लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे कोणत्या तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी महसूल विभागाने 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.
आणि या हफ्त्याचे वितरण जानेवारी महिन्याच्या 26 तारखेपर्यंत केले जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 26 जानेवारी 2025 पर्यंत हफ्ता जमा करण्यात येणार आहे.
महिलांना किती हफ्त्यांचे वितरण करण्यात आले आहे?
माझी लाडकी बहिण योजनेत सरकारने योजना सुरु झाल्या पासून म्हणजे जुलै 2024 पासून 6 हफ्त्यांचे वितरण केले आहे. आणि आता सातव्या हफ्त्याचे वितरण लवकरच होणार आहे. बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आलेल्या हफ्त्यांपैकी पहिले 5 हफ्ते हे राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यकाळात देण्यात आले आहेत.
तर 6वा हफ्ता आणि त्या पुढील हफ्ते हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात जमा करण्यात येतील.
बँक खात्यात किती रुपये जमा करण्यात येणार आहेत?
आपण पाहत आहोत सरकारने राज्यातील महिलांना विश्वासात घेऊन योजनेमध्ये 600 रुपयांची भर करून महिलांना या योजनेमार्फत 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. त्या प्रमाणे महाराष्ट्रातील महिलांनी महायुती सरकारला बहुमताने निवडून दिले.
सरकार स्थापन होऊन 2 महिने होण्यात आले. आणि सरकारने 1500 रुपयांचा हफ्ता हा महिलांच्या बँक खात्यात जमा केला. त्यामुळे दिलेला शब्द महायुती सरकारकडून पाळला जाईल की नाही असा प्रश्न आता महिलांना पळू लागला आहे.
पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी या आधीच स्पष्ट केले आहे की महिलांना 2100 रुपये देण्याबाबत निर्णय हा पुढील म्हणजे 2025 च्या अधिवेशनात घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना 2100 रुपयांसाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल. आणि आता जानेवारी 2025 मध्ये येणारा हफ्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे.
सर्व लाडक्या बहिणींना हा हफ्ता देण्यात येणार आहे का?
नाही, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना हा हफ्ता दिला जाणार नाही. कारण राज्याच्या तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणात या योजनेचा भार पडतोय. म्हणून राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन निकष लावून आणि जुन्या अँप्रोव्ह फॉर्मची पडताळणी करून,
योजनेसाठी अपात्र महिलांना आणि राज्यातील दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या अशा सर्व महिलांना अपात्र ठरवून, उर्वरित सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे.
निष्कर्ष (Conclusion)
आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेत 7व्या हफ्त्याचे लवकरच वितरण केले जाणार आहे. 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत.
आधी लाभ घेतला आहे, परंतु आता नवीन निकषांनुसार महिलांचा फॉर्म अपात्र झाला आहे. अशा अपात्र महिलांवर काही कारवाई होईल की नाही, त्याविषयी सरकारकडून सविस्तर माहिती उपलब्ध नाही.