Home  |  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोमवारी मिळणार PM-Kisan योजनेचा 19वा हफ्ता

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोमवारी मिळणार PM-Kisan योजनेचा 19वा हफ्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM-Kisan योजना देशातील कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे?

✔ सरकारी नोकरदार नसलेले शेतकरी आणि आयकर न भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

✔ जर शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील एखादा सदस्य (पत्नी, नवरा, मुलगा, मुलगी इत्यादी) सरकारी नोकरीत असतील किंवा आयकर भरत असतील, तर त्या कुटुंबाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ते कुटुंब PM-Kisan योजनेस अपात्र असतील.

✔ एक गोष्ट लक्षात घ्या, एका परिवारातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर परिवारातील इतर व्यक्तींच्या नावे जमीन असेल आणि त्यांनी सुद्धा प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी अर्ज केला असेल, तर अशा शेतकरी बांधवांचा अर्ज मंजूर होणार नाही.

✔ जमिनीचे पडताळणी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी आपल्या नावे करून आणि त्यांची शक्य होईल तितक्या लवकर जमिनीची पडताळणी पूर्ण करून घेणे.

ई-केवायसी केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो

भारत सरकारच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, देशातील करोडो शेतकरी बांधवांना PM-Kisan योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. जर देशातील कोणत्याही शेतकऱ्याने अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर त्यांचा १९वा हप्ता थांबू शकतो.

✅ याशिवाय, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते, जमीन कागदपत्रे (७/१२, ८अ) आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे

पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा!

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये बिहार सरकारमार्फत आयोजित ‘शेतकरी सन्मान सोहळ्यात’ सहभागी होणार आहेत. यावेळी बिहार राज्यात कृषी क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केल्या जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये कृषी प्रकल्प, माती चाचणी प्रयोगशाळा आणि ‘किसान चौपाल’ सुरू होणार!

✅ बिहारमधील 10 जिल्ह्यांमध्ये मोदींच्या हस्ते माती चाचणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत.

✅ बिहारमध्ये गावपातळीवर ‘किसान चौपाल’ उपक्रम राबवले जाणार आहेत!

✅ त्याचवेळी PM-Kisan योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी बिहार दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या इतर महत्त्वाच्या घोषणा.

🔹 पंतप्रधान मोदी बिहार राज्यात कृषीशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार आहेत.

🔹 बिहार सरकारने आतापर्यंत बिहारमध्ये तीन ‘कृषी रोडमॅप’ लागू केले असून आता सरकार राज्यात चौथा रोडमॅप तयार केला जात आहे, याचा सुद्धा शिलान्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते केला जाऊ शकतो.

🔹 बिहारमध्ये कृषी क्षेत्रातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ‘अॅग्रीकल्चर फीडर’ बसवले जाणार आहेत.

माती चाचणी प्रयोगशाळांचे फायदे

देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, बिहारमध्ये नव्या १० माती चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

🔹 या प्रयोगशाळांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या मातीच्या गुणवत्तेची आजच माहिती मिळण्यास मदत होईल.

🔹 राज्यातील शेतकऱ्यांना शेतात योग्य पीक पद्धती अवलंबता येईल आणि यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढेल.

‘किसान चौपाल’चा फायदा काय?

बिहार सरकारने गावपातळीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘किसान चौपाल’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

✔ या कार्यक्रमांत शेतकरी एकमेकांशी आणि नजीकच्या कृषी तज्ञांशी संवाद साधू शकतील.

✔ शेतातील नवीन तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती आणि देशातील आणि राज्यातील कृषी क्षेत्रातील सरकारी योजनांबद्दल माहिती मिळेल.

✔ राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींवर इथे चर्चा करून त्यावर योग्य उपाय शोधला जाईल.

PM मोदींच्या दौऱ्याची तयारीचा आढावा

📌 केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि राज्यातील अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोमवारी भागलपूर येथे आयोजित सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

📌 भागलपूरमध्ये विशेष लक्ष म्हणून पोलीस सुरक्षा व्यवस्था, त्यासोबत बिहारमधील प्रमुख शहरांमध्ये सुद्धा विशेष लक्ष दिले जात आहे आणि सोहळ्याच्या आयोजनावर कृषी मंत्रालयाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

PM-Kisan योजनेबाबत शेतकऱ्यांना समस्या असल्यास कुठे संपर्क साधावा?

📞 हेल्पलाईन क्रमांक: 155261 / 1800115526 (टोल-फ्री)
📧 ई-मेल: pmkisan-ict@gov.in

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Welcome to Krushi Marathi

India’s Largest Agriculture Marketplace

For Farmers, Buyers, Sellers & Agri Businesses

BUY, SELL & RENT — All in One Platform

SELL NOW BUY NOW REGISTER NOW