Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  Bajar Bhav:- तूर, कापूस, गहू, हरभरा, कांदा आणि मका बाजारभाव

Bajar Bhav:- तूर, कापूस, गहू, हरभरा, कांदा आणि मका बाजारभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तूरचा आजचा बाजारभाव

तूरच्या बाजारभावात सध्या अस्थिरता पाहायला मिळत आहे. बाजारात तुरीची आवक जास्त होत असल्यामुळे दर खाली वर होत आहेत. राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये तुरीची आवक तुलनेने कमी आहे, तरीही तुरीचा बाजारभाव हा कमी आहे. सध्या तुरीला सरासरी ६,३०० रुपये ते ६,८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

सरकारने हमीभाव ठरवून दिलाय, ७,५५० रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव आहे. पण अद्याप बाजार समितीत तूर खरेदी चालू झालेली नाही. म्हणून काही शहरांमधील शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात तूर विकावी लागतेय.

तर काही शहरांमध्ये शेतकऱ्यांनी सरकारी तूर खरेदिकेंद्राकडे पाठ फिरवलेली दिसतेय. कारण तिथे चांगल्या प्रतीची तूर खरेदी केली जात आहे. तूर खराब असेल तर तिथून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत, म्हणून शेतकरी खुल्या बाजारात तूर विकतायत. खाली काही शहरांमधील आजचे तूर बाजारभाव.

बाजार समिती शहराचे नाव तुरीची जात परिमाण आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
अकोला लाल क्विंटल 2244 6350 7745 7650
परतूर पांढरा क्विंटल 7 7000 7101 7050
परतूर लाल क्विंटल 6 6900 7171 7000
धुळे लाल क्विंटल 138 5345 6595 6375
पाथरी पांढरा क्विंटल 3 6811 6911 6900
पाथरी लाल क्विंटल 1 6852 6852 6852
नागपूर लाल क्विंटल 2482 7000 7500 7375
अमरावती लाल क्विंटल 5019 7550 7750 7650
छत्रपती संभाजीनगर पांढरा क्विंटल 115 6801 7151 6976
बीड पांढरा क्विंटल 49 6551 7285 7064
सोलापूर लाल क्विंटल 153 6505 7425 7000
जळगाव लाल क्विंटल 37 6000 6900 6895
वाशीम लाल क्विंटल 1200 6830 7460 7000

कापसाच्या बाजारभावात सुधारणा

आज कापसाच्या बाजारभाव सकारात्मक झालेला पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात दोन टक्क्यांची घट झाल्याने याचा परिणाम भारतीय बाजारात सुद्धा पाहायला मिळतोय, पण भारतीय बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी होत असल्याने कापसाचा बाजारभाव सकारात्मक दिसत आहे.

आज भारतीय बाजारात कापूस सरासरी ७,००० रुपये ते ७,३०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. कृषी बाजारभाव अभ्यासकांच्या मते मार्च महिन्यात कापसाची आवक घटू शकते. त्यामुळे भारतात आणि राज्यात कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जातेय. आज काही मार्केटमधील भाव आपल्या हाती लागले ते खालील प्रमाणे

बाजार समिती शहराचे नाव कापसाची जात परिमाण आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
अकोला लोकल क्विंटल 1592 7421 7421 7421
अमरावती --- क्विंटल 94 7050 7400 7225

कांद्याच्या आजचा बाजारभाव

कांद्याचे बाजारभाव हे रोज बदलत असतात. त्यात कायम चढ-उतार दिसत असते. आजचे कांद्याचे मार्केट पाहता चांगला दर मिळताना दिसतोय. मागील काही दिवसांमध्ये कांदा दरात घट पाहण्यासाठी मिळत होती, तज्ज्ञ सांगतात की बाजारात वाढती आवक आणि निर्यातीवर निर्बंध या मुख्य कारणाने कांदा दरात घट पाहायला मिळत होती.

सध्या कांद्याला सरासरी १,५०० रुपये ते २,२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळताना दिसत आहे. तज्ज्ञ सांगतात पुढील आठवड्यात कांद्याच्या भावात बदल पाहायला मिळू शकतात. आज राज्यातील काही बाजारभाव हाती लागले ते खालील प्रमाणे सविस्तर पहा.

