बांधकाम कामगार योजनेविषयी नवीन अपडेट
मंडळाने आता नवीन बदल ६ फेब्रुवारी २०२५ पासून लागू केले आहेत. त्यात आता राज्यातील प्रत्येक तालुक्यात सुविधा केंद्रांमध्ये डेटा एन्ट्रीचे काम चालत असे, आता ते काम बंद करण्यात आले आहे.
आता योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार स्वतःची नोंदणी, अर्जाचे नूतनीकरण आणि लाभार्थी आता त्यांच्या सोईनुसार त्यांच्या आजूबाजूच्या जागेवरून फॉर्म भरू शकतात. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणीसाठी पोर्टल मधून त्यांना त्यांच्या सोईनुसार तारीख निवडावी लागेल.
या सुविधेचा लाभ ६ फेब्रुवारी २०२५ पासून घेऊ शकता, म्हणजे ६ फेब्रुवारीपासून त्यांच्या सोईनुसार तारखा निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्जदाराला निवडलेल्या तारखेला त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या संचासोबत त्यांनी निवडलेल्या सुविधा केंद्रांवर जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी हजर रहावे लागेल. लाभार्थी निवडलेल्या तारखेला आणि निवडलेल्या ठिकाणी हजर न राहिल्यास लाभार्थ्यांचा अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे.
नवीन नोंदणी प्रक्रियेत बदल
आता बांधकाम कामगार त्याच्या सोईनुसार कुठूनही या पोर्टलमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याला तालुका सुविधा केंद्रात जाण्याची गरज नाही.
मंडळाने सुविधा केंद्र बंद केले आहेत आणि नागरिकांना सोईस्कर असे पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता कामगार त्याच्या सोईनुसार अर्ज करू शकतो आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठीसुद्धा सोईनुसार तारीख निवडू शकतो.
कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत बदल
कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. आता कामगार नोंदणी करताना त्यांच्या सोईनुसार कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख आणि जागा निवडू शकतात. या बदलांमुळे कामगारांची तालुका सुविधा केंद्रातील धावपळ बंद होणार आहे.
सर्व आता कामगारांच्या हातात दिले आहे. जेणेकरून कामगार त्यांच्या सोईनुसार ठिकाण आणि तारीख निवडून त्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करतील.
रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्याची प्रक्रिया
कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत मंडळाने मोठे बदल केले आहेत. ५ फेब्रुवारी अगोदर ज्या लोकांनी IWBMS वेबपोर्टलमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आधीपासून तारीख घेतली आहे,
त्या सर्व अर्जदारांची ती तारीख मंडळातर्फे रद्द करण्यात आलेली आहे. आता त्यांना वेबपोर्टलच्या माध्यमातून नवीन तारीख निवडायची आहे. आणि ती तारीख निवडण्याची प्रक्रिया आपण खाली सविस्तर पाहू.
- सर्व प्रथम बांधकाम कामगारांना मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवर जायचे आहे, त्यासाठी समोर लिंक दिली आहे. – https://mahabocw.in/
- त्यानंतर वेबपोर्टलवर “Change appointment date for Claim” या नावाचा बॉक्स दिसेल. त्या बॉक्सवर क्लिक करून घ्या. किंवा समोरील लिंकचा वापर करून तुम्ही थेट त्या पुष्टावर जा. – https://iwbms.mahabocw.in/claim-management/claim-appointment
- तुमच्या समोर एक पॉपअप उघडेल, त्यात “Registration No.” (नोंदणी क्रमांक) भरून “Proceed Form” वर क्लिक करून घ्या.
- पुढे तुम्ही अर्ज करताना टाकलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP भरून घ्या आणि पुढे क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number), आधार कार्ड नंबर(Aadhar Card Number) आणि मोबाईल नंबर (Mobile Number) दाखवला जाईल. त्यासोबत तुम्हाला पोचपावती नंबर विचारला आहे.
- इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ज्या अर्जाची जागा आणि ठिकाण बदलायचे आहे, त्या अर्जाची पोचपावती क्रमांक भरायचा आहे.
- पोचपावती क्रमांक भरून “Get Claim Details” वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी (Document Verification) जी जागा आणि तारीख हवी असेल ती निवडून घ्या आणि शेवटी अर्ज प्रणालीमध्ये सबमिट (Submit) करा. म्हणजे “Save” करून घ्या
अशा प्रकारे तुम्ही रद्द झालेली तारीख आणि ठिकाण पुन्हा निवडू शकता.
बांधकाम कामगार योजना पात्रता | Eligibility Criteria
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशेष गोष्टी लक्षात घ्या. त्या पूर्ण केल्या तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा १८ ते ६० वर्षांच्या आतला पाहिजे.
- कामगाराने मागील १२ महिन्यात ९० दिवस काम केलेले पाहिजे. (म्हणजे ३ महिने काम केलेले पाहिजे).
बांधकाम कामगार योजना कागदपत्रे | Required documents
- अर्जदाराचा वयाचा पुरावा.
- ९० दिवसांचे म्हणजे ३ महिन्यांचे कामाचे प्रमाणपत्र.
- अर्जदाराच्या सध्याच्या राहण्याचा पुरावा (रहिवासी दाखला).
- अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदान कार्ड, वीज बिल, पासपोर्ट, पॅन कार्ड).
- अर्जदाराचे 3 पासपोर्ट आकाराचे फोटो.
नोंदणी शुल्क आणि नूतनीकरण शुल्क | Registration fee and Renewal Fees
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात कामगारांना नोंदणी करण्यासाठी १ रुपया नोंदणी शुल्क लागणार आहे. ही नोंदणी १ वर्षापर्यंत वैध असणार आहे. योजनेत पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी १ रुपया शुल्क लागणार आहे.
त्यामुळे मजुरांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्त शुल्क लागणार नाही. कमी शुल्कात तुम्ही ३२ प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष (Conclusion)
राज्यातील लाखो बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने आणि बांधकाम मंडळाने ५ फेब्रुवारी २०२५ पासून खूप महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कामगारांसाठी नवीन ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे,
जेणेकरून कामगार मजुरांना तालुका सुविधा केंद्रांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, आणि राज्यातील लाखो बांधकाम मजूर घरबसल्या किंवा कुठूनही सहजरीत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी, अर्जाचे नूतनीकरण व ऑनलाईन अर्ज करू शकतात.
त्यासोबतच फॉर्म भरताना योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी कामगार त्यांच्या सोयीच्या तारीख आणि स्थान निवडण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे योजनेत आणि पात्रता पडताळणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल.
ही सर्व बदल राज्यातील अनधिकृत नोंदणी रोखण्यासाठी आणि राज्यातील पात्र बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे बदल मंडळातर्फे करण्यात आले आहेत. या नवीन बदलांमुळे अर्जदारांची वेळेची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लागणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे.
त्यामुळे योजनांचा लाभ हा फक्त पात्र लाभार्थ्याला मिळवून देण्यास मदत होईल आणि त्यासोबत योजनेत पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता राज्यातील बांधकाम कामगार मजुरांनी या नवीन बदलांचा लाभ घ्यावा.