Home  |  विना स्वाक्षरी सातबारा, 8अ व मालमत्ता पत्रक ऑनलाईन डाउनलोड करा सविस्तर माहिती

विना स्वाक्षरी सातबारा, 8अ व मालमत्ता पत्रक ऑनलाईन डाउनलोड करा सविस्तर माहिती

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

महा भुलेख विषयी (महाराष्ट्र भूमी अभिलेख विषयी)

जमिनीविषयी सर्व कागदपत्र पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने एक वेबपोर्टल सुरु केले आणि त्याला महा भुलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख असे नाव दिले. इथे राज्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीविषयी माहिती ही ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

या सरकारी वेबपोर्टलचा वापर करून तुम्ही तुम्हाला लागणारे सातबारा (7/12), 8अ व मालमत्ता पत्र पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता. पण शेतकरी मित्रानो एक गोष्ट लक्षात घ्या, या वेबपोर्टलवरून डाउनलोड केलेले कागदपत्र फक्त पाहण्यासाठी किंवा सत्यापित करण्यासाठी करू शकतात.

सरकार या पोर्टलवरून डाउनलोड केलेले कागदपत्र स्वीकारत नाही. म्हणून तुम्ही फक्त पाहण्यासाठी किंवा डिजिटल कागदपत्र पळताडणी करण्यासाठी करू शकता.

महाराष्ट्र भूमी अभिलेख या वेबपोर्टलवर सरकारने अजून दुसऱ्या सरकारी अधिकृत वेबसाइट लिंक केल्या आहेत, त्या विषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

अनुक्रमांक वेबपोर्टल वेबपोर्टल लिंक
1 डिजिटल स्वाक्षरीत सातबारा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
2 आपली चावडी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

डिजिटल स्वाक्षरीत सातबारा (Digitally Signed 7/12)

डिजिटल स्वाक्षरीत सातबारा या वेबपोर्टलवर शेतकरी ऑनलाईन शेतीविषयी आणि मालमत्ता विषयीचे सर्व कागदपत्र इथून काढू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक डाउनलोड कागदपत्रासाठी फी द्यावी लागेल.

इथून डाउनलोड केलेले कागदपत्र तुम्ही सरकारी कामांसाठी वापरू शकता. सरकारने इथून डाउनलोड केलेल्या उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे सरकारी कामांमध्ये हे कागदपत्र वापरता येईल.

आपली चावडी (Digital Notice Board)

आपली चावडी म्हणजे (Digital Notice Board) मध्ये आपण आपल्या सातबारा (फेरफार) विषयी, मालमत्ता पत्रक (फेरफार) विषयी, मोजणी (नोटिसेस) विषयी, स्वामित्व (नोटिसेस) विषयी, eQJCourt (नोटिसेस) विषयी आणि पिक पाहणी विषयी माहिती जाणून घेऊ शकता.

आपली चावडीवरून तुम्ही कोणत्याही प्रकारचे कागदपत्र डाउनलोड करू शकत नाही. या सरकारी वेबपोर्टलवर फक्त वरील विषयाविषयी माहिती तुम्ही पाहू शकता.

आणि तुम्हाला वाटले की तुमच्या माहितीमध्ये काही तफावत आहे, तर तुम्ही तुमच्या नजीकच्या तलाठी कार्यालयाशी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करून तुम्ही त्यात बदल करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन सातबारा (7/12), 8अ व मालमत्ता पत्रक कसे बघायचे?

तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबवरून सुद्धा ऑनलाईन कागदपत्र पाहू शकता. तर आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस पाहू.

1: मात्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या महा भुलेख अधिकृत वेबपोर्टलवर जाण्याचे दोन पर्याय आहेत. ते खालीलपैकी

पहिला पर्याय : तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवर गूगलमध्ये महा भुलेख शोधून घ्या. नंतर पहिल्या लिंकवर क्लिक करा, तुम्ही महा भुलेखच्या पुष्टावर जाल.

दुसरा पर्याय : म्हणजे समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही महाराष्ट्र भूमी अभिलेखच्या वेबपोर्टलवर जाऊ शकता. त्यासाठी – https://bhulekh.mahabhumi.gov.in/

2: महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या महा भुलेख पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या समोरच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला विभाग निवडा / Select Division पर्याय दिसेल, तिथून पर्याय निवडून घ्या.

मित्रानो, महाराष्ट्र राज्य खूप मोठा असल्याने महाराष्ट्र राज्याचे सहा विभागांमध्ये विभाजन केले आहे. सर्व सहा विभाग खालील तक्त्यात पहा.

अनुक्रमांक विभाग
1 अमरावती (Amravati)
2 छत्रपती संभाजीनगर / औरंगाबाद (Chhatrapati Sambhajinagar / Aurangabad)
3 कोंकण​ (Konkan)
4 नागपूर (Nagpur)
5 नाशिक (Nashik)
6 पुणे (Pune)

या ब्लॉगच्या शेवटी आपण प्रत्येक विभागामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांची नावे जाणून घेऊ.

3: तुम्ही तुमचा विभाग निवडून घ्या आणि समोरील “Go” बटणावर क्लिक करा.

उदाहरणासाठी , नाशिक विभाग निवडून घेऊ आणि Go बटणावर क्लिक करू.

4: आता तुमच्या समोर नवीन वेबपोर्टलवर असा संदेश दिसेल: “नाशिक विभागाकडे पुनर्निर्देशित करीत आहोत” आणि तुमच्या समोर नवीन स्क्रीन उघडेल.

जर तुमच्या इंटरनेटचा स्पीड चांगला असेल तर तुमच्या समोर नवीन पोर्टल लगेच उघडेल आणि इंटरनेट स्पीड मंद असेल तर थोडा वेळ लागेल. त्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करावी.

5: तुमच्या समोर आता तुमच्या विभागाचे नाव दिसेल आणि खाली तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो पर्याय दिसेल. आता तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडून घ्या. इथे तीन पर्याय उपलब्ध आहेत. ते पर्याय खालीलप्रमाणे:

क्रमांक उतारा नाव / पर्याय
1 सातबारा (7/12)
2 8अ
3 मालमत्ता पत्रक

उदाहरणासाठी , आपण 7/12 पर्याय निवडून घेऊ.

6: उतारा पर्याय निवडल्यानंतर, तुम्ही तुमचा जिल्हा / District निवडून घ्या.

उदाहरणासाठी , आपण इथे धुळे जिल्ह्याची निवड करून घेऊ.

7: जिल्हा (District) निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक संदेश दिसेल “लोड करीत आहे कृपया प्रतीक्षा करा” नंतर खाली तुम्हाला तालुका / Taluka निवडण्यासाठी नवीन पर्याय दिसेल. तुम्ही तुमचा तालुका निवडून घ्या.

उदाहरणासाठी , आपण शिंदखेडा तालुका (Taluka) निवडून घेऊ.

8: तालुका (Taluka) निवडल्यावर प्रतीक्षा करा, नंतर खाली तुम्हाला गाव / Village निवडण्यासाठी नवीन पर्याय दिसेल. तुम्ही तुमचे गाव निवडून घ्या.

उदाहरणासाठी , आपण आरावे गाव (Village) निवडून घेऊ.

9: तुम्हाला तुमचा उतारा शोधण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सर्व पर्याय खालील टेबलमध्ये पाहू शकता.

उदाहरणार्थ, आपण “पहिले नाव” हा पर्याय सिलेक्ट करून घेऊ.

क्रमांक उपलब्ध पर्याय नाव
1 सर्वे नंबर / गट नंबर
2 अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर
3 पहिले नाव
4 मधील नाव
5 आडनाव
6 संपूर्ण नाव

10: आता तुम्हाला निवडलेल्या पर्यायाची माहिती टाकण्यासाठी बॉक्स दिसेल. त्यात माहिती भरून घ्या आणि समोर दिसत असलेल्या शोधा बटनावर क्लिक करा.

जर माहिती उपलब्ध असेल तर तुमच्या समोर त्या व्यक्तींची माहिती एका ड्रॉपडाउन लिस्टमध्ये दिसेल. योग्य नाव निवडून घ्या.