बाजार समिती शहराचे नाव कांद्याची जात परिमाण आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
कराड हालवा क्विंटल 99 1500 2500 2500
सातारा ---- क्विंटल 307 1000 2800 1900
कोल्हापूर ---- क्विंटल 5850 1000 2700 1800
धुळे लाल क्विंटल 904 300 2400 2200
अकोला ---- क्विंटल 530 1200 2700 2400
नागपूर लाल क्विंटल 1000 1300 2500 2200
नागपूर पांढरा क्विंटल 960 1200 2500 2175
लासलगाव लाल क्विंटल 11129 900 2476 2270
छत्रपती संभाजीनगर ---- क्विंटल 947 1000 2500 1750
लासलगाव उन्हाळी क्विंटल 995 1800 2441 2300
सोलापूर लाल क्विंटल 25110 200 3100 1800
नाशिक पोळ क्विंटल 2830 1400 3000 2450
धाराशिव लाल क्विंटल 33 1500 3200 2350

मक्याच्या बाजारभावात स्थिरता

भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दोन ते तीन वर्षांपासून मक्याची मागणी वाढली आहे. मक्याचा वापर इथेनॉल, पोल्ट्री उद्योगांमध्ये वापरण्यात येत असल्याने कंपन्या मक्याला चांगला बाजारभाव मिळवून देत आहेत. या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात मका लागवड वाढली आहे.

त्यामुळे मक्याला मागील दोन महिन्यांपासून भाववाढ होताना दिसत नाही आहे. राज्यात आज मक्याला सरासरी २,०५० रुपये ते २,३५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मकाच्या दरात पुढील काही दिवसांमध्ये बदल पाहण्यास मिळू शकतो. शेतकऱ्यांनी बाजारभावाकडे आपले लक्ष केंद्रित ठेवा जेणेकरून मक्याला योग्य भाव मिळेल.

बाजार समिती शहराचे नाव मक्याची जात परिमाण आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
पुणे लाल क्विंटल 4 2500 2700 2600
अमरावती लाल क्विंटल 3 2150 2224 2187
धुळे पिवळी क्विंटल 215 1705 1887 1785
छत्रपती संभाजीनगर पिवळी क्विंटल 30 1890 2100 1995

गव्हाचा आजचा बाजारभाव

नवीन गहू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात गव्हाच्या भावात उतार-चढ पाहण्यासाठी मिळतेय राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये गव्हाला २,६०० रुपये ते ३,२०० रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर मिळताना दिसतोय. बाजारात गव्हाची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई पाहण्यास मिळू शकते.

म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या बाजारपेठेतल्या गव्हाच्या ताज्या भावाकडे लक्ष केंद्रित ठेवा जेणेकरून तुमच्या गव्हाला चांगला भाव मिळेल.

बाजार समिती शहराचे नाव गव्हाची जात परिमाण आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
पुणे शरबती क्विंटल 420 4500 6000 5250
अकोला लोकल क्विंटल 639 2550 2910 2665
नागपूर शरबती क्विंटल 800 3200 3500 3425
नागपूर लोकल क्विंटल 261 2760 2888 2856
परतूर २१८९ क्विंटल 32 2441 3081 2690
पाथरी लोकल क्विंटल 22 2600 2751 2751
धुळे लोकल क्विंटल 1660 2100 2880 2700
बीड हायब्रीड क्विंटल 209 2700 3117 2848
अमरावती लोकल क्विंटल 674 2850 3050 2950
छत्रपती संभाजीनगर लोकल क्विंटल 298 2100 3000 2778
सोलापूर शरबती क्विंटल 788 2625 3930 3435
वाशीम २१८९ क्विंटल 900 2535 2750 2650

हरभऱ्याचा आजचा बाजारभाव

बाजारात रब्बी हंगामाच्या नवीन हरभऱ्याची आवक वाढताना दिसतेय, त्यासोबतच भाजारभाव सुद्धा समाधानकारक पाहायला मिळतोय. ५,२०० रुपये ते ५,७०० रुपये दर मिळताना पाहिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या महिन्यात हरभरा विकण्याच्या विचारात असाल तर हमीभावाचा निर्णय आल्यावर नियोजन करावे.

असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांनी हमीभावासाठी नोंदणी करून साकारले, हमीभावाने हरभरा विकण्याचे नियोजन करावे. तज्ज्ञांच्या मते, एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या दरात ६,००० रुपये भाव मिळू शकतो. पण तोपर्यंत वाट पाहावी लागेल.

हे सर्व लक्षात घेऊन आणि योग्य बाजारभावाचे नियोजन करून हरभरा विकण्यासाठी बाजारात घेऊन जाणे.

बाजार समिती शहराचे नाव हरभऱ्याची जात परिमाण आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
पुणे ---- क्विंटल 44 7200 8200 7700
अकोला लोकल क्विंटल 8829 4700 5700 5565
नागपूर लोकल क्विंटल 4830 5100 5439 5367
परतूर लोकल क्विंटल 40 5000 5350 5300
पाथरी लोकल क्विंटल 5 5251 5300 5275
धुळे लाल क्विंटल 110 4980 5285 5100
अमरावती लोकल क्विंटल 8304 5440 5850 5645
छत्रपती संभाजीनगर गरडा क्विंटल 9 5076 5152 5114
बीड लाल क्विंटल 16 5500 7175 6188
सोलापूर गरडा क्विंटल 165 5450 5690 5560
जळगाव चाफा क्विंटल 746 5100 5350 5311
जळगाव काबुली क्विंटल 63 7900 8750 8750
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet