Tuesday, 29 April 2025
English   हिंदी
Home  |  Health Tips: उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचे सात फायदे

Health Tips: उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचे सात फायदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो

आपण पाहतो उन्हाळ्यात (In Summer) आपल्याला जास्त प्रमाणात घाम (Sweat) येतो आणि आपल्याला थकवा जाणवतो. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी कमी होण्यास सुरुवात होते. आणि आपल्या शरीराला डिहायड्रेशनचा धोका वाढताना दिसतो.

मग आपल्या समोर प्रश्न उपस्थित होतो शरीराला हायड्रेट कस ठेवायचं. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे लिंबू सरबत (Lemon syrup). लिंबू सरबत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचं काम करते.

त्यासोबतच लिंबूमध्ये आढळणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्स आणि नैसर्गिक क्षार हे दोन्ही घटक शरीरातील उष्णता (Heat) कमी करण्याचे काम (Work) करतात. उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळेस लिंबू सरबत प्यायल्यास आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहते आणि पूर्ण दिवस थकवा जाणवत नाही.

उन्हाळ्यात शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते

उन्हाळ्यात आपण पाहतो बहुतेक लोकांना अपचन, ऍसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवत असते. या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे लिंबू सरबत हे एक नैसर्गिक उपाय म्हणायला हरकत नाही.

कारण लिंबूमध्ये आढळणारे सिट्रिक अॅसिड हे शरीरातील पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते आणि उन्हाळ्यात अन्न सहज पचण्यास मदत करते आणि शरीरात तयार होणाऱ्या ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते.

डॉक्टर सांगतात की सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू रस पिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तुम्ही जेवणाच्या ३० मिनिटं अगोदर लिंबू रसाबरोबर प्यायले तर शरीरातील अन्न चांगल्या रित्या पचते.

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका सुद्धा वाढतो. यातच उन्हाळ्यात संसर्ग (Infection), सर्दी (Cold) आणि घशाच्या त्रासाचे प्रमाण वाढलेले पाहतो.

यापासून शरीराचे संरक्षण आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immunity Power) वाढण्याचा एकमेव सोपा पर्याय म्हणजे लिंबू सरबत, कारण लिंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'C' (Vitamin C) ची मात्रा असते. हे जीवनसत्त्व उन्हाळ्यात बॅक्टेरिया (Bacteria) आणि विषाणूंपासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात.

हे आपल्या शरीरात असलेल्या विष (टॉक्सिन्स - Toxins) बाहेर टाकण्यासाठी खूप फायदेमंद असतात. डॉक्टर सांगतात की रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मधाचे मिश्रण करून प्यायल्यास शरीराची इम्युनिटी मजबूत होतेच, त्यासोबत सर्दी, ताप आणि घसा दुखण्याचा त्रास सुद्धा कमी होतो.

शरीरातील ऊर्जा वाढवण्याच काम करतो

उन्हाळ्यात प्रवास करताना शरीरातील ऊर्जा (Energy) कमी (Low) होऊन आपल्याला थकवा जाणवतो. आपल्या शरीरात दिवसभर ऊर्जा हवी असते आणि थकव्यामुळे येणाऱ्या सुस्तीपासून वाचण्यासाठी लिंबू सरबत हे सर्वात उत्तम ऊर्जादायक पेय मानले जाते.

यात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक (Natural) साखरेचे प्रमाण शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि शरीरात नवीन ऊर्जा तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे दुपारी थकवा जाणवत असल्यास एक ग्लास लिंबू सरबत प्यायला हरकत नाही.

उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यास उत्तम आहे

उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने आपली त्वचा कोरडी, निस्तेज आणि तेलकट (oily) होताना पाहायला मिळते. अशावेळेस उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यास लिंबू सरबत मदतगार ठरू शकतो. कारण लिंबूमध्ये आढळणारे जीवनसत्त्व 'C' आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक म्हणजे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात.

हे दोन्ही पदार्थ शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचं काम करतात. डॉक्टर सांगतात की नियमित पहाटे रिकाम्या पोटी लिंबू सरबत प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार (glowing) राहते.

शरीराचे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे

लिंबू सरबतचा वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी (lose weight) करू शकता. कारण लिंबूमध्ये आढळणारे पेक्टिन फायबर (Pectin fiber) भूक कमी करत असते. आणि शरीरावरील चरबी (Fat) वितळण्याचं काम हा पदार्थ करत असतो.

त्यामुळे लिंबू सरबतमध्ये साखर न टाकता प्यायले तर नक्कीच तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या आणि त्यात थोडं मध घालून प्या. हे मिश्रण नक्कीच वजन कमी करण्यास मदत करेल.

उन्हाळ्यात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो

उन्हाळ्यात घाम जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे शरीराला थकवा ही जाणवतो. अशातच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना उन्हाळ्यात रक्तदाबाचा त्रास जाणवतो. त्यापासून वाचण्यासाठी लिंबू सरबत उत्तम पर्याय आहे कारण लिंबूमध्ये आढळणारा पोटॅशियम हा शरीरातील हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करत असतो.

तुम्ही हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी प्रथमउपचार म्हणून लिंबू सरबतचा वापर करू शकता. हृदयविकाराचा धोका असलेल्या लोकांनी लिंबू सरबतमध्ये मीठ नाही घालायचे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

लिंबू सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य

✅ तुम्ही एकटे असाल तर १ लिंबू पुरेसा आहे. पण जास्त लोकांसाठी बनवत असाल तर ४-५ लिंबू लागतील.
✅ एकटे असाल तर १ ग्लास पाणी किंवा तुमच्या सोईनुसार.
✅ १ चमचा साखर किंवा मध. सरबत पिणारे सदस्य जास्त असतील तर साखरेची मात्रा वाढवावी.
✅ मीठ हे तुमच्या चवीनुसार टाकावे.
✅ सरबत पाणी थंड नसेल तर २-३ बर्फाचे तुकडे टाकू शकता. बर्फाचे तुकडे टाकणे हे तुम्हाला सरबत किती थंड हवे आहे त्यानुसार वापरणे.
✅ सरबत बनवण्यासाठी भांडे, ग्लास किंवा लहान पातेली.

लिंबू सरबत बनवण्याची प्रक्रिया

लिंबू सरबत बनवण्याची कृती खूप सोपी आहे. तुम्ही काही मिनिटात लिंबू सरबत बनवू शकता.
1️⃣ तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर एक ग्लास पाणी घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवत असाल तर तुमच्या सोईनुसार पाणी घ्या.
2️⃣ त्यात लिंबाचा रस गाळून घ्या म्हणजे लिंबू लिपवून घ्या.
3️⃣ तुमच्या सोईनुसार त्यात जाड साखर, मीठ आणि मध उपलब्ध असेल तर हे सर्व पाण्यात टाकून त्याला व्यवस्थित ढवळा.
4️⃣ पाणी थंड नसेल तर त्यात बर्फाचे तुकडे टाका. पाणी थंड असेल तरी तुम्ही बर्फाचे तुकडे टाकू शकता.
5️⃣ हे झाले तुमचे लिंबू सरबत. मस्त पंख्याच्या, कुलरच्या किंवा AC च्या थंड हवेत बसून लिंबू सरबत प्या आणि आनंद घ्या.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet