Friday, 9 May 2025
English   हिंदी
Home  |  PM Internship Second Phase: पीएम इंटर्नशिप दुसऱ्या टप्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली

PM Internship Second Phase: पीएम इंटर्नशिप दुसऱ्या टप्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएम इंटर्नशिप विषयी | About PM Internship

भारतातील एक कोटी बेरोजगार तरुणांना इंटर्नशिप प्रदान करण्यासाठी कॉर्पोरेट मामलों का मंत्रालय भारत सरकार यांच्या द्वारे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची सुरुवात २०२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

या योजनेतील पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्यात आला आणि तरुणांची इंटर्नशिप २ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत तरुणांना १२ महिन्याची इंटर्नशिप देण्यात येणार आहे.

त्यासोबतच विद्यार्थ्यांना ४५०० रुपये सरकारकडून तर ५०० रुपये कंपनीकडून देण्यात येणार आहेत. म्हणजे तरुणांना दोघांनी मिळून महिन्याला ५००० रुपये देण्यात येणार आहेत.

त्यासोबत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत प्रत्येक तरुणांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार ६,००० रुपये एकरकमी देण्यात येणार आहे. या योजनेचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील १ कोटी तरुणांना इंटर्नशिप देणं आहे.

पीएम इंटर्नशिप दुसऱ्या टप्याविषयी | About PM Internship Second Phase

पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत भारतातील ७३० जिल्ह्यातील १ लाख बेरोजगार तरुणांना ५०० पेक्षा जास्त आणि देशातील नामांकित मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी भारत सरकार उपलब्ध करून देणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्यासाठी सरकारने अर्ज मागविण्यासाठी सुरुवात केली आहे.

१२ मार्चपर्यंत तरुणांना योजनेत सहभाग होण्याची मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्यासाठीची पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास संपर्क माहिती.

दुसऱ्या टप्यात फक्त या तरुणांना संधी मिळेल

✅ अर्जदार तरुण हा भारतीय नागरिक हवा.
✅ देशातील 21 ते 24 वयोगटातील तरुणांना इंटर्नशिपसाठी संधी देण्यात येणार आहे.
✅ एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कंपनीमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे, नोकरी नाही. आणि तुम्ही नोकरीची मागणीही करू शकत नाही. कंपनीला तुमचे काम आवडले तर कंपनी तुम्हाला नोकरीला लावण्याचा विचार करेल.
✅ अर्जदार शिक्षण घेत असेल किंवा नोकरी करत असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
✅ मुक्त विद्यापीठामधून किंवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतलेले तरुण सुद्धा अर्ज करू शकतात.
✅ अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या खाली पाहिजे.
✅ अर्जदाराच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल, तर असे उमेदवार सुद्धा अपात्र असतील.
✅ बाकी सरकारने दिलेल्या निकष वाचून तरुणांनी अर्ज करावा.

पीएम इंटर्नशिप दुसऱ्या टप्यासाठी लागणारी कागदपत्रे

✅ अर्जदाराचे अपडेट आधार कार्ड.
✅ अर्जदाराचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे.
✅ अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो. (जास्त जुने फोटो नको, नाहीतर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.)
✅ अर्जदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते. (बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेतले असावे.)

पीएम इंटर्नशिप दुसऱ्या टप्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया | Process to apply for PM Internship Scheme

1) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबपोर्टल "https://pminternship.mca.gov.in/login/" भेट द्या.
2) पुढे "New Registration" बटणावर क्लिक करा.
3) नंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती (Personal Details), संपर्क माहिती (Contact Details), शैक्षणिक माहिती (Education Details), बँक खाते तपशील (Bank Details), कौशल्य तपशील (Skill Details) फॉर्म सबमिट करून द्या.
4) सर्व माहिती तपासून घ्या आणि पुढे तुमचा अर्ज सबमिट करा.

पीएम इंटर्नशिप संपर्क माहिती | PM Internship Contact Information

Email ID - pminternship@mca.gov.in
Contact no - 1800 11 6090
Address - ए विंग, ५वा मजला, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली-११०००१

टीप

तुम्ही तुमच्या मित्रांना पीएम इंटर्नशिप दुसऱ्या टप्याविषयी सांगितले म्हणजे Refer केले. आणि त्या मित्राने इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. तर तुम्हाला सरकारकडून काही points मिळतील.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet