बाजारात मिळत असलेला भाव | Price available in the market
मार्केटमध्ये भाजीपाल्याला मिळत असलेले दर पुढीलप्रमाणे:
कोथिंबीर - ५ ते ८ रुपये किलो मिळतेय
हिरवी मिरची - १० ते १२ रुपये किलो प्रमाणे विकली जातेय
काकडी - ८ ते १५ रुपये किलो
गंगाफळ (डांगर) - ५ ते ८ रुपये किलो
मेथी - ६ ते ९ रुपये किलो
भोपळा - ८ ते १२ रुपये किलो
टोमॅटो - ५ ते १० रुपये किलो
कोबी - ३ ते ६ रुपये किलो दराने विक्री होतेय.
कोथिंबीरचा मार्केट भाव | Market price of coriander
कोथिंबीर ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वापरली जाते. कोथिंबीरची मागणी कधी कमी होत नाही, पण मागील काही दिवसांपासून मार्केटमध्ये होणाऱ्या जास्त आवकमुळे कोथिंबीरचे भाव हे निच्चांक स्थराला पाहायला मिळत आहेत.
आज जळगाव मार्केटमध्ये कोथिंबीरला किमान ४०० रुपये शेकडा ते कमाल ८०० रुपये शेकडा मिळाला, तर किरकोळ बाजारात ५ रुपये किलो प्रमाणे विकताना पाहिली गेली. तसेच पुणे बाजारात आज कोथिंबीरची आवक ही १ लाख ३९ हजार नऊशे बावीस इतकी पाहिली गेली.
कालपेक्षा आज ८,४७२ क्विंटलने कोथिंबीरची आवक जास्त होती. त्यामुळे पुणे मार्केटमध्ये कोथिंबीरला किमान ४०० आणि कमाल १,२०० रुपये भाव पाहायला मिळाला, तर सरासरी ८०० रुपये इतका कोथिंबीरला भाव मिळतोय.
हिरवी मिरची मार्केट भाव | Green chilli market price
हिरवी मिरचीची आवक वाढलेली दिसतेय कारण मिर्चीलासुद्धा कमी भाव मिळताना दिसतोय. जळगाव मार्केटमध्ये मिरचीला किमान १,००० रुपये क्विंटल ते कमाल १,२०० रुपये क्विंटल मिळाला, तर किरकोळ बाजारात मिरची १० रुपये किलो प्रमाणे विक्रेते विकताना दिसले.
पुणे बाजारात आज हिरवी मिरचीची आवक ही ८०० क्विंटल इतकी होती. कालपेक्षा आज ६३ क्विंटलने मिरचीची आवक जास्त होती. त्यामुळे पुणे मार्केटमध्ये मिरचीला किमान ३,००० रुपये आणि कमाल ५,००० रुपये भाव मिळाला, तर सरासरी ४,००० रुपये इतका मिरचीला भाव मिळाला.
काकडी मार्केट भाव | Cucumber market price
उन्हाची चाहूल लागायला सुरुवात झाली की काकडीची ही मागणी वाढताना दिसते. कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते आणि काकडी उन्हाळ्यात शरीरासाठी पौष्टिक मानली जाते. आपण पाहतो मार्केटमध्ये मागणी वाढली म्हणजे भावही वाढतो, पण मागील काही दिवसांपासून हे चित्र उलट पाहायला मिळतेय.
जळगाव मार्केटमध्ये काकडीला किमान ८०० रुपये क्विंटल ते कमाल १,४०० रुपये क्विंटल भाव पाहायला मिळाला. तसेच किरकोळ बाजारात ८ रुपये किलो प्रमाणे काकडी विकली जात आहे. पुणे मार्केटमध्ये आज काकडीची आवक कमी पाहायला मिळाली तरी काकडीला किमान ८०० आणि कमाल २००० रुपये भाव पाहायला मिळाला, तर सरासरी १,४०० रुपये इतका काकडीला भाव मिळतोय. कालपेक्षा आज काकडीची आवक ही ८५ क्विंटलने कमी होती.
गंगाफळ (डांगर) मार्केट भाव | Gangaphal (paddy) market price
डांगरचे ही भाव आज साधारण पाहायला मिळाले आहेत. डांगरला किमान ८०० रुपये क्विंटल ते कमाल १,५०० रुपये क्विंटल भाव मिळाला. या मधून शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघत नाही आहे.
आज पुणे मार्केटमध्ये गंगाफळची ४७ क्विंटल आवक झाली होती. गंगाफळ किरकोट बाजारात ८ रुपये किलो प्रमाणे विकली जातेय.
मेथी मार्केट भाव | Fenugreek market price
मेथी खाल्याने शरीराला खूप फायदे होतात. कारण मेथीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. नियमित मेथी खाल्याने तुम्ही हृदयविकार सारख्या आणि हार्ट ब्लॉकेजसारख्या आजारांपासून दूर राहू शकता. तसेच तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मेथी खूप उपयोगात येते.
मेथीला आज किमान ४०० रुपये क्विंटल ते कमाल ८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. आज पुणे मार्केटमध्ये मेथीची १ लाख ६ हजार नऊशे पन्नास क्विंटल आवक झाली होती. कालपेक्षा आज ३२,९१० क्विंटलने मेथीची आवक वाढली होती. मेथी किरकोट बाजारात ४ रुपये किलो प्रमाणे विकली जाते.
भोपळा मार्केट भाव | Pumpkin market price
भोपळ्याला आज किमान ५०० रुपये क्विंटल ते कमाल १,८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. आज पुणे मार्केटमध्ये भोपळ्याची आवक कालपेक्षा १३५ क्विंटलने कमी झाली होती. आज १७७ क्विंटल भोपळ्याची आवक होती. भोपळ्याला किरकोट बाजारात ८ रुपये किलो भाव मिळतोय.
टोमॅटो मार्केट भाव | Tomato market price
काही दिवसांपूर्वी सामान्य परिवाराला टोमॅटो घेणे खूप अवघड होते. टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोपेक्षा जास्त पाहायला मिळत होते. आणि आज तेच टोमॅटोचे भाव ५ रुपये ते १० रुपये किलो प्रमाणे बाजारात विकताना पाहिले जात आहेत. आज मार्केटमध्ये टोमॅटोची आवक ही साधारण होती, कालपेक्षा थोडी कमी; तरीही भाव हा कमी पाहायला मिळाला.
टोमॅटोला आज किमान ६०० रुपये क्विंटल ते कमाल १,२०० रुपये क्विंटल भाव मिळाला. सरासरी ९०० रुपये क्विंटल टोमॅटोला भाव मिळाला आहे. टोमॅटोवर लागणारा खर्च हा जास्त असतो. असाच भाव राहिला तर शेतकऱ्यांच्या हातात फक्त निराशा पाहायला मिळेल. त्यांच्या समोर त्यांचे घर चालवणे सुद्धा अवघड होईल.
जेव्हा शेतकऱ्यांचा भाजीपाला पीक शेतातून संपेल, तेव्हा भाज्यांना भाव मिळेल आणि याचा संपूर्ण फायदा हा फक्त व्यापारी लोकांना होईल. सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
कोबी मार्केट भाव | Cabbage market price
कोबीला आज किमान ३०० रुपये क्विंटल ते कमाल ६०० रुपये क्विंटल भाव मिळाला. आज पुणे मार्केटमध्ये कोबीची आवक कालपेक्षा ५८ क्विंटलने जास्त झाली होती. आज ६६६ क्विंटल कोबीची आवक होती. कोबीला किरकोट बाजारात ४ रुपये किलो भाव मिळतोय. असं दिसतंय की कोबी लागवड शेतकऱ्यांना कोबी मरणाच्या दारी नेऊन ठेवीन.
इतका निच्चांक भाव. कोबी शेतातून तोडण्यास ही महाग आहे. असंच चालत राहील तर शेतकरी कोबीच्या शेतात जनावर सोडतील पण ती मार्केटमध्ये नेणार नाही. कारण त्या मधून गाडीभाडं आणि काढणीचा सुद्धा खर्च निघणार नाही आहे.
बाकी तर शेतकऱ्यांनी हिशोब सांगितला सुद्धा नाही. कोबीला ही खूप खर्च येतो, वेळोवेळी फवारणी, योग्य पाण्याचे नियोजन हे सर्व करून जर शेतकऱ्यांच्या मालाला असा भाव मिळेल तर शेतकरी पावेल काय, विकेल काय आणि घर चालवेल कस, हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडत असेल.