करण्याचा तणाव कमी होणार आहे.

सरकारने यासाठी एक मोबाईल अँप विकसित केले आहे. त्याचे नाव "Mera e-KYC" असे आहे. या अँप विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. कशा प्रकारे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी घरी बसून स्वतःची आणि परिवारातील लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करू शकतात?

मेरा ई-केवायसी अँप विषयी | About Mera e-KYC App

National Information Centre, FCA Division मार्फत राज्यातील नागरिकांसाठी Mera e-KYC अँप विकसित केले आहे. या अँपच्या वापर करून राज्यातील नागरिक काही मिनिटात आणि सहजपणे काही स्टेप्समध्ये ई-केवायसी पूर्ण करू शकतात.

हे अँप आधार कार्ड फेस प्रमाणीकरण (Aadhaar based face authentication) चा वापर करून रेशन कार्ड लाभार्थीची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली जाईल. मेरा ई-केवायसी ऐपचा वापर कसा करायचा आणि नागरिक याचा वापर सहजपणे कशा पद्धतीने करू शकतात त्या विषयी सविस्तर पाहू.

ई-केवायसी करण्यासाठी लागणारे दोन मुख्य अॅप्स

1) मेरा ई-केवायस अँप (Mera e-KYC app)

2) आधार कार्ड फेस प्रमाणीकरण अँप (Aadhaar based face authentication app)

मेरा ई-केवायसी अॅपच्या मदतीने ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

1) नागरिकांनो, सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये "प्ले स्टोर" (Play Store) उघडून घ्या.
2) मेरा ई-केवायसी अॅप (Mera e-KYC App) शोधून घ्या (Search) आणि डाउनलोड (Download) करा.
3) पुढे तुम्हाला अँप उघडताना फोटो (Photo and Video Access) आणि लोकेशन परवानगी (Current Location Access) विचारेल. तुम्ही ती परवानगी देणे बंधनकारक आहे. म्हणून ती न चुकता देणे.
4) तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड फेस प्रमाणीकरण अँप नसेल तर तुम्हाला "Download" साठी विचारले जाईल. ते अँप डाउनलोड करून घ्या. फेस प्रमाणीकरण (Face Authentication App) असेल तर पुढील स्टेप्स करा.
5) आता अँपमध्ये राज्य निवडण्यासाठी (Select State) पर्याय दिसेल. तुमचे राज्य (Your State) निवडून घ्या. म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra) राज्य निवडून घ्या.
6) खाली दिलेल्या "Verify Location" बटणावर क्लिक करून तुमचे Location पडताळून घ्या.
7) स्थान सत्यापित झाल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल. दिलेल्या जागेत आधार क्रमांक भरून घ्या आणि "Generate OTP" बटणावर क्लिक करा.
8) आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी (OTP) पाठवण्यात येईल.
9) पुढील स्क्रीनवर (Screen) मोबाईल क्रमांकावर आलेला OTP आणि खाली दिलेला कॅप्चा कोड सुद्धा न चुकता भरून घ्या आणि बटणावर क्लिक करा.
10) OTP आणि कॅप्चा कोड बरोबर असेल तर पुढे तुम्हाला लाभार्थ्यांची माहिती दिसेल. आणि खाली दिलेल्या "Face eKYC" बटणावर क्लिक करून घ्यायचं आहे.
11) पुढे "Face Authentication" करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. कॅमेरामध्ये फक्त लाभार्थ्याचा चेहरा दिसायला हवा आणि त्यासोबत एकदा डोळे उघडून बंद करायचे आहेत (उघडझाप). या सारख्या आणखी १-२ सूचना दिल्या आहेत. त्या नुसार अनुसरण करा.
12) सत्यापन पडताळणी करण्याची प्रक्रिया पूर्ण यशस्वीपणे झाल्यानंतर लाभार्थ्यांची माहिती त्यांच्या नजीकच्या रेशन दुकानाच्या ई-पॉस मशीनमध्ये पाहायला मिळेल.

ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, स्टेटस कसा तपासायचा?

1) ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेप्रमाणे दहा स्टेप्स करून घ्या. आणि तुम्हाला दिसत असलेल्या लाभार्थ्याच्या माहितीमध्ये खाली "eKYC Status" दिसेल.
2) ई-केवायसी यशस्वी झाली असेल तर "Y" दिसेल.
3) ई-केवायसी बाकी असेल किंवा अयशस्वी झाली असेल तर "N" दिसेल.

तुम्ही मेरा ई-केवायसी अॅपमध्ये लाभार्थी तपशीलामध्ये कोणती माहिती पाहू शकता

1) लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव.
2) लाभार्थ्यांचे राज्य.
3) कार्ड नंबर (ऑनलाईन डिजिटल रेशन कार्ड नंबर)
4) लाभार्थ्याचा जिल्हा.
5) ई-केवायसी मान्यता.
6) १२ अंकी आधार क्रमांक.
7) ई-केवायसी स्टेटस ("Y" किंवा "N").

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet