Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  सरकार देणार लाडक्या बहि‍णींची भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरमध्येच

सरकार देणार लाडक्या बहि‍णींची भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरमध्येच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी 28 जून 2024 रोजी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यास मान्यता दिली. या योजनेमार्फत राज्यातील महिलांना प्रति महिना 1,500 रु. महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे पाठवत आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला खूप प्रचंड प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता पर्यंत महिलांच्या बँक खात्यात या योजनेमार्फत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे असे एकूण 3 हफ्ते म्हणजे 4,500 रु. जमा करण्यात आले आहेत.

कोणत्या तारखेला मिळणार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे?

आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे परळीच्या एका कार्यक्रमाच्या भाषणात बोलले की अदिती तटकरे यांच्यासोबत बोलन केल असता अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी लागणार आहे. आता लगेच मुंबईला जाऊन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद करतो.

असे आश्वासन आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी भाषणात दिले. बोलतांना श्री अजित पवार बोलले लाडक्या बहीण योजनेचे आधी जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. आणि आता सप्टेंबर महिन्याचे पैसे हैं महिलांच्या खात्यात जमा होणे चालू झाले आहेत.

तिसरा हफ्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा करून 10 ऑक्टोबरच्या आत चौथा आणि पाचवा म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात येतील. याच्यासाठी निधीची तरतूद ही श्री अजित पवार मुंबईला जाऊन करणार आहेत.

श्री अजित पवार त्यांच्या भाषणात बोलले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. बहिणींनी काही काळजी करू नये. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हैं तुम्ही तुमच्यासाठी वापरा. त्यासाठीच हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.

महिलेच्या समस्यांची तक्रार कुठे करायची

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin) योजनेंचा एकही हफ्ता आला नसेल आणि अजून फॉर्म अप्रूव झाला नसेल. अशा सर्व महिलांनी काळजी करण्याची गरज नाही.

  • महिला 181 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
  • महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून देखील तक्रारी नोंदवू शकतात.
  • ​महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन तक्रार करू नोंदवू शकतात.

फॉर्म Approve होऊन सुद्धा पैसे आले नसतील तर त्यांनी काय करावे.

कोणत्याही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin) योजनेपासून पासून वंचित राहू दिले जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजित पवार यांनी शब्द दिला आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना.

  • अशा सर्व महिलांनी आधी त्यांनी भरलेल्या फॉर्ममध्ये बँकची माहिती तपासावी. त्याच्यात काही चुका असतील तर अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून आणि त्यांच्या मदतीने ते लवकरात लवकर दुरुस्त करणे.
  • भरलेली माहिती बरोबर असूनसुद्धा पैसे आले नसतील तर, एकदा बँकेला भेट देऊन बँकेच्या खात्याची KYC करून घेणे. आणि आपले खाते सुरळीत चालू करून घेणे.

ह्या सर्व त्रुटी तपासून घ्या जेणेकरून तुम्ही योजनेच्या लाभांपासून वंचित राहणार नाही.

टीप 1: तुमचा फॉर्म मंजूर झालाय की नाही, तपासून घ्या.

टीप 2: फॉर्म मंजूर झाला असेल आणि पैसे आले नसतील तर बँकेची स्थिती तपासून घ्या.

टीप 3: सर्व पर्याय करूनही पैसे येत नसतील तर, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडा. नवीन खाते हे आधार संलग्न असल्याने त्या खात्यात पैसे येऊ शकतात.

टीप 4: अंगणवाडी सेविकांकडे जाऊन पाठपुरावा करणे.

टीप 5: ज्या महिलांचा फॉर्म भरायचा बाकी आहे, त्यांनी सरकारच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहावी.

निष्कर्ष (Conclusion)

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमार्फत महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत म्हणून थेट DBT च्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाते.

आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा केले गेले आहेत. आणि आता सरकार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधी ऑक्टोबरमध्येच महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.

या योजनेत महिलांना काही प्रश्न, तक्रारी, तसेच फॉर्म मंजुरीसंदर्भातील माहिती हवी असल्यास महिलांनी 181 हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच महिला शक्ती दूत अ‍ॅप आणि अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून महिला त्यांचे प्रश्न किंवा तक्रार सोडवू शकतात.

FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती रक्कम मिळणार?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये प्रति महिना महिलांना दिला जाणार आहे.

प्रश्न 2: लाडकी बहीण योजना चे पैसे कधी येणार?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता डिसेंबर महिन्यात येऊ शकतो.

प्रश्न 3: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण फॉर्म कसा भरायचा?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता फक्त अंगणवाडी सेविकांकडे जाऊन भरू शकता.

प्रश्न 4: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते?
उत्तर: ही योजना महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र यांच्या तर्फे राबवली जाते.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet