ग्राम मानचित्र (Gram Manchitra) वेबपोर्टल विषयी
पंचायत राज विभागाने भारतातील ग्राम पंचायतीसाठी जिओ स्पेशियल आधारित (Geo Spatial Based System) ग्राम मानचित्र (Gram Manchitra) वेबपोर्टल तयार केले आहे. तयार केल्यापासून या वेबपोर्टलला फक्त 4,84,141 लोकांनी भेट दिली आहे. म्हणजे अजून भारतात जास्त लोकांना या वेबपोर्टलविषयी माहिती नाही आहे. म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी हा ब्लॉग लिहीत आहे.
जेणे करून गावात राहणाऱ्या लोकांना आपल्या गावाविषयी माहिती मिळेल. आपण पाहतो वर्षोनी वर्ष प्रकल्प रखडलेले दिसतात. खालच्या लेव्हलचं काम करून कागद सबमिट करून ग्रामपंचायत कर्मचारी मोकळे होतात. आपल्या गावात किती शिक्षित लोक आहेत, किती अशिक्षित लोक आहेत, किती मजूर गावात राहतात. गावात चालणारे सरकारी कामे, आपल्या गावाशेजारील पर्यटक स्थळाविषयी माहिती. आपल्या गावाच्या हवामानाचा अंदाज, रिपोर्ट इत्यादी.
खूप साऱ्या गोष्टी पंचायत राज मंत्रालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत. आज आपण ते सविस्तर पाहू या आणि समजू या तुम्ही ही तुमच्या गावाविषयी कशी माहिती ग्राम मानचित्र (Gram Manchitra) वेबपोर्टलवरून काढू शकता आणि एक जागरूक नागरिक म्हणून तुमच्या ग्रामपंचायत विषयी आणि गावाविषयी माहिती ठेवू शकता.
ग्राम मानचित्रावरून माहिती कशी काढू शकतो
आपण सविस्तर पाहू तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत विषयी कशी माहिती मिळवू शकता.
1) सर्व प्रथम तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरमध्ये ग्राम मानचित्र शोधून घ्या आणि पहिल्या लिंकवर क्लिक करा किंवा समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करा – https://grammanchitra.gov.in/gm4MVC .
2) आता तुमच्या समोर एक खूप छान वेबपोर्टल उघडेल. त्यात वरती ग्राम मानचित्र, नाव आणि लोगो, मुख्य पृष्ठावर भारताचा नकाशा, त्यात प्रत्येक राज्याचे आणि केंद्र शासित प्रदेशांचे नावे दिसतात. तुम्हाला या पोर्टलवर मिळणाऱ्या सुविधा खालील तक्त्यात पाहू शकता.
अनुक्रमांक | सुविधा |
---|---|
1 | स्तर / Layers |
2 | क्षेत्र निवडा / Select Area (Gram Panchayat Selection) |
3 | ग्रामपंचायत प्रोफाइल / Gram Panchayat Profile |
4 | मूलभूत मॅपिंग साधने / Basic Mapping Tools |
5 | एलिव्हेशन प्रोफाइल / Elevation Profile |
6 | स्वाइप / Swipe |
7 | प्रिंट / Print |
8 | मेटा डेटा / Meta Data |
9 | माप / Measure |
10 | Query Builder |
11 | Proximity / Multiple Buffers |
12 | Measure |
13 | Identity |
14 | Legend |
15 | Base Map Gallery |
16 | Reports |
3) डाव्या बाजूला दिसत असलेल्या Select Panchayat (पंचायत निवडा) वर क्लिक करायचे आहे.
4) तुमचं ग्राम पंचायत निवडण्यासाठी तुम्हाला आधी तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. नंतर तालुका आणि शेवटी तुम्हाला तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे.
तुम्ही वेबपोर्टलवर ज्या प्रमाणे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडत गेलात त्या नुसार भारताच्या नकाश्यात बदल होताना पाहू शकता.
5) गाव निवडल्यावर खाली तुम्हाला 4 बटण दिसतील. त्या बटनांविषयी जाणून घेऊ.
Back
मागील मेनूमध्ये किंवा आधीच्या पेजवर जाण्यासाठी Back बटणाचा वापर करू शकता.
Refresh
रिफ्रेश केल्याने तुम्ही निवडलेला सर्व डेटा हा पुसला जाईल आणि पुन्हा तुम्हाला मुख्यपृष्ठावर पाठवले जाईल. जेणेकरून तुम्ही पुन्हा माहिती निवडू शकता.
GP (Gram Panchayat) at a glance
मेनूवर क्लिक केले असता तुमच्या समोर एक पॉपअप उघडेल. त्यात तुम्ही तुमच्या गावाची आणि ग्राम पंचायतची माहिती पाहू शकता. तुम्हाला त्या टेबलमध्ये कोणत्या गोष्टी पाहायला मिळतील, ते खालील प्रमाणे:
Forecast चे प्रकार | विश्लेषण |
---|---|
Panchayat Description | या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत विषयी थोडक्यात माहिती दिलेली असेल. तुम्ही ती वाचू शकता. |
Neighbour Bodies | या टॅबमध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या जवळपास असणाऱ्या पंचायत समिती, सरकारी दवाखाना, नगर परिषद, महानगरपालिका, सामाजिक व शासकीय संस्था विषयी माहिती दिलेली असेल. |
Connectivity Details | या टॅबमध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या जवळ असलेल्या बस स्टॅंड आहे की नाही, बस स्टॅंड असेल तर किती अंतरावर आहे. रेल्वे स्टेशन असेल तर किती अंतरावर आहे, रिक्षा स्टॅंड, विमानतळ असेल तर किती लांब आहे, ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध आहे की नाही. अशी संपूर्ण माहिती उपलब्ध असेल. |
Tourist Places | तुमच्या ग्रामपंचायती जवळ पर्यटन स्थळे असतील तर त्या विषयी माहिती दिलेली असेल. पर्यटन स्थळाचे नाव, किती अंतरावर आहे, आणि त्या स्थळाच्या आजूबाजूला राहण्याची, जेवणाची व्यवस्था आहे की नाही, अशी माहिती उपलब्ध असणार. |
Lodges | गावाजवळ लॉज किंवा हॉटेल उपलब्ध असेल तर त्याविषयी माहिती |
Election Details | तुमच्या गावात ग्रामपंचायतचे मतदान झाले असेल तर निवडून आलेल्या पॅनल विषयी संपूर्ण माहिती या टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता. |
Miscellaneous | Miscellaneous असा खर्च दाखवला जातो जो सरकारच्या विशिष्ट योजनांमध्ये येत नाही. उदाहरणार्थ खुर्च्या विकत घेणे, पेन, पेंसिल, वह्या, पाण्याची टाकी इत्यादी. |
Reconcilation | तुमच्या ग्रामपंचायतमध्ये झालेल्या व्यवहाराविषयी माहिती या टॅबमध्ये दिलेली असेल. त्यात काही फेरफार केले असतील तर ते पण तुम्ही पाहू शकता. |
हवामान अहवाल (Weather Report)
तुम्ही तुमच्या गावाचे हवामान अंदाज वेबपोर्टलच्या मुख्य पुष्टावर पाहू शकता. त्यात तारीख, वेळ, किमान तापमान, कमाल तापमान, Rainfall तुमच्या गावात आज किती पाऊस पडला त्याची गणना mm मध्ये केली जाईल. पाऊस पडला नसेल तर तुम्हाला 0mm दाखवले जाईल, Cloud Cover (CC) ढगाड वातावरणाविषयी दाखवले जाईल, सापेक्ष आर्द्रता / Relative Humidity (RH), वाऱ्याचा वेग / Wind Speed (WS).
नंतर तुम्ही वातावरणाचा अंदाज (Forecast) पाहू शकता. Forecast मध्ये तीन प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे:
Forecast चे प्रकार | विश्लेषण |
---|---|
1-hr 1.5 day | तुम्ही पहिले पर्याय निवडले असेल तर तुम्हाला दीड दिवसाचे हवामान पाहायला मिळेल आणि ते 1-1 तासाच्या अंतराने खाली पाहायला मिळेल. त्यात तुम्ही पाहू शकता तारीख, वेळ, तापमान आणि पावसाचे वातावरणाबद्दल. सर्व माहिती स्पष्ट आणि संपूर्ण. |
3-hr 5 days | तुम्ही दुसरा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला पाच दिवसांचे हवामान अंदाज पाहायला मिळेल आणि ते 3-3 तासांच्या अंतराने खाली पाहायला मिळेल. त्यात तुम्ही वरती सांगितलेल्या प्रमाणे माहिती दिसेल. |
6-hr 10 days | तुम्ही तिसरा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला दहा दिवसांचे हवामान अंदाज पाहायला मिळेल आणि ते 6-6 तासांच्या अंतराने खाली पाहायला मिळेल. त्यात वरती सांगितल्याप्रमाणे माहिती मिळेल. |
6) त्या नंतर खाली तुम्हाला 3 रिपोर्ट दिसतील. त्यात Drone Fly Completed, Property Card Prepared, Property Cards Distributed यांच्यावर क्लिक केले असता तुम्हाला रिपोर्ट विषयी संपूर्ण माहिती टेबलमध्ये पाहायला मिळेल. त्यात तुम्हाला गावाचे नाव (Village Name), स्थिती (Status) पाहायला मिळेल.
7) त्या नंतर खाली तुमच्या ग्रामपंचायती विषयी थोडक्यात माहिती दिलेली असेल.
- तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच कोण आहे? त्यांची संपूर्ण माहिती: नाव, फोटो, मेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता इत्यादी.
- तुमच्या गावातील Secretary ची माहिती: त्यांचा फोटो, नाव, मेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी.
- GPDP Status म्हणजे “ग्राम पंचायत विकास योजना” (Gram Panchayat Development Plan) तुमच्या गावात चालू असलेल्या कामांची स्थिती काय आहे त्या विषयी माहिती. किंवा ग्रामसभा मध्ये घेतलेले निर्णय आणि त्याचा संपूर्ण अहवाल
- जनगणना – लोकसंख्याविषयी डेटा (Census – Demographic Data) तुमच्या ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली जनगणना त्यात तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे, महिला, पुरुष, मुले, मुली, लहान बालके, वृद्ध, काम करणारे मजूर इत्यादींविषयी माहिती तुम्ही पाहू शकता.
ग्राम पंचायत टूल (Gram Panchayat Tool) विषयी
मित्रांनो, सर्वात खाली तुम्हाला ग्राम पंचायत टूल (Gram Panchayat Tool) असे टॅब दिसेल. तुम्ही त्या टॅबवर क्लिक केले असता. तुम्हाला काही मेनू दिसतील. चला आपण त्या मेनूविषयी सविस्तर पाहू या.
डाउनलोड (Download)
डाउनलोड मेनूवर क्लिक केले असता एक मेनू उघडतो. त्यात आपल्या ग्रामपंचायत विषयी वेगवेगळ्या फाइल्स असतील. ते आपण डाउनलोड करू शकतो. सविस्तर पाहू, आपण कोणते रिपोर्ट डाउनलोड करू शकतो.
मेनू | उपलब्ध फाइल्स |
---|---|
Profile of Gram Panchayat | GP Basis Information, Financial Institutes, Educational Institutes, PDS, Health, CSC इत्यादी |
Mission Antyodaya GAP Analysis Report | वर्षानुसार अहवाल (Year wise reports) (Ex. 2018, 2019, 2020) |
Mission Antyodaya Report | यात सुद्धा तुम्ही वर्षानुसार अहवाल काढू शकता. |
संसाधन विषयी (Resource Envelope)
संसाधन विषयी या मेनूवर क्लिक केले असता तुमच्या समोर एक पॉपअप उघडेल. त्यात 9-10 योजनांचे फोटो पाहू शकता. आता तुम्ही त्या फोटोंवर क्लिक केले असता तुमच्या समोर आणखी एक पॉपअप उघडेल आणि त्यात तुम्हाला योजनेविषयी माहिती,
ही योजना कोणत्या सरकारी विभागामार्फत चालवली जातेय त्या विभागाचे नाव, योजनेत पैसे मंजूर झाले असतील तर त्याची रक्कम, आणि शेवटच्या कॉलममध्ये वापरले जाणाऱ्या घटकांविषयी माहिती दिलेली असेल. ती तुम्ही वाचू शकता.
Query
पुढे Query मेनूवर क्लिक केले असता पॉपअप उघडेल. त्यात तुम्ही मालमत्ता, रस्ते, पाणीपुरवठा, कर नोंदी, इत्यादींचा डेटा शोधू शकता.
- आधी Select Layer (स्तर निवडा) निवडून घ्या. उदाहरणार्थ रस्ते, पाणीपुरवठा, मालमत्ता नोंदी किंवा कर नोंदी
- नंतर Operators (ऑपरेटर) म्हणजे डेटा शोधण्यासाठी नियम किंवा अटी निवडून घेणे. जसे की = (Equal to), > (Greater than), < (Less than), AND/OR
- Unique Values पाहण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त वेगळी माहिती हवी असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.
- Execute वर क्लिक केले असता तुम्ही निवडलेल्या माहितीच्या अनुसार डेटा मिळवू शकता, आणि Reset वर क्लिक केले असता तुम्ही डेटा मिळवण्यासाठी बनवलेल्या Query ला मिटवू शकता आणि पुन्हा Query लिहू शकता.
Proximity Tool
Proximity Tool वापरून तुम्ही तुमच्या गावाच्या आजूबाजू असणाऱ्या विशिष्ट ठिकाणांचे, संसाधनांचे, सुविधांचे स्थान आणि अंतर मोजण्यासाठी करू शकता.
- या टूलचा वापर करून तुम्ही शाळा, आरोग्य केंद्रे, पाणी पुरवठा केंद्र यांचे योग्य स्थान आणि अंतरावर जाण्यासाठी योग्य वेळेचा अंदाज काढू शकता.
- तुमच्या गावाजवळ नवीन रस्ते, पूल किंवा सार्वजनिक सुविधा बांधण्यासाठी या टूलचा वापर करू शकता.
Advance Analysis Tools
या टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या गावात चालत असलेल्या रोडच्या कामाच्या खर्चाची गणना करू शकता किंवा तुमच्या गावात रोडच्या बाजूला लागलेल्या स्ट्रीट लाईट (Street light) च्या खर्चाची गणना करून रिपोर्ट काढू शकता.
POC Tools
POC Tool मेनूवर क्लिक केले असता तुम्हाला Vehicle Navigation Tool आणि Vehicle Possibility Route असे दोन पर्याय दिसतील. पहिला पर्याय वापरून तुम्ही कोणत्या मार्गाने प्रवास करावा, रस्त्यांची स्थिती, जाताना कोणता मार्ग वेळ वाचवू शकतो, हे पाहू शकता.
तुमच्या वाहनांची सध्याची स्थिती काय आहे ते पाहू शकता. आणि दुसऱ्या पर्यायाने तुम्ही तुमचे वाहन कोणत्या मार्गावर चालवू शकता. गाडी चालवताना रस्त्यात येणाऱ्या रस्त्यांची स्थिती, चढ-उतार, पूल, अरुंद गल्ल्या यांची माहिती मिळवू शकता.
Land parcels
Land Parcel वर क्लिक केले असता तुमच्या गावातील ठिकाणाचा उल्लेख, मालकी हक्क, जमीन वापराचा प्रकार, जमिनीचे सीमांकन, जमिनीच्या नोंदणी, जमिनीचा पुरावा या प्रकारची माहिती तुम्ही इथे पाहू शकता.
Work Details
Work Detail Tool वर क्लिक केले असता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मंजूर झालेले विकास कामे पाहू शकता. त्यात तुम्ही कामाचे नाव, मंजूर झालेले पैसे, कोणत्या विभागामार्फत काम मंजूर झाले आहे, कामाचे स्टेटस, कामाचे फोटो तुम्ही इथे पाहू शकता.
Property Tax Calculation
Property Tax Tool चा वापर करून तुम्ही गावातील टॅक्सची गणना करू शकता. त्यात तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत: Area Wise Tax आणि Property Wise Tax.
क्षेत्रानुसार कराचा हिशोब (Area Wise Tax Calculation) करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ते खालीलप्रमाणे
अनुक्रमांक | Area Wise Tax Type |
---|---|
1 | RCC |
2 | Tiled |
3 | Tin Sheet |
4 | Others |
5 | Summary |
मालमत्ता नुसार कराचा हिशोब (Property Wise Tax Calculation) करण्यासाठी तुम्हाला मॅपमध्ये जाऊन मालकी मालमत्ता निवडावी लागेल. नंतर तुम्ही कराचा हिशोब करू शकता.
Solar Energy Production
गावात सौर ऊर्जा उत्पादन (Solar Energy Production) किती होते त्या विषयी संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. या मेनूवर क्लिक केले असता Gram Panchayat आणि Plot Area नुसार उत्पादन पाहू शकता.
Gram Panchayat निवडले असता तुम्हाला गावात पॅनलनुसार वीज निर्मित होत असलेले पर्याय दिसतील, त्यात 250 WP Panel, 400 WP Panel, 500 WP Panel असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. ज्या पर्यायावर क्लिक करणार त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळवणार.
Plot Area पर्याय निवडले असता त्यात सुद्धा तुम्हाला तीन पर्याय उपलब्ध असतील. त्या सोबत तुम्ही जो पर्याय निवडणार, त्या पर्यायासोबत तुम्हाला खाली अजून दोन पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही त्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता. पर्याय हे पुढील प्रमाणे आहेत: Identify Plot Area on Map आणि Draw a Polygon on Map to Identify. या मधून एक पर्याय निवडून तुम्ही गावात निर्माण होणाऱ्या ऊर्जा उत्पादनाविषयी माहिती मिळवू शकता.
ग्राम मानचित्रामध्ये उपलब्ध असलेल्या मॅपची यादी
ग्राम मानचित्र वेबपोर्टलवर ७ प्रकारचे मॅप (Map) उपलब्ध आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे:
NIC म्हणजे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Centre)
क्रमांक | मॅपचे नाव |
---|---|
1 | India |
2 | NIC Street |
3 | NIC Street Lite |
4 | NIC Satellite |
5 | NIC Terrain |
6 | NIC Imagery |
7 | ESRI Street (Environmental Systems Research Institute) |
8 | Bing Maps |
9 | ESRI Satellite |
10 | Drone Map |
11 | Hybrid Drone Map |
12 | India Aspirational Blocks |
निष्कर्ष (Conclusion)
आज आपण ग्राम मानचित्रातून आपल्या ग्राम पंचायत विषयी माहिती कशी मिळवू शकतो ते पहिले. ग्राम मानचित्रात खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये माहिती उपलब्ध करून दिली आहे. म्हणून तुम्हाला कधी तुमच्या ग्रामपंचायती विषयी माहिती मिळवायची असेल तर तुम्ही ग्राम मानचित्र हेच वेबपोर्टलचा वापर करा. आणि वरील माहितीचा वापर करून तुम्ही काही क्षणात तुमच्या ग्रामपंचायतीविषयी अचूक माहिती मिळवू शकता.
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping Click here