सातव्या हफ्त्याच्या पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ मिळाला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण (Ladki Bahin Yojana) योजनेत नवीन वर्षाचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी 2025 हा वर्षाचा पहिला महिना आहे आणि या महिन्यात 24 जानेवारी 2025 तारखेपासून राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी या योजनेत तब्बल 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्फत पैसे जमा करण्यात आले आहेत.
राज्यातल्या उर्वरित महिलांना येत्या 2 ते 3 दिवसात पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी महिलांनी आपल्या बँक खात्याची चालू स्थिती तपासून घ्या. लाभ घेण्यासाठी बँक खाते सक्रिय पाहिजे.
तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. 25 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यंत उर्वरित महिलांना या योजनेमार्फत पैसे पाठवण्यात येतील. त्यामुळे राज्यातील महिलांनी चिंता करू नये. सरकार लवकरच योजनेत पात्र सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवतील.
आता पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात किती पैसे पाठवले आहेत?
महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत सहा हफ्ते जमा करण्यात आले आहेत म्हणजे 9,000 रुपये आणि बाकी महिलांच्या बँक खात्यात सातवा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
म्हणजे राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात 10,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. 26 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यात सातवा हफ्ता जमा होईल. म्हणजे 10,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असे म्हणायला हरकत नाही.
लाडकी बहिण योजनेत 2100 रुपयांविषयी निर्णय
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयांचा लाभ देऊ असे आश्वासन महायुतीतील मोठ्या नेत्यांनी दिले होते. महायुती सरकार खूप मोठ्या मतांनी निवडून आले आणि राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांची मोहर लागली.
मुख्यमंत्री बनल्यानंतर राज्यातील विरोधी नेत्यांनी आणि पत्रकारांनी मुख्यमंत्री साहेबांना 2100 रुपयांविषयी आठवण करून देत प्रश्नही विचारला की आता महिलांना पुढील हफ्ता हा 2100 रुपयांचा दिला जाईल की 1500 रुपयांचा.
या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की याचा निर्णय येणाऱ्या अर्थ संकल्पनेत घेण्यात येईल. तोपर्यंत राज्यातील लाडकी बहिण योजनेत पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. निवडणुकीनंतर महिलांच्या बँक खात्यात 2 हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
निवडणुकीनंतरचा पहिला हफ्ता हा 24 डिसेंबर रोजी दिला गेला. तर दुसरा हफ्ता हा 24 जानेवारीपासून वाटण्यास सुरुवात केली आहे. तरी राज्यातील महिलांना अर्थ संकल्प पर्यंत वाढ पाहावी लागेल. त्यानंतर 2100 रुपयांविषयी निर्णय घेण्यात येईल.
कोणत्या लाडक्या बहिणींना 7व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही?
राज्यातील माता भगिनींनो, 7व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. त्याचे काही कारणे आहेत. ज्या महिला योजनेस अपात्र असतील, ज्या महिला संजय निराधार आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असतील, ज्या महिलांनी अजून सुद्धा ई-केवायसी पूर्ण केली नसणार अशा सर्व महिलांना 7व्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाही.
निष्कर्ष (Conclusion)
आज आपण पाहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दिला जाणाऱ्या जानेवारी महिन्याच्या सातव्या हफ्त्याचा पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ दिला गेला, आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यात किती हफ्त्यांची राशी जमा करण्यात आली आहे आणि या हफ्त्यांची एकूण राशी किती आहे.
पुढे पाहिले श्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेमध्ये महिलांना 1500 रुपये मिळतील की आश्वासनानुसार पुढील अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये देण्यात येतील. या सर्व गोष्टी आज आपण या लेखातून पाहिल्या. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबपोर्टलला भेट देत रहा.