उदाहरणार्थ, माझे नाव शोधले असता मला माझ्या गावातील सारखे नाव असलेले सर्व नागरिकांच्या नावांची यादी आली. त्या यादीतून मी माझे नाव निवडून घेतले.

11: यादीमधून तुमचे नाव सिलेक्ट केल्यावर खाली तुम्हाला भाषा निवडा असा पर्याय दिसेल. आता तुम्ही त्यात मराठी भाषा निवडून घ्या. तुम्ही तुमचे उतारे हे 24 भाषांमध्ये पाहू शकता. ती 24 भाषा कोणती ते खालील टेबलमध्ये पहा.

भाषा क्रमांक उपलब्ध भाषा
1 मराठी (Marathi)
2 इंग्रजी (English)
3 हिंदी (Hindi)
4 बंगाली (Bengali)
5 गुजराती (Gujarati)
6 पंजाबी (Punjabi)
7 मल्याळम (Malayalam)
8 तमिळ (Tamil)
9 तेलुगु (Telugu)
10 कन्नड (Kannada)
11 ओरिया (Oriya)
12 उर्दू (Urdu)
13 आसामी (Assamese)
14 मणिपुरी (आसामी) /Manipuri (Assamese)
15 नेपाळी (Nepali)
16 कोकणी (Konkani)
17 मैथिली (देवनागरी) / Maithili (Devanagri)
18 डोगरी (Dogri)
19 बोडो (Bodo)
20 संथाली (देवनागरी) / Santhali (Devanagri)
21 सिंधी (देवनागरी) / Sindhi (Devanagri)
22 काश्मिरी (देवनागरी) / Kashmiri (Devanagri)
23 काश्मिरी (पर्सो अरबी) / Kashmiri (Perso Arabic)
24 संस्कृत (Sanskrit)

उदाहरणार्थ, आपण मराठी भाषेची निवड केली आहे. कारण काढलेला कागद आपल्याला मराठी भाषेत लवकर समजेल म्हणून मराठी निवडून घेऊ. तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा.

12: खाली नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा चालू वैध 10 अंकी मोबाईल क्रमांक भरून घ्यायचा आहे. तो भरल्यावर 7/12 पहा बटणावर क्लिक करायच आहे.

उदाहरणार्थ, मी माझा मोबाईल क्रमांक भरून बटणावर क्लिक करून घेतले.

13: बटणावर क्लिक केल्यावर Loading…. Please Wait असा संदेश दिसेल आणि वेबपोर्टल लगेच तुम्हाला दुसऱ्या पुष्टावर घेऊन जाईल.

14: दुसऱ्या पुष्टावर तुम्हाला तुम्ही निवडलेला विभाग, जिल्हा (District), तालुका (Taluka), गाव (Village) आणि तुम्ही निवडलेली भाषा (Selected Language) दिसेल. एकदा तुम्ही भरलेली माहिती तपासून घ्या बरोबर आहे की नाही. माहिती तपासून झाल्यानंतर

15: खाली कृपया कॅप्चा प्रविष्ट करा (Please enter Captcha) असे दिसेल. दिलेल्या जागेत कॅप्चा प्रविष्ट म्हणजे भरून घ्या. आणि पुन्हा खालील “Verify Captcha to view 7/12” बटणावर क्लिक करा.

16: शेतकरी बांधवांनो, बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमचा सातबारा उघडेल. तुम्ही त्याला एकदा सत्यापित करून घ्या. विशेष म्हणजे तुमचा सर्वे नंबर, गट नंबर आणि तुमचे संपूर्ण नाव तपासून घ्या.

तर अशा प्रकारे आपण आज समजून घेतले की तुमच्या मोबाईल, लॅपटॉपवरून सुद्धा सहजपणे जमिनीचे उतारे ऑनलाईन पाहू शकतो. मित्रानो, एक गोष्ट लक्षात घ्या, महा भुलेखवरून काढलेले कागदपत्रे आपण कोणत्याही सरकारी कामांसाठी वापरू शकत नाही. त्यासाठी डिजिटल साक्षरी केलेले कागदपत्र वापरू शकतो. आणि ते कसे काढायचे, त्या विषयी मी लवकरच लिहणार आहे.


कोणत्या विभागात किती जिल्हे आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?

विभागाचे नाव जिल्ह्याची एकूण संख्या जिल्ह्याची नावे
अमरावती विभाग (Amaravat) या विभागात 5 जिल्हे येतात. बुलडाणा (Buldhana),
अकोला (Akola),
वाशिम (Washim),
अमरावती (Amravati),
यवतमाळ (Yavatmal)
छत्रपती संभाजीनगर विभाग (Chhatrapati Sambhajinagar) या विभागात 8 जिल्हे येतात. नांदेड (Nanded),
हिंगोली (Hingoli),
परभणी (Parbhani),
जालना (Jalna),
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar),
बीड (Beed),
लातूर (Latur),
धाराशिव (Dharashiv)
कोंकण​ विभाग (Konkan) या विभागात 6 जिल्हे येतात. ठाणे (Thane),
रायगड (Raigad),
रत्नागिरी (Ratnagiri),
सिंधुदुर्ग (Sindhudurg),
पालघर (Palghar),
मुंबई उपनगर (Mumbai Suburban)
नागपूर विभाग (Nagpur) या विभागात 6 जिल्हे येतात. गडचिरोली (Gadchiroli),
गोंदिया (Gondia),
चंद्रपूर (Chandrapur),
नागपूर (Nagpur),
भंडारा (Bhandara),
वर्धा (Wardha)
नाशिक विभाग (Nasik) या विभागात 5 जिल्हे येतात. अहमदनगर (Ahmednagar),
जळगाव (Jalgaon),
धुळे (Dhule),
नंदुरबार (Nandurbar),
नाशिक (Nashik)
पुणे विभाग (Pune) या विभागात 5 जिल्हे येतात. कोल्हापूर (Kolhapur),
पुणे (Pune),
सांगली (Sangli),
सातारा (Satara),
सोलापूर (Solapur)

विना स्वाक्षरी सातबारा, 8अ व मालमत्ता पत्रक ऑनलाईन पाहण्याचे फायदे

वेळेची बचत (Time savings)

ऑनलाईन तुमच्या शेतीविषयी कागदपत्रे सरकारने उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना सरकारी दफ्तारांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. सहज आपल्या मोबाईल फोनवरून कागदपत्रे पाहू शकता.

सहज उपलब्ध (Easly Available)

सातबारा, 8अ आणि मालमत्ता पत्रक तुम्ही आता सहज पाहू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा संगणकाचा वापर करून सहज तुमचे उतारे मिळवू शकता.

पारदर्शकता (Transparency)

भूमी अभिलेख पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली माहिती ही सरकारच्या अधिकृत स्त्रोतावरून उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे ही माहिती खरी असते. आणि सहज तुम्हाला खातेदाराची माहिती, वारीस, पाणी घेण्याचा अधिकार या सारख्या बाबी स्पष्ट होतात.


निष्कर्ष (Conclusion)

शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने भूमी अभिलेख विभागाची माहिती सर्व सामान्य नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध केल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना त्यांच्या सातबारा, 8अ आणि मालमत्ता पत्रक सारख्या महत्त्वाच्या कागदपत्रे सहज उपलब्ध झाली आहेत.

वरील माहितीच्या आधारे काढलेला 7/12 किंवा 8अ उतारा हा फक्त माहिती पाहण्यासाठी किंवा तुमच्या शेतीविषयी माहिती पडताळण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

या वेबपोर्टलवरून काढलेले उतारे सरकारी कामांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. ह्या पोर्टलवर तुमचे उतारे सरकार मोफत उपलब्ध करून देते.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nddb dairy plan maharashtra 19 districts

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत NDDB च्या मदतीने पशुपालकांसाठी गाय-भैंस आणि चारा योजना

Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Lift irrigation subsidy extended 2027

महाराष्ट्रात लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी 2027 पर्यंत वाढवली

Maharashtra solar spray pump subsidy

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सोलर स्प्रे पंपावर 100% अनुदान

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान