बाहेर देशातून लसूण आयात आणि किमतींवर नियंत्रणाचा प्रयत्न
देशात लसणाचा तुटवडा (Garlic Shortage) दूर करण्यासाठी आणि वाढणाऱ्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारील देशांमधून लसूण आयात केला जातोय. यात अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात लसूण आयात होतोय.
हा लसूण सध्या देशातील मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई, दिल्ली आणि बाकी मेट्रो शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातोय जेणेकरून लसणाचा भाव हा नियंत्रणात ठेवता येईल.
पण यात देशातील शेतकऱ्यांना लसूण उत्पन्नातून मिळणारा नफा हा नवीन लसूण आयात केल्याने त्यांना मिळणार नाही. त्यामुळे सरकारने देशात लसणाचे भाव नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात देशातील शेतकऱ्यांचा ही विचार केला पाहिजे.
देशात लसणाच्या भावात होणाऱ्या वाढीचे कारण.
देशात लसूण उत्पादनात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पंजाब राज्य अग्रेसर आहेत. पण सरकारच्या विदेशी धोरणांमुळे सरकार बाहेर देशातून लसूण आयात करून देशातील लसूण दरात नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. याचाच परिणाम शेतकऱ्यांना लसणावर चांगला नफा मिळत नाही.
म्हणून देशातील खूप सारे शेतकरी मागील दोन-तीन वर्षांपासून लसूण शेती सोडून दुसऱ्या पीकाकडे जाऊ लागले. त्याचाच परिणाम देशात लसणाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील इतर बाजारपेठांमध्ये लसणाचा तुटवडा जाणवू लागला.
सध्या देशातील बाजारपेठांमध्ये 5 - 6 लसणाच्या गाड्यांची आवक होतेय. म्हणून देशात लसणाचे दर (Garlic Rate) हे वाढत आहेत. आणि बाहेरच्या देशाचा लसूण हा आयात करावा लागतोय. पण जानेवारीमध्ये नवीन लसणाचा हंगाम चालू होईल.
त्यामुळे देशात पुन्हा लसणाची आवक वाढेल आणि भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला ही चांगला भाव मिळेल, ही अपेक्षा करतो. जेणेकरून त्यांना ही फायदा होईल. सध्या देशात शेतकऱ्यांच्या घरात शेतातील माल येतो तेव्हाच सरकार बाहेरून माल आयात करते.
देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा कवडीच्या भावात विकावा लागतो. कधी कधी तर त्यांच्या खर्चही निघत नाही. यांचा विचार सरकारने केला पाहिजे.
राज्यातील बाजारपेठेतील लसूण दर (Garlic Rate Today)
महाराष्ट्रातील बाजारात लसणाचे दर हे खूप तेजीत आहेत. चला पाहू या राज्यात लसणाचा काय भाव चालू आहे. राज्यात विविध भागात लसूण हा सरासरी 25,500 रुपये प्रति क्विंटल भाव पाहायला मिळतोय. त्या सोबतच कमीत कमी लसणाचा दर हा 12,000 रुपये प्रति क्विंटल आहे.
आणि जास्तीत जास्त भाव हा 35,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांच्या लसूणाला पाहायला मिळत आहे. आणि 25 नोव्हेंबर 2024 रोजी राज्याच्या बाजारभावात लसणाला सर्वात जास्त 38,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता.
महाराष्ट्रातील पुणे बाजारसमितीत लसणाला जास्तीत जास्त 35,000 रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळाला. तर कमीत कमी 12,000 रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळाला. त्यासोबतच सरासरी लसणाचा भाव 23,500 रुपये देण्यात येत आहे.
यावर उपाययोजना काय करू शकतो?
यासाठी देशातील शेतकऱ्यांना चांगल्या भावाची खात्री देऊन लसूण लागवडीसाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना लसणाचा योग्य साठा करण्यासाठी शेळ बांधण्यासाठी मदत केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी सुद्धा व्यापारी लोकांसारखे लसूण जमा करून ठेवतील.
जेणेकरून देशात वर्षभर लसूणाची आयता होत राहील आणि देशातील लसणाचे दर हे नियंत्रणात सुद्धा राहतील आणि देशातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल.
निष्कर्ष (Conclusion)
भारतात लसणाचा तुटवडा जाणवण्याची मुख्य कारण म्हणजे लसूण लागवडीचे क्षेत्र कमी होणे, त्यामुळेस देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या रसोईघरात महागाईचा भार पडतोय. त्यासाठी सरकारने अफगाणिस्तानातून लसूण आयात करून लसणाच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.
सरकारने देशातील शेतकऱ्यांना लसूण लागवडीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या लसूनाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून भारतात लसूण लागवडीचे क्षेत्र वाढेल. त्यासोबतच देशातील लसणाच्या भावावर नियंत्रण ठेवता येईल. आणि बाहेर देशातून लसूण मागवण्याची गरज भासणार नाही.