Home  |  फळांचा बाजारभाव: उन्हाळा जवळ आला, फळांची मागणी वाढल्याने फळांचे भावही वाढले

फळांचा बाजारभाव: उन्हाळा जवळ आला, फळांची मागणी वाढल्याने फळांचे भावही वाढले

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

फळांचा बाजार भाव विषयी

यंदा फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाली. आणि लोकांची शरीराला थंडावा देणारी फळे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांची मागणी वाढलीय पाहायला मिळतेय. त्यासोबत देशातील आणि जगातील मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना याच महिन्यात २ तारखेपासून चालू झाला आहे,

त्यामुळे राज्यातील आणि देशातील बाजारपेठेत फळांची मागणी वाढली आहे. त्या हिशोबाने पाहता बाजारात फळांची आवक कमी आहे, त्यामुळे किमतीमध्ये वाढ झाली पाहायला मिळत आहे. त्यासोबतच भाव वाढण्याची काही कारणे आहेत, ते सुद्धा आपण पाहू.

१) उपवास आणि उन्हाची चाहूल लवकर लागत असल्याने फळांची मागणी वाढली आहे आणि त्या हिशोबाने पाहता मार्केटमध्ये फळांची आवक कमी आहे.
२) वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे या वर्षी फळबाग कमी प्रमाणात होत आहेत. हे सुद्धा दर वाढ होण्याचे कारण आहे.
३) १० ते १५ दिवसांपर्यंत ही भाववाढ अशीच पाहायला मिळेल. त्यानंतर आवक वाढेल आणि फळांचे भावही काही प्रमाणात कमी होताना दिसतील.
४) वाढत्या उन्हाचा कडाका हा फळांवर सुद्धा पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हा फळ उत्पादनावर पाहायला मिळत आहे.
५) या वर्षी टरबूज, खरबूज आणि द्राक्षे खरेदीवर अधिक भर पाहायला मिळत आहे.
६) या वर्षी आंबा बागांमध्ये बहार कमी असल्याने अजून मार्केटमध्ये आंबा जास्त पाहायला मिळत नाही. त्यामुळे आंब्यांचे दर हे तेजीत आहेत. म्हणून अजून आंबा विक्री कमी दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फळांचे भाव पुढीलप्रमाणे

फळे नावे बाजारभाव
लिंबे ५०-८० रुपये प्रति किलो
अननस ८०-१२० रुपये प्रति किलो
कलिंगड ३०-५० रुपये प्रति किलो
खरबूज ४०-६० रुपये प्रति किलो
पपई ४०-७० रुपये प्रति किलो
चिकू ६०-१०० रुपये प्रति किलो
काकडी ३०-५० रुपये प्रति किलो
द्राक्ष ८०-१५० रुपये प्रति किलो
आंबा १००-२५० रुपये प्रति किलो
केळी ५०-८० रुपये प्रति डझन
सफरचंद १५०-२५० रुपये प्रति किलो

आजचा फळांचा बाजारभाव आणि आवक

१) लिंबूचा बाजार पाहिला असता आज पुणे बाजारपेठेत लिंबूची थोडी आवक वाढलेली पाहायला मिळत आहे आणि कमीत कमी ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यासोबत जास्तीत जास्त भाव हा ९००० रुपये मिळताना पाहिला गेला.

आज राज्यात लिंबूला सर्वात जास्त भाव हा छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये पाहायला मिळाला. सरासरी भाव हा ७००० रुपये पाहायला मिळाला.

२) टरबूजचा बाजार आज नाशिक बाजारपेठेत आवक कमी झालेली पाहायला मिळाली आहे आणि कमीत कमी दर ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यासोबत जास्तीत जास्त भाव हा १००० रुपये मिळाला.

आज राज्यात टरबूजची सर्वात जास्त आवक ही छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये पाहायला मिळाली. टरबूजला सरासरी भाव हा ८०० रुपये पाहायला मिळाला.

३) आज पुणे बाजारपेठेत काकडीची थोडी आवक वाढलेली पाहायला मिळाली. कमीत कमी १००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यासोबत जास्तीत जास्त भाव हा २००० रुपये मिळाला,

त्यात आज २०० रुपयांची वाढ झाली. आज राज्यात काकडीचा भाव हा नाशिक मार्केटमध्ये पाहायला मिळाला. सरासरी भाव हा १७५० रुपये पाहायला मिळाला.

४) आज पुणे बाजारपेठेत द्राक्षेची आवक वाढलेली होती. कमीत कमी २,५०० रुपये प्रति क्विंटल द्राक्षाला भाव मिळाला. त्यासोबत जास्तीत जास्त भाव हा १३,५०० रुपये मिळाला. कालपेक्षा आज २,५०० रुपयांची वाढ झाली.

आज सरासरी सर्वात जास्त ८,००० रुपये प्रति क्विंटल भाव हा पुणे मार्केटमध्ये पाहायला मिळाला.

५) आज राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सफरचंदाची आवक वाढलेली होती. कमीत कमी सफरचंदाला ४,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यासोबत जास्तीत जास्त भाव हा १५,००० रुपये मिळाला.

कालपेक्षा आज १,००० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज सरासरी सर्वात जास्त १०,००० रुपये प्रति क्विंटल भाव हा डिलीशियस - नं. १ या जातीला नाशिक मार्केटमध्ये मिळाला.

६) आज राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये पपईची आवक कमी होती. आज पपईला मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर जास्तीत जास्त भाव हा २,००० रुपये मिळाला.

आज सरासरी सर्वात जास्त १,५०० रुपये प्रति क्विंटल भाव हा छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये पाहायला मिळाला.


👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nddb dairy plan maharashtra 19 districts

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत NDDB च्या मदतीने पशुपालकांसाठी गाय-भैंस आणि चारा योजना

Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Lift irrigation subsidy extended 2027

महाराष्ट्रात लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी 2027 पर्यंत वाढवली

Maharashtra solar spray pump subsidy

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सोलर स्प्रे पंपावर 100% अनुदान

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान